प्रा. रवींद्र कुलकर्णी
आता सवय झाल्याप्रमाणे शुक्रवारी सारे जण पुन्हा एकदा एकत्र जमले. आज सर्वाच्या मनात खदखदणारा एक प्रश्न होता. प्राध्यापक महेश यांनी तो प्रश्न रमेश सरांना विचारला, ‘‘राष्ट्रीय उच्च शिक्षण गुणवत्ता/ पात्रता चौकटीनुसार म्हणजे National Higher Education Qualification Framework ‘ नुसार, विद्यार्थ्यांनी विशिष्ट अभ्यासक्रमाची यशस्वी पूर्तता केल्यानंतर त्यांना विद्यापीठाने किंवा महाविद्यालयाच्या सक्षम अधिकार्याने प्रदान केलेले औपचारिक प्रमाणपत्र, पदविका किंवा पदवी! रमेश, सर, मला सांगा की NEP-2020 नुसार दिल्या जाणाऱ्या बहुविद्याशाखीय शिक्षणासाठी मूल्यांकन प्रक्रिया कशी असेल?
प्राध्यापक रमेश यांनी उत्तरले, ‘‘एखाद्या विद्यार्थ्यांने श्रेयांक मिळवणे याचा अर्थ आहे की त्या विद्यार्थ्यांने दिलेल्या स्तरावरील पात्रतेशी निगडित असलेल्या शिक्षणाचा, संबंधित अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. कोणत्याही विषयासाठी विद्यार्थ्यांनी मिळवलेले श्रेयांक हे मूल्यांकनाच्या वैध, विश्वासार्ह परीक्षा पद्धतींच्या अधीन असतात. श्रेयांक हे विद्यार्थ्यांनी घेतलेल्या शिक्षणाच्या परिणामांचे प्रमाण ठरवतात. श्रेयांक चौकटीचे म्हणजे credit framework‘ चं मूलभूत तत्त्व अगदी साधं व सोपं आहे. विद्यार्थ्यांनी श्रेयांक मिळवले म्हणजे त्यांनी संबंधित अभ्यासक्रम/ व्यावसायिक शिक्षण/ प्रशिक्षण आणि मूल्यमापनाचा कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण केला आहे.
रमेश सरांनी थोडं अधिक स्पष्ट केलं. ते म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांला अपेक्षित क्षमता आणि कार्यक्रमाच्या परिणामासाठी मूल्यांकन केल्याशिवाय विद्यार्थ्यांकडून कोणतेही श्रेयांक प्राप्त करता येत नाही. त्यामुळे, सर्वसामान्य शिक्षण पद्धतीमध्ये मूल्यमापनाचे मोठे टप्पे असतात, या टप्प्यांना पार केल्याशिवाय विद्यार्थी पुढच्या टप्प्यावर जाऊ शकत नाहीत. याव्यतिरिक्त, तुम्ही सर्वानी एक बाब समजून घेतली पाहिजे; ती म्हणजे एकाधिक प्रवेश वा एकाधिक निर्गमन पर्यायांची सक्षम अंमलबजावणी करण्यासाठी, प्रत्येक वर्ष पदवी, पदव्युत्तर आणि कौशल्य अभ्यासक्रमानंतर मूल्यांकन हा एक अनिवार्य घटक आहे. याचा अर्थ असा की विद्यार्थ्यांना श्रेयांक प्राप्तीसाठी प्रत्येक वर्ष/ सेमिस्टर/ एखाद्या अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेली पात्रता/ व्यावसायिक शिक्षण/ कौशल्य प्राप्ती करण्यासाठी श्रेयांक मिळवावे लागतील, व त्यासाठी प्रत्येक वर्ष/ सत्र/ अभ्यासक्रम/ व्यावसायिक शिक्षण/ कौशल्य प्राप्ती यासाठी ठरावीक श्रेयांक चौकट निर्माण करावी लागेल.’’
आज रमेश सरांना थोडी धाप लागत होती, त्यांना सर्दीनं पछाडलं होतं. पण, तरीही सारे जण उत्सुकतेने ऐकत आहेत, हे पाहून रमेश सर पुढे सांगू लागले, ‘‘हे शिक्षण केवळ शिकवण्याच्या तासांपुरते मर्यादित नसावे तर त्यामध्ये अभ्यासक्रम, सह-अभ्यासक्रम, आणि अतिरिक्त-अभ्यासक्रम असे जे वर्गीकरण करण्यात आले होते, त्या कोणत्याही शैक्षणिक संस्थांमधील इतर सर्व क्रियाकलापांचा त्यात समावेश असेल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये अध्याहृत असलेल्या विचारानुसार, श्रेयांक प्राप्तीसाठी एकूण निकालावर आधारित निश्चित केलेले अध्ययन तास (४० श्रेयांकांसाठी एका वर्षांत १२०० तासांचे अध्ययन) हे मूल्यमापनाच्या अधीन असेल. मूल्यमापनामध्ये पुढील गोष्टींचा समावेश असेल:
I. वर्गात शिकवण्याचे/ शिकण्याचे तास
II. प्रयोगशाळा कार्य / नवोपक्रम प्रयोगशाळा/ प्रकल्प
III. वार्षिक आणि सहामाही परीक्षा / वर्ग चाचण्या / प्रश्नमंजुषा / फॉर्मेटिव्ह मूल्यांकनांसह मूल्यांकन
iv. प्रायोगिक शिक्षण, संबंधित अनुभव आणि व्यावसायिक स्तरांसह क्रियाकलाप तास
a. प्रयोगशील कला, संगीत, हस्तकला,
b. वादविवाद आणि चर्चा/ निबंध लेखन/ वाचन स्पर्धा
c. कथा लेखन स्पर्धा
d विविध संस्थांमधील सण साजरे करणे, संगीत सादरीकरण, नाटक.
e.इतर स्पर्धा
v. खेळ योग/ शारीरिक क्रियाकलाप/ खेळ
vi. रोजगार कौशल्यांसह जीवन कौशल्ये
vii सामाजिक/ सामुदायिक कार्य/ NCC/ श्रमदान: परिसर स्वच्छता, इमारत, सजावट
viii. बॅग कमी दिवस, संस्थेने आयोजित केलेल्या क्षेत्रभेटी
ix. व्यावसायिक शिक्षण/ प्रशिक्षण, कौशल्य, किरकोळ/ मोठे प्रकल्प कार्य, असाइनमेंट
x. संस्थांद्वारे क्षेत्र भेटी / उद्योग संलग्नक
xi. इंटर्नशिप आणि अप्रेंटिसशिप तास, नोकरी प्रशिक्षण (OJT) वर, आणि प्रायोगिक शिक्षण यासह संबंधित अनुभव आणि व्यावसायिक स्तर मिळवणे.
xii. मिश्रित/ ऑनलाइन/ डिजिटल शिक्षण
xiii. स्वयं-अभ्यास/ गृहपाठ (नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओपन स्कूलिंग (एनआयओएस) साठी, एनआयओएसमध्ये, शिकणाऱ्यासाठी स्वयं-अभ्यास एक प्रमुख घटक बनतो).
xiv. इतर कोणत्याही प्रकारचे शिक्षण संबंधित नियामकांद्वारे सूचित केले जाईल.’’
सर अधिक स्पष्ट करू लागले, ‘‘अशा प्रकारच्या अध्ययन-अध्यापन पद्धतीमुळे, शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांचा जो परीक्षोपरांत निकाल लागेल त्यातील अंतर कमी होत जाईल. वर्गात शिकवलं जाणारं, विद्यार्थ्यांचे लक्ष हे अध्यापनाकडून अधिकाधिक क्षमता प्राप्त करण्याकडे वळवले जाईल. अर्थातच त्यांच्या निकालांतील, परिणामांच्या प्राप्ती मधील अंतर देखील कमी होईल, त्यांच्या वर्गातील शिक्षणामधून त्यांना सक्षमतेकडे वळवले जाईल आणि परिणामाधारित अध्ययन-अध्यापन प्रक्रिया रूढ होत जाईल.’’
प्राध्यापक रमेश सर म्हणाले, ‘‘चला, आता थांबू या. पुढच्या वेळी आपण परीक्षांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचा आणि मूल्यमापनाचा विचार करू या.’’ अनुवाद : डॉ. नीतिन आरेकर