भारतीय नौदलात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण भारतीय नौदल अकादमी येथे लवकरच काही जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. याबाबतची अधिसूचना नौदल विभागाकडून जारी करण्यात आली असून त्यानुसार २४८ जागांवर ट्रेडसमन या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पात्र आणि इच्छुक उमेदवार भारतीय नौदल स्किल्ड ट्रेडसमन भरती २०२३ साठी joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. हे अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवांची शैक्षणिक पात्रता, महत्वाची आणि आवश्यक कागदपत्र, अर्ज करण्याची प्रक्रिया याबाबतची माहिती जाणून घेऊया.

भारतीय नौदल स्किल्ड ट्रेडसमन भरती २०२३ साठी नौदलाकडून २४८ जागांवर भरती केली जाणार आहे. तर ट्रेड्समन या पदासाठी ही भरती होत आहे.

हेही वाचा- मंदीदरम्यान नोकरीची सुवर्णसंधी! ‘ही’ भारतीय कंपनी २५ हजार लोकांना देणार नोकरी; जाणून घ्या तपशील

शैक्षणिक पात्रता –

भारतीय नौदलात ट्रेड्समन या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलेलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ITI पर्यंत शिक्षण पुर्ण झालेलं असणं आवश्यक आहे. यासह उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं गरजेच आहे.

अर्ज शुल्क –

हेही वाचा- दहावी बारावी आणि पदवी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी; लवकर अर्ज करा

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य प्रवर्गातील तरुणांना अर्ज शुल्क २०५ रुपये इतके असेल.

अनुसूचित जाती/जमाती/माजी सैनिक आणि महिला उमेदवार यांना अर्ज शुल्क भरावं लागणार नाही.

भारतीय नौदल स्किल्ड ट्रेडसमन भरती २०२३ निवड प्रक्रिया –

भारतीय नौदलातील ट्रेडसमन पदाच्या निवड प्रक्रिया पुढीलप्रमाणे पार पडेल

PDF साठी येथे क्लिक करा –

  • लेखी परीक्षा
  • कागदपत्र पडताळणी
  • वैद्यकीय तपासणी

परीक्षेचा पॅटर्न –

भारतीय भारतीय नौदल स्किल्ड ट्रेडसमन भरती प्रक्रियेतील उमेदवारांनी परीक्षेचा कट ऑफ क्लिअर करणे आवश्यक आहे.

असा करा अर्ज –

  • joinindiannavy.gov.in या वेबसाइटला भेट द्या आणि तिथे तुम्हाला ऑनलाइन अर्ज भरण्याची लिंक मिळेल.
  • ऑनलाईन अर्ज काळजीपूर्वक भरा.
  • महत्वाची आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • आवश्यक फी भरा.
  • भविष्यातील संदर्भासाठी भरलेल्या अर्जाची एक प्रिंट काढून घ्या.
मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian navy tradesman skilled recruitment 2023 10th pass and iti candidates have golden opportunity to join this jap