नागरी सेवा परीक्षेच्या माध्यमातून २३ सेवांसाठी अधिकाऱ्यांची निवड होते. आजच्या लेखात आपण काही केंद्रीय सेवांबद्दलची माहिती घेणार आहोत.

गेल्या वेळच्या लेखात  IAS,  IPS,  IFS, या सेवांबद्दलची माहिती दिली होती. तसंच आयएएस आणि आयपीएसचे कॅडर प्रेफरन्स कसे भरायचे हेदेखील आपण पाहिलं. आजच्या लेखात आपण इतर काही सव्‍‌र्हिसेसची माहिती घेणार आहोत. पूर्वी सांगितल्याप्रमाणे, नागरी सेवा परीक्षेच्या माध्यमातून २३ सेवांसाठी अधिकाऱ्यांची निवड होते. आजच्या लेखात आपण काही केंद्रीय सेवांबद्दलची माहिती घेणार आहोत.

private hospital news in marathi
राज्यभरातील खासगी रुग्णालयांची झडती… आरोग्य मंत्र्यांच्या सूचनेनंतर आता…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
CET exam applications marathi news
सीईटीचे अर्ज भरण्यासाठी अजून एक संधी, दुसऱ्यांदा मुदतवाढ; पाच अभ्यासक्रमांचे अर्ज १० फेब्रुवारीपर्यंत भरता येणार
Maharashtra FM Ajit Pawar on state budget
राज्याच्या अर्थसंकल्पात ‘लाडक्या बहिणी’, सामान्य नागरिक केंद्रबिंदू; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा
rules for RTE admissions Change, Committee Education Department
आरटीईच्या प्रवेशांसाठीच्या नियमांमध्ये होणार बदल… शिक्षण विभागाकडून समितीची स्थापना
10th exam, 12th exam, Maharashtra state board ,
राज्य मंडळाचा मोठा निर्णय… दहावी, बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्यास केंद्रांची मान्यता कायमस्वरुपी रद्द
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…
chief minister devendra fadnavis appointment of ministers staff swearing ceremony
मंत्र्यांच्या शपथविधीला दीड महिना होऊनही कर्मचारी नियुक्ती प्रलंबित असल्याने अडचणी

भारतीय राजस्व सेवा

आयआरएस (इंडियन रेव्ह्येन्यू सव्‍‌र्हिस) यात आणखी दोन प्रकार आहेत. एक आहे आयआरएस-आयटी म्हणजेच इन्कम टॅक्स आणि दुसरी आहे कस्टम अँड इन्डायरेक्ट टॅक्सेस. या दोन्ही सेवा टॅक्सेशनशी संबंधित आहेत. आयआरएस- आयटीमध्ये आयकर तर कस्टम अँड इन्डायरेक्ट सेवेमध्ये कस्टम डय़ुटी आणि जीएसटी कलेक्शनसाठीचे काम प्रामुख्याने असते. कस्टम सेवेतील अधिकाऱ्यांना देशातून आणि विदेशातून होत असलेला अमली पदार्थाचा अवैध व्यापार, छुप्या मार्गाने आणले जात असलेले सोने व किमती वस्तू, वन्य जीव कायद्याच्या अन्वये निषिद्ध असलेले प्राणी, पक्षी वा त्यांची कातडी, पंख इत्यादीचा अवैध व्यापार रोखण्यासाठी महत्वाची जबाबदारी सुपूर्द केली जाते. सुरुवातीला सहाय्यक आयुक्त, उपायुक्त, सहआयुक्त,आयुक्त, मुख्य आयुक्त, प्रधान मुख्य आयुक्त अशा पदांवर ह्या सव्‍‌र्हिसेसमध्ये असणारे अधिकारी काम करतात.

कर मंडळांतील सेवा

कस्टम अँड इन्डायरेक्ट सेवेमध्ये जर कस्टम विभागात नियुक्ती असेल तर सहाय्यक आणि उपआयुक्त रँकपर्यंत युनिफॉर्मदेखील असतो. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ  आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळ  या मंडळांचे सदस्य आणि अध्यक्ष म्हणूनही काम करण्याची संधी या सेवांमधल्या अधिकाऱ्यांना मिळते. या सेवांमधल्या अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगही महत्त्वाच्या शहरांमधूनच होतात. छोटय़ा गावांमध्ये, तालुक्यांमध्ये पोस्टिंग नसतात. कस्टम्स सव्‍‌र्हिसमधल्या अधिकाऱ्यांना देशातल्या मुख्य शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळे, बंदरांच्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळू शकते. उदाहरणार्थ दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगलोर, हैद्राबाद विमानतळ आणि न्हावाशेवा, कांडला, विशाखापट्टणम सारखी बंदर इत्यादी. देशासाठी कर वसुलीचे महत्वाचे काम या सव्‍‌र्हिसच्या अधिकाऱ्यांमार्फत होत असते. कर रचना ठरवणे, करवसुलीचे दर ठरवणे यासारख्या धोरणात्मक कामाचा अनुभवही या सव्‍‌र्हिसेसमधल्या अधिकाऱ्यांना मिळू शकतो. या दोन्ही विभागांमध्ये गेल्या काही वर्षांत संगणक आणि संबंधित तंत्रज्ञानांचा खूप वापर व्हायला लागला आहे. हे एक वेगळय़ा स्वरूपाचं आव्हानात्मक काम अधिकाऱ्यांना करायची संधी मिळत आहे. सक्तवसुली संचालनालय , महसूल गुप्तचर संचालनालय, अमली पदार्थ नियंत्रण विभाग  मध्ये प्रतिनियुक्तीवरही या सेवेतील अधिकाऱ्यांना उत्तम काम करण्याची संधी मिळते. भारतीय आयकर सेवेतील (IRS IT) अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण नागपूरस्थित नॅशनल अकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेसमध्ये होते तर आयआरएस, कस्टम आणि इन्डायरेक्ट टॅक्सेस सर्विस मधील अधिकाऱ्यांना आंध्र प्रदेश राज्यातील पालासमुद्राम आनंतपुर जिल्हा येथील  NACIN संस्थेत प्रशिक्षण दिले जाते आहे. आयपीएस सेवेत फारसा रस नसलेले परीक्षार्थी आयएएस/आयएफएसनंतर आयआरएसच्या वरील दोन सेवांना प्राधान्यक्रम देताना दिसत आहेत.

भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा सेवा

या सेवानंतर प्राधान्यक्रम दिली जाणारी सव्‍‌र्हिस आहे – भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा सेवा  या सेवेच्या नावावरून आपल्या लक्षात येईल की लेखापरीक्षण आणि लेखा ही दोन महत्वाची कामं ह्या सव्‍‌र्हिसमधल्या अधिकाऱ्यांना करावी लागतात. ह्या सव्‍‌र्हिसचा सर्वात मोठा फायदा हा मानला जातो की इथे बढती एकदम वेळेवर (नियमानुसार) होते. या सव्‍‌र्हिसच्या अधिकाऱ्यांची पोस्टिंग्स, प्रमोशन हे सर्व भारताचे महालेखापाल  (कॅग)करतात. या सव्‍‌र्हिसची सगळी मॅनेजमेंट इतर कुठच्या मंत्रालयावर अवलंबून नाही. कॅग  ह्या पदाचा भारताच्या राज्यघटनेत उल्लेख आहे. लेखा या कामाचाही राज्यघटनेने उल्लेख केलेल्या सेवांमध्ये समावेश आहे. याही सव्‍‌र्हिसच्या अधिकाऱ्यांची पोस्टिंग ही  राज्याची राजधानी किंवा इतर महत्वाच्या शहरांमध्येच होतात. विदेशातही ह्या सव्‍‌र्हिसेसच्या काही पोस्ट असतात. उदाहरण म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाचे अमेरिकेतील न्यूयॉर्कस्थित मुख्यालय. सरकारची मंत्रालयं, सार्वजनिक उपक्रम, महत्वाच्या घटना यांचं ऑडिट करण्याची संधी अधिकाऱ्यांना मिळते. प्रत्येक राज्यामध्ये अकाऊंटन्ट जनरलचे कार्यालय असतं. या कार्यालयांमध्ये भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा सेवाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती होते. राज्यांचे अकाउंट तयार करण्याचं कामही या कार्यालयामार्फत होतं. राज्याची आणि केंद्र सरकारची अकाउंट्स कशी तयार करायची, लेखा प्रक्रिया काय ठेवायची, सरकारी लेखा मानके ठरवायची या कामातही ह्या अधिकारम्यांचा मोठा सहभाग असतो. रेव्हेन्यू सव्‍‌र्हिस काय किंवा ऑडिट अकाउंट्स सव्‍‌र्हिस काय, कामाचं स्वरूप हे मुख्यत: कार्यालयीन असंच आहे. पोस्टिंग शहरी स्वरूपाचीच आहेत, त्यामुळे मुलांची शिक्षणं किंवा राहणीमानाच्या सुविधा यांचा अभाव नसतो. वर्क लाईफ बॅलन्ससाठी वरील तीनही सेवा उत्तम उदाहरण आहे.

भारतीय रेल्वे सेवा

आणखी एक सव्‍‌र्हिसेसचा गट आहे रेल्वे सव्‍‌र्हिसेसचा. रेल्वेच्या ४ सव्‍‌र्हिसेस आहेत, रेल्वे ट्रॅफिक, रेल्वे अकाउंट्स , रेल्वे पर्सोनेल आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्स. रेल्वे हि भारतातली एक मोठी यंत्रणा आहेत. ह्यातल्या कुठच्याही सेवेत निवड झाली तर रेल्वेचा जो झोन मिळेल त्या झोनमधल्या वेगवेगळय़ा ठिकाणी पोस्टिंग होऊ शकतात. त्या व्यतिरिक्त रेल्वे बोर्डमध्ये दिल्लीत पोस्टिंग होऊ शकतात. रेल्वेचे स्वत:चे क्वार्टर्स सर्वच ठिकाणी असतात आणि एखाद्या ठिकाणी पोस्टिंग/ ट्रान्स्फर झाल्यावर रेल्वे कॉलनीत घर मिळतं. रेल्वेच्या ज्या ४ सेवांची नावं वर लिहिली आहेत त्यातल्या अकाउंट्स आणि पर्सोनेल ह्या प्रामुख्याने ऑफिस सव्‍‌र्हिसेस आहेत. म्हणजे बहुतेक वेळा काम हे ऑफिसमध्ये असतं. रेल्वे ट्राफिक सव्‍‌र्हिसमध्ये नावावरून आपल्या लक्षात येईल की रेल्वेच्या ऑपरेशन्स मध्ये ह्या अधिकाऱ्यांचा सहभाग असणार आणि त्यामुळे फिल्डमध्ये काम असणार. उदाहरणार्थ ट्रेनचा एखादा अपघात झाला तर त्याबद्दल चौकशी करणं , अपघातस्थळी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करणं ही कामंही अधिकाऱ्यांना करावी लागू शकतात.

रेल्वे प्रोटेक्शन फोर्स या नावावरूनच आपल्याला कळू शकतं की रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी आणि रेल्वेच्या प्रॉपर्टीची जबाबदारी यांच्यावर असते. आरपीएफ  ही युनिफॉर्म सव्‍‌र्हिस आहे आणि या सेवेचे महासंचालक हे भारतीय पोलीस सेवेतून नियुक्त केले जातात. राज्यातील रेल्वे पोलीस आणि केंद्रातील आरपीएफ अधिकाऱ्यांना समन्वयाने काम करावे लागते आणि कामाची विभागणी ही निश्चित केलेली असते. हा सुद्धा फिल्ड जॉब झाला. २०२५ च्या यूपीएससी सिव्हिल सव्‍‌र्हिसेस नोटिफिकेशन अन्वये रेल्वे व्यवस्थापन सेवांमध्ये आता

रेल्वेच्या प्रत्येक सव्‍‌र्हिसच्या व्हेकन्सी वेगवेगळय़ा निर्देशित केल्या आहेत.

चार सेवांपैकी रेल्वे ट्रॅफिक सव्‍‌र्हिसला (आयआरटीएस) उर्वरित तीन सव्‍‌र्हिसेसच्या वर प्राधान्यक्रम दिला जातो. रेल्वे व्यतिरिक्त अकाऊंटिंग सव्‍‌र्हिसेसचा एक मोठा ग्रुप आहे, त्याबद्दल पुढच्या लेखात.

mmbips@gmail.com                      

supsdk@gmail.com

Story img Loader