Indian Maritime University Recruitment 2023: इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटीमध्ये नोकरी मिळवण्याची एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. या पदांची खास गोष्ट म्हणजे निवड झाल्यानंतर उमेदवारांना दरमहा दीड लाख रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. या भरती मोहिमेद्वारे असिस्टंट इंजिनियर आणि असिस्टेंट रजिस्टर पदे भरण्यात येणार आहेत. या रिक्त पदांसाठी अर्जाची लिंक ३ फेब्रुवारी २०२३ रोजी उघडण्यात आली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ मार्च २०२३ आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करण्याची इच्छा आहे ते अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिक्त जागा तपशील

इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटी मध्ये थेट भरती, डेप्यूटेशन बेसिसवर अर्ज आमंत्रित केले आहेत. या भरती मोहिमेद्वारे एकूण १४ पदे भरली जातील, ज्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

  • असिस्टंट इंजिनियर (सिव्हिल) – ३ पदे
  • असिस्टंट इंजिनियर (इलेक्ट्रिकल) – ३ पदे
  • असिस्टंट रजिस्टर – २ पदे
  • असिस्टंट रजिस्टर फाइनन्स – २ पदे

( हे ही वाचा; १२ वी पास ते पदवीधर उमेदवारांना नोकरी मिळवण्याची उत्तम संधी; आत्ताच अर्ज करा)

अर्जासाठी पात्रता काय आहे

या पदांसाठी अर्ज करण्याची पात्रता पदानुसार आहे. थोडक्यात सांगायचे तर, सिव्हिल इंजिनीअरिंग/इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये BE किंवा B.Tech असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. यासोबतच पदव्युत्तर पदवी घेतलेले उमेदवारही अर्ज करू शकतात.

४० वर्षांपर्यंतचे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. आरक्षित वर्गाला सरकारी नियमांनुसार वयात सवलत मिळेल.

निवड कशी होईल

या पदांसाठी उमेदवारांची निवड थेट भरतीद्वारे केली जाईल. यासाठी ऑनलाइन स्क्रीनिंग टेस्ट घेतली जाईल आणि वैयक्तिक मुलाखत होईल. अधिक तपशील जाणून घेण्यासाठी, तुम्ही अधिकृत वेबसाइटवर दिलेली सूचना तपासू शकता.

तुम्हाला किती पगार मिळेल

या पदांवर निवड झाल्यावर, उमेदवारांना ७ व्या CPC नुसार वेतन मॅट्रिक्स स्तर १० अंतर्गत रु. ५६,१०० ते रु. १,७७,५०० पर्यंत वेतन दिले जाईल. सविस्तर माहितीसाठी imu.edu.in ला भेट द्या.