Indian Navy Agniveer Recruitment 2024: : भारतीय वायुसेनेने (IAF) 02/2024 बॅचसाठी अग्निवीर (SSR आणि MR) च्या भरतीसाठी अधिसूचना प्रकाशित केली आहे. उमेदवार १३ मे २०२४ पासून या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ मे आहे. अधिकृत वेबसाइट (joinindiannavy.gov.in) वर अविवाहित पुरुष आणि अविवाहितांकडून अर्ज मागवले जातील. उमेदवार खाली दिलेल्या या लेखातील भरतीशी संबंधित तपशील तपासू शकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Indian Navy Agniveer Recruitment 2024: महत्त्वाच्या तारखा

या पदांसाठी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन लिंक १३ मे रोजी उपलब्ध होईल. तुम्ही २७ मे २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकता.

IAF Agniveer SSR Eligibility Criteria 2024- शैक्षणिक पात्रता:

या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाद्वारे मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाकडून गणित आणि भौतिकशास्त्रासह १०+२ मध्ये एकूण किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असला पाहिजे.
किंवा
केंद्रीय, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मान्यताप्राप्त पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमधून अभियांत्रिकी (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/ऑटोमोबाईल्स/कॉम्प्युटर सायन्स/इंस्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी/माहिती तंत्रज्ञान) मध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा कोर्स एकूण ५०% गुणांसह उत्तीर्ण केला असावा.
किंवा
केंद्र, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशद्वारे मान्यताप्राप्त शिक्षण मंडळांकडून भौतिकशास्त्र आणि गणित हे Non-vocational विषयांसह दोन वर्षांचे Vocational अभ्यासक्रम एकूण ५० % गुणांसह उत्तीर्ण असला पाहिजे.

IAF Agniveer MR Eligibility Criteria 2024 : शैक्षणिक पात्रता:

उमेदवाराने सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने मान्यता दिलेल्या शालेय शिक्षण मंडळांमधून एकूण किमान ५०% गुणांसह मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

Indian Navy Agniveer Notification 2024: अधिसूचना

उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर अधिसूचना तपासू शकतात. अधिसूचनेत पात्रता, निवड प्रक्रिया, रिक्त जागा आणि इतर तपशीलांचा समावेश आहे.
https://www.joinindiannavy.gov.in/files/Advt_Agniveer_SSR_02_24_English.pdf

How to Submit IAF Agniveer Vayu Application Form 2024 -कसा जमा करावा अर्ज?

उमेदवार अधिकृत वेबसाइटवर अर्ज भरू शकतात.

  • पायरी १: अधिकृत वेबसाइटवर जा – joinindiannavy.gov.in/
  • पायरी २: होमपेजवर उपलब्ध असलेल्या ऍप्लिकेशन लिंकवर क्लिक करा.
  • पायरी ३: आवश्यक तपशील प्रदान करा.
  • पायरी ४: अर्ज जमा करा.
  • पायरी ५: आवश्यक कागदपत्रे जमा करा.
  • पायरी ६: कृपया भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंटआउट काढून ठेवा.
मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian navy agniveer recruitment 2024 apply online for mr ssr posts at join indian navy gov in snk