IBPS Clerk Recruitment 2024 : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (The Institute of Banking Personnel Selection) म्हणजेच आयबीपीएस (IBPS)ने CRP लिपीक XIV साठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. BPS ने भारतातील ११ सार्वजनिक क्षेत्रांतील बँकांमध्ये २०२५-२६ या वर्षासाठी एकूण ६,१२८ रिक्त जागांसाठी ही भरती आयोजित केली आहे. अर्ज प्रक्रिया १ जुलैपासून सुरू झाली असून, इच्छुक व पात्र उमेदवार https://ibps.in/ या वेबसाइटवरून ऑनलाइन पद्धतीने २१ जुलै २०२४ पर्यंत अर्ज करू शकतात. तर या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यदा, अर्ज शुल्क, अर्ज असा करायचा याबद्दल सविस्तर जाणून घेऊ…

IBPS Clerk Recruitment 2024 : उमेदवाराची पात्रता –

Niv Recruitment 2024 Notification National Institute Of Virology Jobs 31 Vacancies Trade Apprentice Apply Now pune job
पुण्यात नोकरीची सुवर्णसंधी; पुण्यातील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी’ संस्थेत विविध पदांसाठी भरती; कसा कराल अर्ज जाणून घ्या
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
NFL Recruitment 2024 National Fertilizers Limited Recruitment 2024
NFL Recruitment 2024: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी नो टेन्शन; ‘नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड’मध्ये ३४९ जागांसाठी भरती
recruitment of total 480 posts under various departments in maharashtra govt
नोकरीची संधी : शासनाच्या विभागांत नोकरीची संधी
The All India Council of Technical Education has developed a model scheme for the AICT BBA course pune news
‘बीबीए’साठीचा आता नवा अभ्यासक्रम… काय आहे नव्या अभ्यासक्रमात? 
PGCIL Trainee Recruitment 2024 Applications begin for 795 posts link to register here
PGCIL Trainee Recruitment 2024: ७९५ पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया आणि शेवटची तारीख
Jiva Pandu Gavit, Jiva Pandu Gavit latest news,
जे. पी. गावित चार कोटींचे धनी, सहा महिन्यांत २५ लाखांपेक्षा अधिकची भर
ONGC Bharti 2024
ONGC Bharti 2024 : १०वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची संधी! ONGC अंतर्गत २२३६ पदांची भरती सुरू; जाणून घ्या, किती मिळणार पगार ?

अर्ज करणारा उमेदवार भारताचा नागरिक असावा.

IBPS Clerk Recruitment 2024 : पगार व शैक्षणिक पात्रता –

अर्ज करणाऱ्या उमेदवाराने पगार व शैक्षणिक पात्रता यांच्या माहितीसाठी अधिसूचना तपासून घ्यावी.

लिंक – https://www.ibps.in/wp-content/uploads/CRP_Clerks_XIV_Final_Notification_28.6.24.pdf

IBPS Clerk Recruitment 2024 : वयोमर्यादा –

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २० ते २८ वर्षे यादरम्यान असावे.

हेही वाचा…Success Story : मायक्रोसॉफ्टची नोकरी सोडली, एका घटनेनं बदललं आयुष्य; वाचा आरामदायी प्रवास सेवा पुरविणाऱ्या ओला कंपनीच्या संस्थापकाची गोष्ट

IBPS Clerk Recruitment 2024 : अर्ज शुल्क –

एससी / एसटी / पीडब्ल्यूबीडी / डीईएसएम उमेदवारांसाठी १७५, तर इतर सर्व उमेदवारांसाठी ८५० रुपये (जीएसटीसह) अर्ज शुल्क असणार आहे.

IBPS Clerk Recruitment 2024 : अर्ज कसा कराल?

१. सर्वप्रथम IBPS च्या अधिकृत वेबसाइट ibps.in वर जा.
२. होम पेजवर तुम्हाला ‘CRP Clerks’ असा मजकूर लिहिलेला दिसेल.
३. नंतर ‘CRP- Clerks (CRP-Clerks-XIV)’साठी ऑनलाइन अर्ज करण्याकरिता तेथे दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
४. अर्जाची नोंदणी करण्यासाठी तुम्हाला ‘क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन’वर क्लिक करावे लागेल.
५. उमेदवारांनी स्क्रीनवर दिसणारा नोंदणी क्रमांक व पासवर्ड लक्षात ठेवावा. तात्पुरती नोंदणी क्रमांक व पासवर्ड दर्शविणारा ईमेल आणि एसएमएसदेखील पाठविला जाईल.
६. डॉक्युमेंट्स अपलोड करा – फोटो, स्वाक्षरी, डाव्या अंगठ्याचा ठसा आदी.
७. नोंदणी प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना वेबकॅम किंवा मोबाईल फोनद्वारे त्यांचे फोटो काढून अपलोड करणे आवश्यक आहे.
८. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज काळजीपूर्वक भरावा. कारण- ऑनलाइन अर्जामध्ये भरलेल्या कोणत्याही डेटामध्ये नंतर बदल करता येणार नाही.
९. ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी, उमेदवारांनी ऑनलाइन अर्जातील ॲप्लिकेशनची पडताळणी करण्यासातठी “सेव्ह आणि नेक्स्ट” सुविधेचा वापर करावा.
१०. त्यानंतर उमेदवार डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, IMPS, कॅश कार्ड्स/मोबाइल वॉलेट्स/UPI वापरून अर्ज शुल्क भरावे.
व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर, एक ई-पावती तयार होईल.
११. त्यानंतर उमेदवारांनी ई-पावती व ऑनलाइन अर्जाची प्रिंटआउट प्रत घेऊन ठेवावी