Indian Railways Recruitment 2024 : अनेकांचे रेल्वे विभागात नोकरी करण्याचे स्वप्न असते. आता रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे तुमचेही स्वप्न पूर्ण होऊ शकते. रेल्वे विभागात नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे नक्कीच आहे. रेल्वेत मेगा भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचनादेखील प्रसिद्ध करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालविता, भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे. ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी आहे. चला तर मग लगेचच करा या भरती प्रक्रियेसाठी अर्ज.

रेल्वे विभागाकडून १०,८८४ पदांवर ही भरती सुरू आहे. त्यामध्ये कनिष्ठ लिपीक, लेखा लिपीक, वरिष्ठ लिपीक, लेखा सहायक, कमर्शियल अप्रेंटिस, स्टेशन मास्तर अशी विविध पदे भरली जातील. मूळात म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अटदेखील पदांनुसार लागू करण्यात आलीये.

Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
success story of utham gowda started his own startup owner of captain fresh company
जास्त पगाराची नोकरी सोडली अन् घेतली ‘ही’ जोखीम, आता आहेत कोटींचे मालक; वाचा उथम गौडा यांचा प्रेरणादायी प्रवास
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
restrictions on sale of railway platform tickets lifted from 9 november
Railway Platform Tickets Available : फलाट तिकीट पुन्हा उपलब्ध
Eat Right Station certification is awarded by FSSAI
रेल्वे स्थानकावर आता बिनधास्त खा! पुणे, कोल्हापूर, साताऱ्यासह १० स्थानके ‘ईट राइट स्टेशन’
Job Opportunity, Central Government Job, Job,
केंद्र सरकारच्या ‘या’ विभागांमध्ये नोकरीची संधी, २३ नोव्हेंबरपर्यंत…
Dnyanradha Multi State Co Operative Credit Society, fraud case, ED
ईडीकडून ३३३ कोटींच्या मालमत्तेवर टाच

फक्त शिक्षणाचीच अट नाही, तर या भरती प्रक्रियेसाठी वयाची अटही लागू करण्यात आलीये. १८ ते ३३ वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. बारावी पास ते पदवीधर उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ५०० रुपये शुल्कही भरावे लागेल. त्यामध्ये प्रवर्गातील उमेदवारांना थोडी सवलत देण्यात आलीये.

रिक्त जागा तपशील

एकूण पदे – १०८८४

पदवीपूर्व पदे – ३४०४

पदवीधर पदे – ७४७९

पोस्ट तपशील

कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक – ९९० पदे

लेखा लिपिक सह टंकलेखक – ३६१ पदे

ट्रेन क्लर्क – ६८ पदे

कमर्शियल कम तिकीट लिपिक – १९८५ पदे

हेही वाचा >> Success Story: २००० उधार घेऊन सुरू केली कंपनी, आज आहे ₹२६०००० कोटींचा व्यवसाय; कहाणी दिलीप सांघवींची

पदवीधर पदांचा तपशील

गुड्स ट्रेन मॅनेजर – २६८४ पदे

चीफ कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्षक – १७३७ पदे

वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक – ७२५ पदे

कनिष्ठ खाते सहाय्यक सह टंकलेखक – १३७१ पदे

स्टेशन मास्तर – ९६३ पदे

indianrailways.gov.in. या साईटवर जाऊन उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी अर्ज करता येईल. मात्र, अजून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली नाहीये. लवकरच भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी प्रक्रिया सुरू होईल. indianrailways.gov.in. या साईटवर सविस्तर माहिती मिळेल.