Indian Navy Recruitment 2024 Notification: जर तुम्ही बारावी उत्तीर्ण असाल आणि सरकारी नोकरी (सरकारी नोकरी) शोधत असाल त भारतीय नौदलात चांगली संधी आहे. भारतीय नौदलाने १०+२ (बी. टेक) कॅडेट प्रवेश योजनेअंतर्गत चार वर्षांच्या B.Tech पदवी अभ्यासक्रमासाठी रिक्त जागांची भरती करणार आहेत. अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्यांना एक्झक्युटिव्ह आणि टेक्निकल ब्रांचमधील अधिकाऱ्यांच्या पदांवर पुन्हा रुजू केले जाईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यासाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया ६ जानेवारीपासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख २० जानेवारी आहे. या अभ्यासक्रमाद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना नौदलाच्या आवश्यकतेनुसार ‘अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग’, ‘मेकॅनिकल इंजिनीअरिंग’ किंवा ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग’मध्ये चार वर्षांच्या बी.टेक कोर्समध्ये उमेदवार म्हणून समाविष्ट केले जाईल.

अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर जेएनयूमधून बी.टेक पदवी मिळते.

कॅडेट प्रवेश योजनेबी. टेक पदवी अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला जवाहरलाल नेहरू विद्यापीठाकडून (JNU) बी. टेक ची पदवी दिली जाईल. यानंतर, एक्झक्युटिव्ह आणि टेक्निकल ब्रांचमध्ये (अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रिकल) कॅडेट्सचे विभागले जाईल.

हेही वाचा – अग्निवीरवायू भरती: या तारखेपासून अर्ज सादर करता येणार

भारतीय नौदलाभरतीच्या महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू करण्याची तारीख – ६ जानेवारी २०२४
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० जानेवारी २०२४

भारतीय नौदलात भरल्या जाणार्‍या पदांची संख्या

एक्झक्युटिव्ह आणि टेक्निकल ब्रांच –३५ रिक्त जागा

भारतीय नौदलात अर्ज करणाऱ्या उमेदवारांची पात्रता

उमेदवारांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (PCM) मध्ये किमान ७०% गुणांसह आणि इंग्रजीमध्ये किमान ५०% गुणांसह कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून इयत्ता १२ वी उत्तीर्ण केलेली असावी. पुढे, जेईई मेन-२०२३ परीक्षा (बी.ई./बी.टेक.साठी) बसलेल्या उमेदवारांना जेईई मेन २०२३ च्या ऑल इंडिया कॉमन रँक लिस्टद्वारे सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) साठी बोलावले जाईल.

हेही वाचा – नोकरीची संधी : लष्करात भरती होण्याची संधी

येथे अर्ज करण्यासाठी लिंक आणि अधिसूचना पहा

भारतीय नौदल भरती २०२४ अर्ज करण्यासाठी लिंक – https://www.joinindiannavy.gov.in/
भारतीय नौदल भरती २०२४ अधिसूचना – https://images.news18.com/ibnkhabar/uploads/2024/01/Indian-Navy-Recruitment-2024-Notification-2024-01-a444dc5b08af44643cb8f5250ebfb94d.pdf

अशा प्रकारे तुम्हाला भारतीय नौदलात अधिकाऱ्याची नोकरी मिळेल.

भारतीय नौदलाद्वारे निवडलेल्या उमेदवारांना एसएसबी मुलाखतीसाठी ई-मेल आणि एसएमएसद्वारे सूचित केले जाईल. तसेच, उमेदवारांना निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांचा ई-मेल/मोबाईल क्रमांक बदलू नये असा सल्ला दिला जातो. SSB गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. वैद्यकीय चाचणीत तंदुरुस्त घोषित केलेल्या उमेदवारांची पोलिस पडताळणी आणि चारित्र्य पडताळणी केली जाईल.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian navy 12 th pass recruitment 2024 apply online for b tech cadet entry scheme at joinindiannavy gov in snk