IOCL Recruitment 2023: इंडियन ऑईलमध्ये सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिडेटने नॉन-एक्सुक्युटिव्ह कॅडरमध्ये प्रॉडक्शन पीअँडयू आणि पीअँडयू-ओअँडयू विभागामध्ये एकूण ६५ ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टेंटची भरती निघाली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छूक उमेदवार आओसीएलच्या iocrefrecruit.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन थेट अर्ज करू शकतात. अर्जाची प्रक्रिया बुधवारी ३ मेपासून सुरू झाली आहे आणि शेवटची तारीख ३० मे २०२३ पर्यंत निश्चित केली आहे. या भरतीसाठी कोणतेही शुल्क भरू नये.

इंडियन ऑइल ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टेंट भरती २०२३ अधिसूचना PDF डाउनलोड लिंक – https://iocl.com/admin/img/UploadedFiles/LatestJobOpening/Files/c7ab954527c648cdb1afe68c7046901a.pdf

इंडियन ऑइल ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टेंट भरती २०२३ अर्जाची लिंक – https://www.iocrefrecruit.in/iocrefrecruit/main_special_sep21.aspx

हेही वाचा – बँक ऑफ बडोदामध्ये १५७ पदांसाठी होणार भरती, ८० हजारांहून अधिक मिळू शकतो पगार, या तारखेपूर्वी भरा अर्ज

इंडियन ऑइल ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टेंट भरतीसाठी पात्रता निकष
इंडियन ऑईलद्वारे ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टेंट भरतीसाठी, जे उमेदवार रिक्त जागासंबधित शाखेत ३ वर्षाचा डिप्लोमा केला आहे ते अर्ज करू शकता. उमेदवाराचे वय ३० एप्रिल २०२३ पर्यंत १८ वर्षापेक्षा कमी किंवा २६/२७/२८ ( प्रत्येक पदांनुसार जास्तीची वयोमर्यादा) वर्षांपेक्षा जास्त असून नये. आरक्षित वर्गातील उमेदवारांसाठी जास्तीच्या वयोमर्यादेत सुट देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी भरती अधिसूचना पाहू शकता.

हेही वाचा – स्पोर्ट्स कोट्यातून रेल्वेत होणार २१ पदांसाठी भरती, ९२ हजारपर्यंत मिळू शकतो पगार, जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा

इंडियन ऑइल ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टेंट भरतीसाठी निवड प्रक्रिया

इंडियन ऑईलद्वारे ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टेंट भरतीसाठी उमेदवारांची निवड परिक्षा आणि त्यानंतर आयोजिक केल्या जाणाऱ्या कौशल्य/ प्रोफिशिएंसी / शारीरिक चाचणीच्या आधारावर निवड केली जाईल. पहिल्या टप्प्यात आयोजित केल्या जाणाऱ्या लेखी परिक्षेत सामान्य विज्ञान (७५ गुण), संख्यात्मक क्षमता (१५ गुण) आणि सामान्‍य जागरूकता (१० गुण) यासाठी प्रश्न विचारले जाणार आहे. प्रत्येक उमेदवाराला पुढच्या पायरीसाठी कमीत कमी ४० टक्के अंक मिळवणे गरजेचे आहे.

Story img Loader