संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या प्रक्रियेत व्यक्तिमत्त्व चाचणी किती महत्वाची आहे हे गेल्या आठवड्यात आपण पाहिलं. आता या व्यक्तिमत्त्व चाचणीचा आधार काय असतो हे पाहूया. म्हणजे व्यक्तिमत्व चाचणी घेणाऱ्या पॅनलकडे उमेदवाराची काय माहिती असते ते जाणून घेऊया. नागरी सेवा परीक्षेच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यावर जे उमेदवार व्यक्तिमत्त्व चाचणीसाठी पात्र झालेले असतात त्यांना, Detailed Application Form 2 भरावा लागतो कारण DAF 1 हा पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर लगेचच केंद्रीय लोकसेवा आयोगाला भरून पाठवता येतो. DAF 1 मध्ये पुन्हा काही दुरुस्ती करता येत नाही. DAF 2 हा अशासाठी महत्त्वाचा असतो, कारण याची कॉपी व्यक्तिमत्त्व चाचणी घेणाऱ्या पॅनलच्या सर्वच सदस्यांकडे असते तर चेअरमनकडे DAF 1 ची देखील कॉपी असते. त्यामुळे DAF 2 मध्ये तुम्ही जे जे लिहिलेलं असेल त्या प्रत्येक शब्दावर प्रश्न विचारण्याची संधी उमेदवार पॅनलला देत असतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुख्य परीक्षेच्या निकालानंतर संघ लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर DAF 2 भरण्याची लिंक उपलब्ध केली जाते. ही लिंक एखादा आठवडा उपलब्ध असते, पण उमेदवारांनी शेवटच्या दिवसापर्यंत थांबू नये. लिंक उपलब्ध झाल्यावर दोन-तीन दिवसा७त DAF 2 भरावा. या डिटेल अॅप्लिकेशन फॉर्मबरोबर काही कागदपत्रेसुद्धा अपलोड करायची असतात. ती कागदपत्रं कुठची आहेत हे माहीत करून घेतलं पाहिजे आणि त्याच्या सॉफ्ट कॉपी अपलोड करण्यासाठी तयार ठेवल्या पाहिजेत. एकदा का हा फॉर्म सबमिट झाला की त्यात बदल करता येत नाहीत हे लक्षात ठेवून फॉर्म काळजीपूर्वक भरला पाहिजे. DAF अपलोड केल्यावर त्याची एक प्रिंट घेऊन ठेवली पाहिजे. याचा व्यक्तिमत्त्व चाचणीच्या तयारीला उपयोग होतो. DAF 2 ची प्रत आणि त्याबरोबर अपलोड केलेली डॉक्युमेंट्सच्या ओरिजिनल व्यक्तिमत्त्व चाचणीला घेऊन जाव्या लागतात.
हेही वाचा >>> नोकरीची संधी
DAF 2 मध्ये काय काय माहिती भरायची असते ते पाहूया. एक भाग असतो वैयक्तिक माहितीचा. यात आपलं नाव, जन्मतारीख,पत्ता, आई-वडिलांचं नाव, ईमेल इत्यादी माहिती भरायची असते. त्यानंतर पालकांची माहिती भरायची असते. यात पालकांचे नाव, नोकरी/व्यवसाय याचे तपशील, त्यांचा पत्ता, त्यांचे आर्थिक उपन्न हे तपशील भरायचे असतात. उमेदवाराला दहावीपासूनचे शिक्षणाचे तपशील भरायचे असतात. त्यात शाळा/ कॉलेज / विद्यापीठ यांचे नाव, परीक्षा पास झालेले वर्ष, परीक्षेत असणारे विषय, मार्क्स/क्लास किंवा CGPA हे लिहायचे असते. नंतर नोकरीचा अनुभव असेल तर त्याबद्दल लिहायचे असते. नोकरीचे ठिकाण, नोकरीचे स्वरूप, केव्हापासून केव्हापर्यंत नोकरी केली हे नमूद करायचे असते. नंतर एक भाग असतो ज्यामध्ये ४ कॉलम असतात – a) Prizes, medals scholarship, b) Sports/ NCC, c) Position of Distinction leadership held in school/ college, d) Extra curricular activities and interests (such as hobbies) उमेदवाराला मिळालेली पारितोषिके/ स्कॉलरशिप याबद्दल लिहिता येते, त्याचबरोबर extra curricular activities किंवा काही नेतृत्वगुण (leadership) दाखवले असतील तर त्याबद्दल लिहिता येते. NCC/ sports अशा काही activities केल्या असतील तर त्याबद्दल लिहायला जागा असते. त्यानंतर छंद, आवडनिवड (hobbies/ interest areas) याबद्दलही लिहायला वाव असतो. वैयक्तिक माहितीतील हा भाग व्यक्तिमत्त्व चाचणीच्या तयारीसाठी फार महत्वाचा असतो. या सेक्शनमध्ये काळजीपूर्वक आणि प्रामाणिकपणे माहिती भरली पाहिजे. ज्या विषयावर पॅनलने आपल्याला प्रश्न विचारावे असे उमेदवाराला वाटत असेल ते मुद्दे ह्या भागात जरूर लिहिले पाहिजेत.
हेही वाचा >>> चलनी नोटा, वस्त्राचा तुकडा आणि भारतीय थाळी विविधतेत एकतेचं प्रतीक कसं ठरतात?
यानंतर All India Services (आयएएस आणि आयपीएस) च्या कॅडर झोन चे प्राधान्यक्रम (preference) लिहायचे असतात. कॅडर झोन लिहिण्यापूर्वी होम स्टेट आणि होम कॅडर स्वीकारणार की नाही याचे उत्तर yes किंवा no असे द्यायचे असते. त्यानंतर सर्व्हिसेसचे प्राधान्यक्रम लिहायचे असतात. या फॉर्मबरोबर शैक्षणिक पात्रता, जन्मतारखेचा पुरावा, OBC/ EWS / PD अशा कुठल्या कॅटेगरीत अॅप्लिकेशन असेल तर त्याचा पुरावा जोडावा लागतो. Physical Disability category मध्ये अॅप्लिकेशन करत असल्यास त्याबद्दलचे सगळे निकष व्यवस्थित माहिती करून घेतलेले असले पाहिजेत आणि त्यानुसार योग्य त्या हॉस्पिटल किंवा संस्थेकडून त्याविषयीचे प्रमाणपत्र मिळवले पाहिजे. OBC संदर्भातलेही सर्व निकष व्यवस्थित माहिती करून घेऊन त्यानुसार कागदपत्र अपलोड केली पाहिजेत.
DAF 2 ही एकप्रकारे उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज घेता येईल अशी खिडकी आहे. ही खिडकी किती रुंद ठेवायची, यातून कुठच्या गोष्टी पॅनलच्या नजरेला आणून द्यायच्या हा निर्णय उमेदवाराने घ्यायचा असतो. DAF2 आधी रफ लिहून काढावा, काही जाणकार व्यक्तींशी, मेन्टर्सशी त्याबाबत सविस्तर चर्चा करावी आणि मगच तो फायनल करून अपलोड करावा. DAF 2 भरताना काय चुका होऊ शकतात, काय गोष्टी केल्या पाहिजेत आणि काय टाळल्या पाहिजेत याबद्दल सविस्तर माहिती पुढच्या आठवड्यात.
(महेश मुरलीधर भागवत तेलंगणचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आहेत)
mmbips@gmail. com
(सुप्रिया देवस्थळी या संयुक्त महालेखा नियंत्रक, ICAS आहेत) supsdk@gmail.com