Indian Navy recruitment 2023: भारतीय नौदलात ३७२ पदांसाठी होणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्जाची प्रक्रिया आजपासून म्हणजेच १५ मे पासून सुरू होणार आहे आणि अर्ज भरण्याची शेवटची तारीख २९ मे असणार आहे. इच्छूक उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन joinindiannavy.gov.in. ऑनलाईन अर्ज भरू शकतात.
भारतीय नौदल भरती २०२३ पदाचे तपशील :
चार्जमन-II च्या372 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम राबविण्यात येत आहे.
भारतीय नौदल भरती २०२३ वयोमर्यादा :
पात्र उमेदवाराचे वय १८ ते २५ दरम्यान असावे.
हेही वाचा – UPSC Recruitment 2023 : २८५ वैद्यकीय अधिकारीसह इतर पदांसाठी होणार भरती, १ जूनपूर्वी करा अर्ज
भारतीय नौदल भरती २०२३ शैक्षणिक पात्रता :
उमेदवारांनी मान्यताप्राप्त महाविद्यालयातून भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र किंवा गणितासह विज्ञान विषयात पदवी प्राप्त केलेली असावी. उमेदवारांनी मान्यताप्राप्त महाविद्यालयातून योग्य विषयातील पदवी धारण केलेली असावी.
भारतीय नौदल भरती २०२३ अर्जाचे शुल्क:
उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून फक्त 278 रुपये भरणे आवश्यक आहे. सर्व महिला, SC, ST, PwD आणि ESM उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
भारतीय नौदल भरती २०२३ : कसा करावा अर्ज
- सर्वप्रथम joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- मुख्यपृष्ठावर, Join Navy वर क्लिक करा आणि नंतर Waysbवर क्लिक करा
- पुढे, Civilian वर क्लिक करा आणि नंतर चार्जमन-II वर क्लिक करा
- अर्ज व्यवस्थित भरा
- सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- अर्ज शुल्क भरा