Indian Navy SSR Recruitment 2023: भारतीय नौदल अग्निवीर पदांसाठी अर्ज मागवत आहे. इच्छुक उमेदवार joinindiannavy.gov.in आणि agniveernavy.cdac.in या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेद्वारे एकूण ४१६५ पदे भरली जातील (फक्त ८३३ पदे महिलांसाठी). भारतीय नौदल अग्निवीर SSR ०२/२०२३ आणि ०१/२०२४ बॅचच्या पदांसाठी विवाहित नसलेले पुरुष आणि महिला उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. २९ मे २०२३ पासून ही भारतीय नौदल अग्निवीर SSR भरतीसाठी ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून १५ जून २०२३ रोजी ही प्रक्रिया संपणार आहे. म्हणजेच अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Indian Navy SSR Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता :

गणित आणि भौतिकशास्त्रासह १०+२ परीक्षा आणि भारतीय शिक्षण मंत्रालयात सरकारद्वारे मान्यताप्राप्त असलेल्या शालेय शिक्षण मंडळांकडून रसायनशास्त्र/ जीवशास्त्र/ संगणक विज्ञान यापैकी किमान एक विषयात उतीर्ण असावा.

Indian Navy SSR Recruitment 2023 :भारतीय नौदलात ४००० पेक्षा जास्त अग्निवीर पदांसाठी होणार भरती; आज शेवटची तारीख

Indian Navy SSR Recruitment 2023: वेतनमान :

अग्निवीरांना निश्चित वार्षिक वाढीसह दरमहा ३०,००० रुपये पॅकेज दिले जाईल. याव्यतिरिक्त, risk and hardship, ड्रेस आणि प्रवास भत्ते दिले जातील.

Indian Navy SSR Recruitment 2023:अर्ज कसा करावा:

उमेदवार २९ मे २०२३ ते १५ जून २०२३ या कालावधीत केवळ agniveernavy.cdac.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. प्रक्रिया C-DAC पोर्टलवर उपलब्ध आहे.

अधिकृत अधिसुचना – https://agniveernavy.cdac.in/sailorscycle2/view_others/Corrigendum_02_2023_SSR_Jun_23.pdf

अर्ज करण्याचीसाठी लिंक – https://agniveernavy.cdac.in/sailorscycle2/login

Indian Navy SSR Recruitment 2023: अर्ज करण्याची पद्ध

भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
“ऑनलाइन अर्ज करा” लिंक शोधा आणि त्यावर क्लिक करा.
तुमचा आवश्यक तपशील भरा – ईमेल आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा कोड.
नवीन अर्जदारांसाठी “नवीन युजर” लिंकवर क्लिक करा.
सिस्टम पासवर्ड तयार करेल आणि तुमच्या सक्रिय केलेल्या ईमेल आयडीवर पाठवेल.
तुम्हाला पासवर्ड मिळाल्यावर तुमच्या खात्यात लॉग इन करा.
भारतीय नौदलातीलअग्निवीर भरती २०२३ साठी अर्ज करा.
अर्ज पूर्ण केल्यानंतर, इंडियन नेव्ही अग्निवीर भरती २०३४ अर्ज डाउनलोड करा.
भविष्यातील संदर्भासाठी फॉर्मची हार्ड कॉपी ठेवा.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian navy ssr recruitment 2023 government job vacancies for over 4000 posts apply at indiannavy nic in details here snk