IOCL Bharti 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मध्ये नॉन-एक्झिक्युटिव्ह अंतर्गत विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट, ज्युनियर टेक्निकल असिस्टंट, ज्युनियर क्वालिटी कंट्रोल एनालिस्ट, इंजिनिअरिंग असिस्टंट, टेक्निकल अटेंडंट अशी विविध ४६७ रिक्त पदे भरली जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २२ जुलैपासून सुरू झाली आहे, जी २१ ऑगस्ट २०२४ च्या नियोजित अंतिम तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी, उमेदवार IOCL iocl.com च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज भरू शकतात.

शैक्षणिक पात्रता:

१० उत्तीर्ण असण्याबरोबर डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनीअरिंग, डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन, डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या संबंधित क्षेत्रातील तीन वर्षांचा डिप्लोमा/ संबंधित क्षेत्रातील पदवी / ITI प्रमाणपत्र आवश्यक आहे.

Vanchit Bahujan Aghadi, Bahujan Samaj Party,
आंबेडकरी पक्षांच्या उमेदवारांचा वेलू गगनावरी !
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
GAIL India Recruitment 2024
GAIL India Recruitment 2024 : सिनिअर इंजिनिअरच्या पदासाठी मागवले अर्ज, १,८०,०००पर्यंत मिळू शकतो पगार
Mega Housing Lottery application process, entension, CIDCO
सिडकोच्या २६ हजारांच्या महागृहनिर्माण सोडत प्रक्रियेला महिन्याभराची मुदतवाढ
job opportunity in ordnance factory update in marathi
नोकरीची संधी :ऑर्डनन्स फॅक्टरीत भरती
KTCL Goa Bharti 2024 Job Opportunity in KTCL Recruitment
KTCL Goa Bharti 2024 : KTCLमध्ये नोकरीची संधी! कंडक्टरच्या ७० पदांसाठी होणार भरती, १०वी पास उमेदवार करू शकतात अर्ज
Extension of the Sadanika Lottery Scheme of PMRDA Pune news
पीएमआरडीएच्या सदनिका लाॅटरी योजनेला मुदतवाढ

वयोमर्यादा :

उमेदवाराचे किमान वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि कमाल वय २६ वर्षांपेक्षा जास्त नसावे. यात SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना वयात नियमानुसार ५ वर्षांची, तर ओबीसी उमेदवारांना ३ वर्षांती सूट दिली जाईल. ३१ जुलै २०२४ लक्षात घेऊन वयाची गणना केली जाईल.

नोकरी ठिकाण :

संपूर्ण भारत

अर्ज फी :

सामान्य, EWS आणि OBC (NCL) श्रेणीतील अर्जदारांना ३०० रुपये शुल्क भरावे लागेल, तर SC/ST/PWBD/XSM उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. अर्जाची फी ऑनलाइन पद्धतीने भरावी लागेल.

निवड प्रक्रिया:

१) लेखी परीक्षा
२) कागदपत्रांची पडताळणी
३) वैद्यकीय तपासणी

पगार:

उमेदवारांना दरमहा २५ हजार रुपये ते १ लाख ५ हजार रुपये पगार दिला जाईल.

याशिवाय महागाई भत्ता, भाडे भत्ता, भविष्य निर्वाह निधी, वैद्यकीय सुविधा देण्यात येणार आहेत.

परीक्षा कधी होणार?

या भरती प्रक्रियेतील संगणक आधारित परीक्षा सप्टेंबर २०२४ मध्ये होणार आहे. परीक्षेचे ई-प्रवेशपत्र १० सप्टेंबर २०२४ रोजी प्रसिद्ध केले जाईल. ऑक्टोबर २०२४ च्या तिसऱ्या आठवड्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

IOCL Recruitment 2024 साठी ऑनलाई अर्ज कसा भरायचा?

१) सर्वप्रथम IOCL च्या अधिकृत वेबसाईट iocl.com वर जा .

२) होमपेजवर लेटेस्ट जॉब ओपनिंग्सवर जाऊन Click here to Apply Online वर क्लिक करा.

३) एक नवीन पेज ओपन होईल, ज्यात To Register लिंकवर क्लिक करा आणि विचारलेली माहिती भरुन नोंदणी करा.

४) आता Already Registered? To Login वर क्लिक करुन सर्व माहिती व्यवस्थित भरा आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.

५) शेवटी सर्व फॉर्म नीट भरल्यानंतर शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा.

६) भविष्यातील गरजेसाठी त्याची हार्ड कॉपी ठेवा.

उमेदवार खालील लिंकच्या आधारे पात्रता, पगार, आरक्षण आणि इतर माहिती जाणून घेऊ शकतात.

१) अधिकृत वेबसाईटची लिंक

https://iocl.com/

२) ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1258/89908/Index.html

३) अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1MfU8WD6KL_yc1xfNh1d1BD4PTjGhMyrN/view