Indian Bank Apprentice Recruitment 2024: इंडियन बँकेने शिकाऊ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही भरती १५०० रिक्त जागांसाठी होणार आहे, तर इच्छुक व पात्र उमेदवार इंडियन बँकेच्या (Indian Bank ) अधिकृत वेबसाइटद्वारे indianbank.in ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जप्रक्रिया १० जुलै २०२४ पासून सुरू झाली असून ३१ जुलैपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. तर या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, उमेदवारांची निवड कशी होणार याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.

Indian Bank Recruitment 2024: शैक्षणिक पात्रता

Kevin Pietersen is available to become the batting coach of the Team India his post viral on social media
Kevin Pietersen : टीम इंडियाचा फलंदाजी प्रशिक्षक होण्यासाठी इंग्लंडचा ‘हा’ दिग्गज उत्सुक, पोस्ट होतेय व्हायरल
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
There are signs that Chief Ministers Youth Work Training Scheme is also going to be closed
मुख्यमंत्र्यांचे हजारो लाडके भाऊ बेरोजगार होणार? काय आहे कारण?
Chandrapur District Bank recruitment case interviews due to fear of administrator appointment
प्रशासक नियुक्तीच्या भीतीपोटी युद्धपातळीवर मुलाखती, चंद्रपूर जिल्हा बँक नोकरभरती प्रकरण
Scheduled Caste students scholarships,
अकोला : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती धोक्यात: महाविद्यालयांची टाळाटाळ अन्…
Bank Of Baroda Specialist Officer Recruitment 2025: Registration Window To Close Soon, Salary Up To Rs 1.35 Lakh
Bank Job: बँकेत नोकरीची संधी! बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरती; १.३५ लाखापर्यंत मिळणार पगार; कसा अर्ज कराल जाणून घ्या
ITBP Recruitment 2025 news in marathi
नोकरीची संधी : ‘आयटीबीपी’त ५१ पदे रिक्त
ESIC Recruitment 2025
ESIC Recruitment 2025 : परीक्षेशिवाय ESICमध्ये नोकरीची संधी! महिन्याला मिळू शकतो १,३१,०६७ रुपयांपर्यंत पगार, जाणून कोण करू शकते अर्ज?

ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्यांच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून कोणत्याही शाखेतील पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी ३१/३/२०२० नंतर पदवी पूर्ण केलेली असावी आणि त्यांच्याकडे उत्तीर्ण झालेले प्रमाणपत्र असावे.

Indian Bank Recruitment 2024: वयोमर्यादा

उमेदवाराची वयोमर्यादा २० ते २८ वर्षांच्या दरम्यान असावी. तसेच एससी / एसटी / ओबीसी / पीडब्ल्यूबीडी इत्यादी श्रेणींसाठी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

Indian Bank Recruitment 2024: अर्ज फी

सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ५०० रुपये आहे. तर एससी / एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांना अर्ज फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. तसेच उमेदवाराने अर्ज फी ऑनलाइन भरावी.

हेही वाचा…Mumbai University Recruitment 2024: मुंबई विद्यापीठात १५२ पदांवर भरती; कुठे, कसा करायचा अर्ज? जाणून घ्या सविस्तर

Indian Bank Recruitment 2024: अर्ज कसा कराल ?

अर्ज करण्यासाठी सगळ्यात प्रथम अधिकृत indianbank.in.वेबसाइटवर जा.
येथे तुम्हाला लॉगिन विभागात नोंदणी लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
अर्ज भरा.
आता तुमची सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज फी भरा.
नंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
अशाप्रकारे तुम्ही अर्ज करू शकता.

Indian Bank Recruitment 2024: कशी होईल उमेदवारांची निवड ?

जे उमेदवार शिकाऊ पदांसाठी अर्ज करणार आहेत, त्यांची निवड ऑनलाइन लेखी परीक्षेद्वारे केली जाईल आणि त्यानंतर प्रत्येक उमेदवाराची स्थानिक भाषा चाचणी घेतली जाईल. परीक्षा प्रमुख प्रादेशिक भाषांमध्ये (बँकेने ठरवल्याप्रमाणे) घेतली जाईल, जी इंग्रजीमध्ये असेल. चाचण्यांमध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जातील. तसेच परीक्षेसाठी कॉल लेटर उमेदवारांना ईमेलद्वारे किंवा बँकेच्या वेबसाइटद्वारे किंवा ( https://apprenticeshipindia.org/) ( https://nsdcindia.org/apprenticeship) किंवा (http://bfsissc.com) द्वारे जारी केले जातील.

अधिक माहितीसाठी उमेदवाराने अधिसूचना एकदा तपासून घ्यावी.

लिंक – https://www.indianbank.in/wp-content/uploads/2024/07/Detailed-advertisement-for-Engagement-of-Apprentices-under-the-Apprentices-Act-1961.pdf

उमेदवार या लिंकद्वारे थेट अर्ज करू शकतात.

लिंक – https://ibpsonline.ibps.in/ibeappjul24/

Story img Loader