IIPS Mumbai Bharti 2024: आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेच्या (International Institute for Population Sciences Mumbai) मुंबई विभागात रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेवार iipsindia.ac.in या अधिकृत वेबसाईटद्वारे ३० एप्रिलपूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. भरतीसाठी आवश्यक रिक्त पदे व पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, पगार याबद्दल या लेखातून अधिक माहिती जाणून घेऊ.

कोणत्या पदासाठी किती जागा? संशोधन अधिकारी – ८ (Research Officer) तर कनिष्ठ संशोधन अधिकारी – २ (Junior Research Officer) म्हणजेच एकूण १० पदांच्या रिक्त जागांसाठी भरतीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

congress mp praniti shinde alleged plastic mixed rice distributed to ration card holders
प्लास्टिक तांदूळ खाण्यास मारक की पोषक? खासदार प्रणिती शिंदे यांच्या आरोपाने वाद; प्रशासनाचा अनुकूल दावा
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
lokmanas
लोकमानस: दशकभरात चीनबाबत धोरणलकवा
obc pre matric scholarship fund
ओबीसी प्रीमॅट्रिक शिष्यवृत्तीचा १६ कोटींहून अधिकचा निधी परत का गेला?
Solapur flight service will have to wait till December
सोलापूर विमानसेवेसाठी डिसेंबरपर्यंत करावी लागणार प्रतीक्षा
UPSC Preparation International Association
upsc ची तयारी: आंतरराष्ट्रीय संघटना
Sensex hits two century high
‘फेड’च्या व्याजदर कपातीनंतर निर्देशांकांची उच्चांकी मुसंडी, सेन्सेक्सची दोन शतकी उसळी
Interest rate rbi marathi news
रिझर्व्ह बँकेकडून २०२४ मध्ये तरी व्याजदरकपात शक्य नाही : स्टेट बँक

शैक्षणिक पात्रता –

१. संशोधन अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने एक वर्षाच्या अनुभवासह डेमोग्राफी / गणित/ सांख्यिकी/ सामाजिक/ विज्ञान या विषयात मास्टर ऑफ फिलॉसॉफी किंवा एमबीबीएस/ बीडीएस/ बीएएमएस/ बीयूएमएस/ बीएचएमएस केलेले असावे.

२.कनिष्ठ संशोधन अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने डेमोग्राफी/गणित/सांख्यिकी/सामाजिक विज्ञानमध्ये पीएच.डी केलेली असावी.

हेही वाचा…NLC Recruitment 2024: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! विविध पदांसाठी भरती सुरु; अर्ज करण्यासाठी फक्त चार दिवस शिल्लक

पगार –

संशोधन अधिकारी (सोशल फिल्ड) उमेदवाराला ४६,००० रुपये, तर संशोधन अधिकारी (ऑफिस) ४७,०००; तर कनिष्ठ संशोधन अधिकारी उमेदवाराला ७६,००० रुपये महिन्याला पगार असेल.

अधिक माहितीसाठी उमेदवाराने खाली जोडलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

लिंक – https://www.iipsindia.ac.in/sites/default/files/job-listing/Advt_NFHS6_JRO_RO_1.pdf

इच्छुक व पात्र उमेदवारांनी लगेचच या प्रक्रियेसाठी अर्ज करावा.