IPPB Recruitment 2023: बँकेमध्ये सरकारी नोकरीसाठी इच्छूक उमेदवरांसाठी चांगली बातमी आहे. इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत १३२ पदांसाठी भरती निघाली आहे. भरतीसाठी बँकेने नोटिफिकेशन जाहीर केले आहे आणि अर्जाची प्रक्रिया सुरू केली आहे. १६ ऑगस्ट २०२३ पर्यंत जाहीर केले आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवार IPPB च्या अधिकृत वेबसाइटला ippbonline.com भेट देऊ ऑनलाइन अर्ज भरू शकता. अर्ज फक्त ऑनलाईन स्वरुपताच भरता येईल इतर कोणत्याही स्वरुपाती अर्ज स्विकारला जाणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

India Post Payments Bank Recruitment 2023: कोण करू शकते अर्ज
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन करणे अपेक्षित आहे. सेल्स/ऑपरेशन ऑफ फायनाशिअल प्रॉडक्टमध्ये अनुभव असलेले उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. त्याशिवाय उमेदवारांचे वय कमीत कमी २१ वर्ष आणि जास्तीत जास्त ३५ वर्ष जास्त असले पाहिजे. वयोमर्यादा १ जून २०२३नुसार लागू केली जाईल. जास्तीच्या वयोमर्यादेत नियमानुसार सुट दिली जाईल.

अधिसुचना – https://ippbonline.com/documents/31498/132994/1690280273565.07.2023.pdf

हेही वाचा – कर्मचारी निवड आयोगाने विविध पदांसाठी सुरु केली भरती, अर्जाची पद्धत, कोण करु शकतं अर्ज जाणून घ्या

India Post Payments Bank Executive Recruitment 2023: निवड प्रक्रिया
इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत एक्झिक्युटिव्ह भरतीसाठी निवडी प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना ऑनलाइन परिक्षा/ ग्रुप डिस्कशन/ पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये सहभागी व्हावे लागेल. सर्व प्रकियेत निवड झालेल्या उमेदवारांना एक्झ्युक्युटीव्ह पदासाठी निवड केली जाईल. भरती कॉन्ट्रकनुसार केली जाईल ज्याचा कालवधी १ वर्ष असेल. उमेदवाराच्या कामगिरीनुसार हा कालावधी २ किंवा ३ वर्षांपर्यंत वाढवला जाईल.

हेही वाचा – सरकारी नोकरीची संधी! युपीएससीद्वारे विविध पदांसाठी भरती सुरु, १० ऑगस्टपर्यंत करू शकता अर्ज

IPPB Recruitment 2023 Online Form: अर्जाची प्रक्रिया
या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया केवळ ऑनलाइन स्वरुपात पूर्ण केली जाईल. उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीमध्ये अर्ज १६ ऑगस्ट २०२३ रात्री ११: ५९ वाजेपर्यंत अनिवार्य स्वरुपामध्ये भरावे लागेल त्यानंतर अर्जाची विंडो बंद होईल. अर्ज भरण्यासाठी अर्ज शुल्क जमा करावे लागेल. सर्व वर्गातील उमेदवारांाना अर्ज शुल्क १०० रुपये जमा करावा लागेल. अर्ज शुल्क ऑनलाइन स्वरुपात भरता येऊ शकते.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ippb recruitment 2023 vacancy for 132 executive posts in indian post payment bank apply on ippbonline com snk