ICT Mumbai Bharti 2024: इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी – मुंबई अंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे. त्याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीद्वारे विविध पदांच्या एकूण ११३ जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवार https://www.ictmumbai.edu.in/ या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. तसेच अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १६ एप्रिल असणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ICT Mumbai Bharti 2024: भरतीसाठी आवश्यक रिक्त पदे आणि पदसंख्या, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण यांबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ.

रिक्त पदे आणि पदसंख्या –
प्रोफेसर – ७, असोसिएट प्रोफेसर – १३, असिस्टंट प्रोफेसर – ४१, प्रशासकीय पदे – १२, ग्रंथालयातील पदे – ३, संस्था स्तरावरील पदे – १, संस्था प्रयोगशाळांमधील – २५, संस्था कार्यशाळेतील पदे – ११ आदी ११३ रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम राबविण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण – मुंबई

वयोमर्यादा – ५५ वर्षे

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून, प्रयोगशाळा अटेंडन्ट पदासाठी अर्ज करणारा उमेदवार विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण असावा; तर प्रयोगशाळा असिस्टंट पदासाठीचा उमेदवार विज्ञान शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा.

हेही वाचा…Thane Police Bharti 2024 : पोलीस विभागात नोकरी करण्याची संधी! बारावी उत्तीर्ण करू शकतात अर्ज, जाणून घ्या सविस्तर

पात्र उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
लिंक –
https://shorturl.at/dqsN7

अशा प्रकारे इच्छुक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Institute of chemical technology ict mumbai recruitment apply online 113 vacancies are available to fill posts asp