प्रा. रवींद्र कुलकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रा. रमेश यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील शिक्षकांच्या शैक्षणिक कार्यक्रमांच्या संरेखनावर प्रश्न विचारणाऱ्या प्रा. सुशील यांनी यासंदर्भात राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेची ( National council for teacher education- NCTE)  मार्गदर्शक तत्त्वे समजावून देण्याची विनंती केली. प्रा. रमेश म्हणाले,  NEP मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुषंगाने  NCTE ने येत्या शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून संपूर्ण भारतातील निवडक  शासकीय उच्च शिक्षण संस्थांमध्ये चार वर्षांच्या एकात्मिक  B. Ed. च्या प्रायोगिक अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. २२ ऑक्टोबर २०२१ ( F. No.  NCTE –  Regl 011/80/2018 – MS ( Regulation OCT. 26, 2021) – HQ) या अधिसूचनेद्वारे ( Amendment) NCTE ने राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (मान्यता, निकष आणि प्रक्रिया) विनियम २०१४ द्वारे चार वर्षीय एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रमासाठी (ITEP- Integrated Teacher Education Programme) मानदंड आणि मानके अधोरेखित केली आहेत. त्यानुसार, ‘बहुविद्याशाखीय संस्था’ म्हणजे एक योग्य मान्यताप्राप्त उच्च शिक्षण संस्था ज्यामध्ये अभ्यासाचे विविध विषय समाविष्ट आहेत किंवा त्यांना एकत्र केले आहे किंवा एकापेक्षा जास्त विषयांचा समावेश आहे, अशा संस्थांनी शिक्षणाच्या विविध पैलूंमध्ये अत्याधुनिक संशोधन करण्यासाठी शिक्षण विभाग स्थापन करण्याचे उद्दिष्ट असेल. त्याबरोबरच उदारमतवादी कला (liberal arts)/ मानव्य / सामाजिक विज्ञान/ वाणिज्य/ गणित/ विज्ञान विभाग यांच्या सहकार्याने चार वर्षांचा ITEP अभ्यासक्रम चालवणे हेही एक उद्दिष्टय़ असेल. या अधिसूचनेच्या अनुषंगाने,  NCTE ने सार्वजनिक सूचनेद्वारे जाहीर केले आहे की (NCTE  च्या वेबसाइटवर ४ मार्च २०२३ ची बातमी) ५७ संस्थांना एकात्मिक  B.A. B. Ed.,  B. Sc B. Ed.आणि  BCom. B. Ed हे अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

प्रा सुशील यांनी लगेच विचारले, ‘‘महाराष्ट्रात अशा काही संस्था आहेत का ज्यांना परवानगी देण्यात आली आहे?’’ प्रा रमेश यांनी उत्तर दिले, ‘‘महाराष्ट्रात एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रमासाठी (IETP) तीन शासकीय महाविद्यालये/ विद्यापीठ/ संस्था निवडण्यात आली आहेत.’’

‘‘विद्यमान एकल शाखा असलेल्या संस्थांचे रुपांतर आता बहुविद्याशाखीय संस्थांमध्ये करावे लागेल. ते कसे करता येईल?’’, असे प्रा महेश यांना विचारले.

प्रोफेसर रमेश यांनी उत्तर दिले, ‘‘अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण २०२०-२१ (( All India Survey of Higher Education AISHE 2020-21) नुसार भारतात १,००० पेक्षा जास्त विद्यापीठे (१,११३) आणि ४०,००० पेक्षा जास्त महाविद्यालये (४३,७९६) आहेत. त्यापैकी ४० टक्के महाविद्यालये एकल विद्याशाखा चालवतात आणि ६५.१ टक्के महाविद्यालयांमध्ये ५०० पेक्षा कमी विद्यार्थ्यांची नोंदणी आहे. सध्याची १११३ विद्यापीठे आणि ४३,७९६ महाविद्यालये ही सुमारे १५,००० मोठय़ा, अद्ययावत संसाधनांनी युक्त आणि ३००० पेक्षा जास्त  Enrolement असलेल्या अशा बहु-विद्याशाखीय संस्थांमध्ये एकत्रित करणे, तसेच त्यांचे सन २०३५ पर्यंत संशोधन (Research University) अथवा अध्यापन विद्यापीठांत (Teaching Universit) अथवा पदवी प्रदान संस्थेमध्ये (Degree Granting Institution) रूपांतर करण्यासाठी तसेच सन २०३५ पर्यंत संलग्नता प्रणाली  (affiliations) टप्प्याटप्प्याने बंद करणे यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांनी सप्टेंबर, २०२२ मध्ये उच्च शिक्षण संस्था (HEIs) चे बहुविद्याशाखीय संस्थांमध्ये रूपांतरण करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. अशा प्रकारे, बहुविद्याशाखीय उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांच्या स्थापनेसाठी पुढील मार्ग हाती घेतले जाऊ शकतात.

उच्च शिक्षण संस्थांच्या समूहांद्वारे विविध संस्थांमधील शैक्षणिक सहयोग (collaborations) आणि विविध Cluster पद्धतींमध्ये बहुविद्याशाखीय शिक्षण आणि संशोधनाकडे नेणारी पद्धत एकल संस्थांचे इतर बहु-विषय संस्थांसह समान व्यवस्थापन किंवा भिन्न व्यवस्थापनांतर्गत विलीनीकरण (Merging)

एकल शाखीय संस्थांमध्ये भाषा, साहित्य, संगीत, तत्त्वज्ञान, इंडॉलॉजी, कला, नृत्य, रंगमंच, शिक्षण, गणित, सांख्यिकी, शुद्ध आणि उपयोजित विज्ञान, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा, अनुवाद आणि व्याख्या आणि इतर विषयांचे विभाग जोडून/ सुरू करून या संस्थांचे बळकटीकरण करणे अशा प्रकारे एकल प्रवाहातील शिक्षक शिक्षण महाविद्यालये ही बहुविद्याशाखीय उच्च शिक्षण संस्था होण्यासाठी, शिक्षक शिक्षण अभ्यासक्रमांव्यतिरिक्त कला/ विज्ञान/ वाणिज्य किंवा इतर कोणतेही अभ्यासक्रम चालवणे आवश्यक आहे.  NCTE ने बहुविद्याशाखीय उच्च शिक्षण संस्था द्वारे चार वर्षीय  ITEP अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी  online mode ने आवेदन पत्र मागविण्यासाठी आता २७ एप्रिल २०२३ रोजी दुसऱ्या टप्प्यासाठी जाहिरात दिली आहे (F.  No.  NCTE- Regl022/14/2023- Reg.- Sec.- HQ.) आणि याद्वारे शासकीय बहुविद्याशाखीय  Institute of Eminence, राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था (Institute of National Importance), केंद्रीय आणि राज्य स्तरीय विद्यापीठा कडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले आहेत. शैक्षणिक वर्ष २०२४-२५पासून चार वर्षांच्या एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रम (ITEP) द्वितीय टप्प्याच्या प्रायोगिक तत्त्वावर शासकीय विद्यापीठांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा कालावधी ०१ मे ते ३१ मे २०२३ असेल. या निवड प्रक्रियेत केंद्र आणि राज्य सरकारी विद्यापीठांच्या  NAAC च्या ग्रेडला आणि National Institutional Ranking Framework ( NIRF) मानांकनासाठी योग्य ते महत्त्व दिलेले आहे. उदाहरणार्थ,  NAAC A ,  A   आणि  A  ग्रेड असलेल्या उच्च शिक्षण संस्थांना अनुक्रमे ८, ६ आणि ४ गुण मिळतील. किमान १६ गुण प्राप्त करणाऱ्या उच्च शिक्षण संस्थांना  NCTE  ने विहित केलेल्या विद्यमान निकष आणि मानकांच्या आधारे प्रक्रियेसाठी निवडले जाईल.’’ असे म्हणून प्रा. रमेश सरांनी सर्वाना पुढच्या वेळी भेटूया असे आश्वासन दिले.

(प्रा. सिबिल थॉमस यांचे या लेखासाठी सहकार्य लाभले आहे.)

अनुवाद : डॉ. नीतिन आरेकर

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Introduction to education policy national council for teacher education zws
Show comments