Indian Navy Agniveer Recruitment 2024: भारतीय नौदलात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे चालून आली आहे. भारतीय नौदलांतर्गत अग्निवीर या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासंबंधीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून, पात्र उमेदवार भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in वर MR संगीतकार (Musician) पदासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ जुलै २०२४ पर्यंत असणार आहे. या लेखातून भरतीबद्दलची शैक्षणिक पात्रता, वेतन, अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शैक्षणिक पात्रता –

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने शिक्षण मंत्रालय, सरकारद्वारे मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळांमधून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा –

अर्जदार उमेदवाराचा जन्म १ नोव्हेंबर २००३ ते ३० एप्रिल २००७ (दोन्ही तारखांसह) दरम्यान झालेला असावा.

हेही वाचा…Success Story: नातेवाईक, मित्रांचे टोमणे पण पत्नीची साथ; पाहा इतरांना जोडीदार, नोकरी शोधण्यात मदत करणाऱ्या ‘त्यांचा’ प्रेरणादायी प्रवास

उमदेवारांची निवड कशी होईल?

नियुक्त्यांची निवड प्राथमिक स्क्रीनिंग टेस्ट आणि फायनल स्क्रीनिंग टेस्टमधील कामगिरीच्या आधारे गुणवत्तेच्या क्रमावर आधारित आहे.

स्टेज I साठी उमेदवारांची शॉर्ट लिस्टिंग, प्राथमिक स्क्रीनिंग मॅट्रिक परीक्षेत मिळालेल्या गुणांवर आधारित असेल. शॉर्ट लिस्ट केलेल्या उमेदवारांना स्टेज I साठी कॉल-अप लेटर दिले जाईल; ज्यामध्ये शारीरिक फिटनेस टेस्ट (PFT), म्युझिक स्क्रीनिंग टेस्ट आणि भरतीसाठी वैद्यकीय परीक्षा आदींचा समावेश आहे. जे पीएफटी आणि प्रीलिमिनरी म्युझिक टेस्ट उत्तीर्ण होतील; त्यांना रिक्रूटमेंट मेडिकल परीक्षा द्यावी लागेल. रिक्त पदांवर अवलंबून सर्व बाबतीत अंतिम स्क्रीनिंगमध्ये पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाईल. गुणवत्ता यादी उमेदवारांच्या डॅशबोर्डवर http://www.joinindiannavy.gov.in या वेबसाइटवर २४ ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध होईल.

पगार –

अग्निवीरांना निश्चित वार्षिक वाढीसह दरमहा ३० हजारांचे पॅकेज दिले जाईल. त्याव्यतिरिक्त ड्रेस, प्रवासखर्च आदींसाठी पैसे दिले जातील.

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट – joinindiannavy.gov.in किंवा अधिसूचना उमेदवाराने तपासून घ्यावी https://www.joinindiannavy.gov.in/files/Advt_Agniveer_MR_MUS_02_24_English.pdf

अर्ज कसा कराल?
१.
भारतीय नौदलाच्या joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
२. होम पेजवर उपलब्ध असलेल्या इंडियन नेव्ही अग्निवीर भरती २०२४ लिंकवर क्लिक करा.
३. एक नवीन पेज उघडेल. तेथे ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक उपलब्ध असेल.
४. लिंकवर क्लिक करा आणि रजिस्ट्रेशन डिटेल्स भरून घ्या.
५. ‘सबमिट’वर क्लिक करा. नंतर वैयक्तिक माहितीसह अकाउंट लॉग इन करा.
६. अर्ज शुल्क भरा.
७. ‘सबमिट’वर क्लिक करा आणि पेज डाउनलोड करा.
८. पुढील भरती प्रक्रियेसाठी त्याची हार्ड कॉपीसुद्धा काढून ठेवा.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian navy has invited applications for agniveer posts apply for mr musician posts through the official website till 11 july 2024 asp
Show comments