IOCL Bharti 2024 : तुम्ही नोकरीच्या शोधात आहे का? तुम्हाला इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) कंपनीत नोकरी करायची इच्छा आहे? तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे. नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ही सुवर्ण संधी गमावू नका आणि आजच अर्ज करा.
विविध पदांनुसार एकूण ४६७ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या पदांसाठी अर्ज कसा करायचा, अर्ज करण्याची शेवटची तारीख, वयोमर्यादा, इत्यादी सविस्तर माहिती जाणून घेऊ या. (IOCL Bharti 2024 applications for the posts of Non Executive know how to apply and details_
अधिसुचना – अर्ज भरण्यापूर्वी खालील अधिसुचना नीट वाचावी.
पदाचे नाव – इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने “नॉन-एक्झिक्युटिव्ह” पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे.
पद संख्या – “नॉन-एक्झिक्युटिव्ह” पदांच्या ४६७ विविध जागांसाठी ही भरती प्रक्रिया आहे.
कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक (Junior Engineering Assistant) – ३७९
कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक (Junior Quality Control Analyst) – २१
सहाय्यक अभियांत्रिकी (Engineering Assistant) – ३८
टेक्निकल अटेडंट (Technical Attendant) – २९
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. त्यासाठी अधिसुचना नीट वाचावी.
अर्ज पद्धती – या पदासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क – या पदांसाठी अर्ज करताना ३००/- रुपये अर्ज शुल्क भरावा लागेल.
वयोमर्यादा – १८ – २६ वर्षे वयोगटातील लोक हा अर्ज भरू शकतात.
अर्ज भरण्याची शेवटची तारीख – २२ जुलै २०२४ पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०२४ आहे.
अधिकृत वेबसाइट – https://iocl.com/ या भरती प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
अर्ज कसा भरावा? (How To Apply For Job)
अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावा.
विचारलेली माहिती आणि कागदपत्रे नीट वाचावी.
अर्ज भरण्यापूर्वी अधिसुचना नीट वाचावी.
अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी २१ ऑगस्टपर्यंत भरावा.