बॅंकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. इंडियन बँकेत लवकरच २०३ पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी इंडियन बँकेने जाहिरात प्रसिद्ध केली असून लवकरच ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> भारतीय पोस्ट विभागात १० वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची मोठी संधी, ४० हजार पदांसाठी मेगा भरती; अधिकची माहिती जाणून घ्या

इंडियन बँकेने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, आर्थिक विश्लेषकांची (क्रेडिट अधिकारी) ६० पदे, जोखीम अधिकारी १५ पदे, आयटी/संगणक अधिकारी २३ पदे, माहिती संरक्षण अधिकारी ७ पदे, विपणन अधिकारी १३ पदे, कोषागार अधिकारी (कोषागाराचा विक्रेता) २० पदे, औद्योगिक विकास अधिकारी ५० पदे, विदेशी मुद्रा अधिकारी १० पदे, तर एचआर अधिकाऱ्याची ५ पदे भरण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> NPCIL Recruitment 2023: १९३ नर्स आणि इतर अनेक पदांसाठी मोठी भरती; अर्ज कुठे आणि कसा भरावा जाणून घ्या

हेही वाचा >>> अग्निवीर भरती प्रक्रियेत मोठे बदल; सरकारी नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी जाणून घ्या नवीन नियम

दरम्यान, अर्ज करणाची तारीख आणि शैक्षणिक पात्रता यासंबंधित माहिती लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असून यासंबंधित इतर माहितीसाठी इंडियन बँकेच्या http://www.indianbank.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन करिअर पेजला भेट द्यावी, असे बॅंकेकडून सांगण्यात आले आहे.