प्रवीण निकम

मित्रांनो आपण मागच्या अनेक लेखांमध्ये उच्च शिक्षणाचे महत्त्व, गरज, त्यासाठीची लागणारी कौशल्ये करावयाच्या अनेक गोष्टी याविषयी सातत्याने चर्चा करत आहोत. या उच्च शिक्षणाच्या वाटचालीत शिष्यवृत्ती हा महत्त्वाचा भाग आहे. आपण बोलणार आहोत अशाच काही शिष्यवृत्यांबाबत ज्या तुमचा उच्च शिक्षणाचा प्रवास सुखकर करायला हातभार लावतील. आज आपण जाणून घेणार आहोत इनलाक्स शिवदासनी फाऊंडेशन कडून दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती बद्दल.

१९७६ पासून, इनलाक्स शिवदासानी शिष्यवृत्ती ४८० हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांना यूएसए, यूके आणि युरोपियन संस्थांमध्ये पूर्ण-वेळ मास्टर्स, एमफिल किंवा डॉक्टरेट प्रोग्राममध्ये करण्यासाठी मदत करते. यात प्रोग्राम, ट्यूशन, राहण्याचा खर्च, आरोग्यसेवा आणि विद्यार्थ्यांचे एकेरी विमान भाडे इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. ज्याचा खर्च अंदाजे युएसडी १००,००० पर्यंत असतो जो संस्था उचलते. उच्च शिक्षणासाठी मदत देणाऱ्या या फाऊंडेशनची इम्पीरियल कॉलेज, लंडन, रॉयल कॉलेज ऑफ आर्ट (RCA), लंडन, केंब्रिज विद्यापीठ (केंब्रिज ट्रस्ट), किंग्ज कॉलेज लंडन (पीएचडी विद्यार्थ्यांसाठी) आणि हर्टी स्कूल, बर्लिन अशा विविध नामांकित विद्यापीठांसोबत संयुक्त-शिष्यवृत्ती व्यवस्था आहे.

Loksatta lokrang Birth centenary year of Dr Wankhade pioneer of Dalit literary movement
दलित साहित्य चळवळीचे प्रवर्तक
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
PET, LLM, Admit Card, Pre-Entrance Exams,
‘पेट’ आणि ‘एलएलएम’ प्रवेशपूर्व परीक्षांचे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध, विविध केंद्रावर १७ नोव्हेंबरला ऑनलाईन परीक्षा
GAIL India Recruitment 2024
GAIL India Recruitment 2024 : सिनिअर इंजिनिअरच्या पदासाठी मागवले अर्ज, १,८०,०००पर्यंत मिळू शकतो पगार
education opportunities admission to master of science programs at radiation medicine centre barc
शिक्षणाची संधी : बीएआरसीमध्ये ‘मास्टर ऑफ सायन्स प्रोग्राम’
Nurses without pay for four months Mumbai print news
परिचारिका चार महिने वेतनाविना
grse recruitment 2024 opportunities in indian education sector
शिक्षणची संधी : ‘जीआरएसई’ मध्ये संधी
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?

हेही वाचा…नोकरीची संधी : नवोदय विद्यालय समितीतील भरती

आता अर्थात तुम्हाला प्रश्न पडेल की, या फाऊंडेशनकडून नक्की कोणत्या-कोणत्या विषयांमध्ये उच्च शिक्षण करण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. तर यामध्ये सामाजिक विज्ञान, सार्वजनिक धोरण, कला आणि मानविकी विद्याशाखा. त्याच बरोबर इंपीरियल कॉलेज, लंडन येथे अभियांत्रिकी आणि नैसर्गिक विज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या अर्जांचा विचार केला जातो. त्यासोबात डॉक्युमेंटरी फिल्म मेकिंग व वेस्टर्न शास्त्रीय गायनाचा अभ्यास करणाऱ्या अर्जांचा विचार करतो. थोडक्यात आपल्या पठडीच्या अभ्यासक्रमापेक्षा थोड्या वेगळ्या शाखांचा यात विचार केला गेला आहे असे म्हटले तर ते चुकीचे होणार नाही.

यासाठी असणारे पात्रता व निकष आता बघूया.

१. १ जानेवारी १९९४ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या आणि भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी धारण केलेले सर्व भारतीय पासपोर्ट धारक जे अर्जाच्या वेळी भारतात रहिवासी आहेत. असे विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतील. तुम्ही पदवीच्या अंतिम वर्षात असाल आणि निकालाची वाट पाहत असाल, तरी देखील तुम्ही अर्ज करण्यास पात्र आहात.
२. ज्या उमेदवारांनी परदेशातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून चांगली अंडरग्रॅज्युएट पदवी घेतली आहे आणि त्यांनी सतत वास्तव्य केलेले असेल किंवा नोकरी केली असेल त्यासोबत अंडर-ग्रॅज्युएशननंतर किमान दोन वर्षे भारतात शिक्षण घेतले असे विद्यार्थी देखील यासाठी पात्र आहेत.

हेही वाचा…UPSC ची तयारी :विज्ञान आणि तंत्रज्ञान

यासाठी आवश्यक किमान टक्केवारी/ग्रेड –

१. सामाजिक विज्ञान, मानविकी, कायदा, ललित कला, आर्किटेक्चर आणि संबंधित विषयांसाठी, उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून किमान शैक्षणिक ग्रेड ६५ टक्के, CGPA ६.८/१०, किंवा GPA २.६/४ असणे आवश्यक आहे.
२. गणित, विज्ञान, पर्यावरण आणि संबंधित विषयांसाठी, उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून किमान शैक्षणिक ग्रेड ७० टक्के, CGPA ७.२/१०, किंवा GPA २.८/४ असणे आवश्यक आहे. अशा गुणांसह तुम्ही या विविध कोर्ससाठी इनलाक्स शिवदासानी शिष्यवृत्ती मिळविण्यास पात्र आहात.

इनलाक्स शिवदासानी शिष्यवृत्तीसाठीची निवड प्रक्रिया आता समजून घेऊ या.

शिष्यवृत्तीसाठी यशस्वी अर्ज निवडण्यासाठी स्वतंत्र, इनलॅक्स निवड समिती नेमण्यात आली आहे.
अर्जदारांचे मूल्यांकन केवळ त्यांच्या भूतकाळातील आणि वर्तमान यशावरच नव्हे तर त्यांच्या भविष्यातील संभाव्यतेवर देखील केले जाते. कला आणि डिझाइन (ललित/परफॉर्मिंग आर्ट्स) मध्ये शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे प्रामुख्याने त्यांच्या पोर्टफोलिओवर मूल्यांकन केले जाईल.

हेही वाचा…NLC Recruitment 2024 : NLC इंडिया लिमिटेडमध्ये होणार ‘या’ पदांवर मोठी भरती! पाहा माहिती

निवड प्रक्रियेचे तीन टप्पे असतात

(१) पात्र अर्जांचे पुनरावलोकन
(२) पुनरावलोकनातून निवडलेल्या उमेदवारांच्या ऑनलाइन प्राथमिक मुलाखती आणि
(३) प्राथमिक मुलाखतीत यशस्वी झालेल्यांची अंतिम वैयक्तिक मुलाखत.
यासाठी विद्यार्थ्यांनी काही खास गोष्टींची मात्र काळजी व खबरदारी घ्यायची आहे. उमेदवारांना त्यांच्या ऑफर लेटरचा सशर्त भाग म्हणून इंग्रजी भाषेचे प्रमाणपत्र आहे त्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यापूर्वी ते प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे. उमेदवारांना प्रवेशाची स्थगित ऑफर प्राप्त झाली आहे त्यांच्याकडे २०२४ शिष्यवृत्तीसाठी पात्र होण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी वैध ऑफर असणे आवश्यक आहे. परदेशातील संस्थेतून पदव्युत्तर पात्रता (उदा. पदव्युत्तर किंवा पीएचडी) असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत. जे उमेदवार आधीच शिकत आहेत किंवा परदेशातील संस्थेत त्यांचे पदव्युत्तर शिक्षण सुरू केले आहे ते अर्ज करण्यास पात्र नाहीत. या शिष्यवृत्तीबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही www. inlaksfoundation. org वर जाऊन अधिक माहिती घेऊ शकता.