१८ ते २४ हे वय प्रत्येकाच्या आयुष्यातला सुवर्णकाळ असतो. कारण या वयात शक्यतो कौटुंबिक सामाजिक जबाबदाऱ्या फारशा नसतात. त्यामुळं या वयातच ‘यूपीएससी’ सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये उतरून मिळालेल्या संधीचं आपण सोनं करू शकतो, असा सल्ला आयपीएस अधिकारी सिद्धार्थ भांगे यांनी तरुणांना दिला आहे…

लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातले ऊजवी हे आमचे मूळ गाव. १९७० मध्ये दुष्काळ पडला. दुष्काळामुळे माझे आजी-आजोबा पुण्यात स्थलांतरित झाले. पुणे स्थानकाशेजारी ताडीमाला रोड नावाची वसाहत होती. तिथे आम्ही राहात होतो. माझ्या वडिलांचा जन्म पुण्याचा. कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी वडिलांनी वेगवेगळे व्यवसाय केले. वडिलांप्रमाणेच माझा जन्मही पुण्यातलाच. आपल्या मुलाने इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकावे ही माझ्या आजोबांची आणि आई-वडिलांची इच्छा होती. त्यामुळे ‘निर्मला कॉन्व्हेंट’ या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत माझे नाव घालण्यात आले. शाळेत असताना मला साधारण ७०-७५ टक्के मार्क असायचे. मात्र दहावीत थोडा जास्त अभ्यास केल्यामुळे मी ७५ टक्क्यांवरून थेट ८५ टक्क्यांवर गेलो.

opportunity to ask questions directly to geetanjali kulkarni director hrishikesh joshi through web chat
‘रंगसंवाद’मधून युवा नाट्यकर्मींना अभिनयाचे धडे
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
about the lamp fellowship role of a lamp
स्कॉलरशिप फेलोशिप : लॅम्प फेलोशिप
people for animals adoptions animal shelters in pune people for animals
चौकट मोडताना : उपजत आणि जोपासलेले प्राणिप्रेम
cmat and cet exam mandatory for the mba aspirants
प्रवेशाची पायरी : ‘एमबीए’साठी ‘सीमॅट सीईटी’
Job opportunities in 261 engineer posts in gail
नोकरीची संधी : ‘गेल’मध्ये अभियंत्यांची २६१ पदे
Recruitment for the posts of Young Professionals in Sports Authority of India Career News
स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये ‘यंग प्रोफेशनल्स’ पदांची भरती
eknath shinde cheated by bjp says former chief minister prithviraj chavan
भाजपकडून एकनाथ शिंदेंची फसवणूक

दहावीनंतर काय करायचे हा मोठा प्रश्नच होता. घरी कोणी फारसं शिकलेलं नसल्यामुळं मार्गदर्शन करणारं कुणी नव्हतं. माझे जवळपास सगळेच मित्र ‘सायन्स’ला गेलेले बघून, मीही ‘सायन्स’ला जाण्याचं ठरवलं. पुण्याच्या वाडिया कॉलेजात मी अकरावीसाठी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला.

हेही वाचा >>> UPSC ची तयारी : जॉन रॉल्सची न्यायाची मूलभूत संकल्पना

आवडीच्या विषयांचा अभ्यास करण्यासाठी…

माझं कॉलेज सुरू होऊन जेमतेम एकच महिना झाला होता. वाडिया’ची खूपच मोठी लायब्ररी होती. मी एकदा तेथे गेलो असताना मला ‘यूपीएससी’-‘एमपीएसी’ करणारे विद्यार्थी भेटले. त्यांनी मला पहिल्यांदा ‘यूपीएससी’ बद्दल सांगितलं. ‘सायन्स’च्या अभ्यासात माझं मन लागत नव्हतं. ‘यूपीएससी’च्या अभ्यासक्रमात इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, राज्यशास्त्र यासारखे विषय होते. मला त्यांचा अभ्यास करायला आवडलं असतं. त्यावेळी ‘युट्यूब’वर वेगवेगळ्या कअर अधिकाऱ्यांच्या मुलाखती, भाषणं वगैरे मी ऐकत होतो. त्यामुळं आपण देखील यूपीएससी दयावी, असं मनात कुठेतरी मी ठरवलं. मी जेमतेम सोळा वर्षांचा असल्यामुळं ‘यूपीएससी’ का द्यावी याचं काही ठोस उत्तर त्यावेळी तरी माझ्या मनात नव्हतं. पण ‘यूपीएससी’ दिली तर आवडीच्या विषयांचा अभ्यास करायला मिळेल, असं मला वाटत होतं. मी बारावी सायन्स केलं. ग्रॅज्युएशनचा अभ्यास सुरू केला.

इंग्रजीचा सराव

मी जरी इंग्रजी शाळेत शिकलो असलो तरी माझं इंग्रजी तितकंसं चांगलं नव्हतं. इंग्रजी सुधारण्यासाठी ग्रॅज्युएशनच्या दुसऱ्या वर्षाला असताना मी ‘द हिंदु’, ‘द इंडियन एक्सप्रेस’ सारखी वर्तमानपत्रं वाचणं सुरू केलं. मी वाचलेलं मला १०० समजत होतं असं नाही. इंटरनेटवर या विषयात त्यावेळी मला कोणी मार्गदर्शन करू शकेल का, ते मी शोधलं. मला दोन व्यक्ती सापडल्या. सुदैवानं दोघेही पुण्याचेच होते. मी त्यांना जाऊन भेटलो. मला इंग्रजी लेखनात अडचणी होत्या. त्यांनी मला इंग्रजी शब्दसंग्रह वाढवायला आणि अवांतर इंग्रजी वाचनावर भर दयायला सांगितलं. ते संपूर्ण वर्ष मी अवांतर इंग्रजी वाचनात घालवलं. माझ्या वाचनात त्यावेळी प्रकाश आमटे यांचं ‘pathways to Light’ हे पुस्तक आलं. त्यावेळी खऱ्या अर्थानं मला, मी ‘यूपीएससी’ का दिली पाहिजे ते समजलं. यूपीएससी झालो तर आपल्या शिक्षणाचा आपण समाजासाठी जास्तीत जास्त चांगला उपयोग करू शकू, असं वाटलं. मी ‘यूपीएससी’विषयी आता खऱ्या अर्थानं गंभीर झालो. इंग्रजीसाठी मी घेत असलेल्या श्रमांना अखेर यश आलं. राष्ट्रीय प्रसार माध्यमांमधून वापरला जाणारा जवळपास सर्व शब्दसंग्रह माझ्या आवाक्यात आला.

अपयशाचं आत्मपरीक्षण

मी ग्रॅज्युएशनच्या दुसऱ्या वर्षाला असताना, २०२० च्या मार्च महिन्यात ‘लॉकडाऊन’ लागला. ‘लॉकडाऊन’ उठेल म्हणून मी दोन महिने वाट पाहिली. पण ‘लॉकडाऊन’ उठला नाही. २०२० च्या मे पासून मी ‘यूपीएससी’ च्या तयारीला लागलो. ‘लॉकडाऊन’मुळे कॉलेजचं तिसरं वर्ष ‘ऑनलाइन’ झालं. त्यामुळं स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी माझ्याकडं वेळच वेळ होता.

२०२१ च्या ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये माझं ग्रॅज्युएशन संपलं. २०२१ च्या ऑक्टोबरमध्ये मी ‘यूपीएससी’ची पूर्वपरीक्षा दिली. माझा तो पहिला प्रयत्न होता. मात्र तो वाया गेला. पूर्व-परीक्षेत मला अपयश आलं. उ २ं३ मधल्या गणितामुळे मला अपयश आलं होतं. माझ्या अपयशाचं मी आत्मपरीक्षण केलं. लक्षात आलं की माझं GS चांगलं आहे. मात्र Maths मध्ये मी कमी पडतोय. मग मी गणितासाठी थोडी अधिक मेहनत घेतली. दुसऱ्या प्रयत्नात मी पूर्व परीक्षा पास झालो.

मायक्रो-प्लानिंगमुळं अभ्यासक्रम आवाक्यात

मुख्य परीक्षेच्या तयारीला लागलो. मुख्य परीक्षेसाठी समाजशास्त्र ( Sociology ) माझा मुख्य विषय होता. समाजशास्त्र हा नेहमीच माझ्या आवडीचा विषय राहिला आहे. समाजात गुन्ह्यांचं प्रमाण का वाढतं? समाजात असमानता का आहे? यासारख्या सामाजिक प्रश्नांची उत्तरं समाजशास्त्राच्या अभ्यासातून मला सापडत होती. त्यांचा उपयोग मी माझ्या नोकरीत आणि पुढच्या आयुष्यात करू शकलो असतो. सर्वांत प्रथम मी माझ्या अभ्यासक्रमाची पद्धतशीर आखणी केली. मी पुढच्या तीन महिन्यांचं अभ्यासाचं वेळापत्रक तयार केलं. येत्या आठवड्यात मला काय करायचं आहे, हे मी आधीच ठरवायचो. मी ‘यूपीएससी’ चा मोठा अभ्यासक्रम छोट्या – छोट्या भागांत विभागला. मायक्रो-प्लॅनिंगमुळं मोठा अभ्यासक्रम देखील आवाक्यात आला. या काळात माझं दिवसाचं वेळापत्रकही ठरलेलं असायचं.

शरीर, मनाचा फिटनेस

अभ्यासासाठी मी दिवसाचे तीन भाग पाडले होते. मी सकाळी नऊ वाजता अभ्यासाला बसायचो. सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत माझा अभ्यास चालायचा. त्यानंतर अर्धा तास जेवणासाठी ब्रेक घ्यायचो. जेवणानंतर अर्ध्या तासाची झोप घ्यायचो. त्यानंतर दुपारी ३.३० ते संध्याकाळी ६ पर्यंत अभ्यास करायचो. मग अर्ध्या तासाचा ‘टी ब्रेक’ घ्यायचो. त्यानंतर संध्याकाळी ६-३० ते रात्री ९ पर्यंत अभ्यासाला बसायचो.

अभ्यास करताना मी मध्ये मध्ये ब्रेक घेत होतो. त्यानं अभ्यास करताना कंटाळा यायचा नाही. जो काही अभ्यास व्हायचा तो अगदी मनापासून व्हायचा. रात्री जेवण झाल्यावर मित्रांसोबत फोनवर गप्पा मारायचो. दुसऱ्या दिवशीच्या अभ्यासासाठी मन त्यामुळं पुन्हा ताजतवानं व्हायचं. मी रात्री बारा वाजता झोपायचो. दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता आठ तासांची झोप पूर्ण करूनच उठायचो. असं माझं ‘रूटीन’ आठवडाभर चालायचं. आठवडयातून एक दिवस या ‘रूटीन’मधून ‘कम्पलसरी ब्रेक’ घ्यायचो. त्या दिवशी मी एखादा चित्रपट बघायचो. मित्रांबरोबर फिरायला जायचो. मला लहानपणापासूनच व्यायामाची आवड होती. जिमला जायचं म्हटलं तर एक ते दीड तास सहज जातो. फिट राहण्यासाठी म्हणून मी दररोज घरच्या घरीच ‘स्ट्रेचिंग एक्सरसाईजेस’ करायचो. अभ्यास करायला मन शांत लागतं. मन शांत झालं की मनाचा ‘फोकस’ वाढतो. मी त्यासाठी रोज दहा मिनिटं ध्यान करायचो.

प्लान बी

मी २०२१ मध्ये ग्रॅज्युएट झालो. २०२२ ला यूपीएससी दिली. ग्रॅज्युएट होऊन जेमतेम एकच वर्ष झालं असल्यामुळं, घरचे नोकरीसाठी फारसे मागे लागले नव्हते. ‘यूपीएससी’च्या निकालात एक प्रकारची अनिश्चितता असल्यामुळं फार काळ परीक्षा देत राहाणं धोक्याचं होतं. त्यामुळं ‘यूपीएससी’साठी मी जास्तीत जास्त तीनदा प्रयत्न करणार होतो.

माझे जवळपास सर्वच मित्र विज्ञान शाखेचे असल्यामुळे इंजिनीअर होऊन कुठेना कुठे नोकरीला लागले होते. त्यांना सुरुवातीलाच किमान ६-८ लाखाचं पॅकेज तरी मिळणार होतं. मी नुसताच ग्रॅज्युएट असल्यामुळे मला माझ्या अपेक्षेप्रमाणे नोकरी मिळाली नसती. त्यामुळे चांगली नोकरी मिळवण्यासाठी मला आणखी काही तरी करणं भाग होतं. ‘यूपीएससी’ करताना माझा ‘प्लॅन-बी’ तयार होता. ‘यूपीएससी’ झालो नसतो तर मी ‘एमबीए’ करणार होतो. ‘एमबीए’च्या फी साठी ‘शैक्षणिक कर्ज’ घेण्याचंही मी ठरवलं होतं. पुढे नोकरी करून ते कर्ज मी फेडणार होतो. परंतु सुदैवानं त्याआधीच मला मुख्य-परीक्षेत यश मिळालं.

स्वयंअध्ययनावर भर

मला मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं. मुलाखतीच्या तयारीसाठी मी दिल्लीला मित्रांकडे जाऊन राहिलो. दिल्लीत असताना मी चार-पाच ‘मॉक इंटरव्हयू’ दिले. मला त्याचा खूप फायदा झाला. मुलाखत चांगली होऊन माझी कढर साठी निवड झाली. संपूर्ण भारतात माझा ७०० वा क्रमांक आला होता. ‘यूपीएससी’ करण्यामागं घरची परिस्थिती सुधारता येईल, ही देखील प्रेरणा होती. ‘यूपीएससी’ करताना मी कुठलाही कोचिंग क्लास न लावता ‘टेस्ट सीरिज’ लावून स्वत:चा अभ्यास स्वत:च केला होता. मुख्य परीक्षेची तयारी करताना मी उत्तर लेखनावर भर दिला होता. स्वयंशिस्त, सातत्य, वेळेचं नियोजन, प्रामाणिकपणा या गुणांमुळे ‘यूपीएससी’सारखी स्पर्धा-परीक्षा मी ‘क्रॅक’ करू शकलो.

आजही ‘यूपीएससी’ करणाऱ्यांमध्ये मुलींची संख्या मुलांच्या तुलनेत फारच कमी दिसते. प्रशासकीय सेवेची आवड असणाऱ्या मुलींनी शक्यतो कमी वयात या परीक्षेत उतरावं, असं मला वाटतं. १८ ते २४ हे वय प्रत्येकाच्या आयुष्यातला सुवर्णकाळ असतो. कारण या वयात शक्यतो कौटुंबिक – सामाजिक जबाबदाऱ्या फारशा नसतात. त्यामुळं या वयातच ‘यूपीएससी’सारख्या ‘स्पर्धा परीक्षां’मध्ये उतरून मिळालेल्या संधीचं आपण सोनं करू शकतो. समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आपला खारीचा वाटा उचलू शकतो.

(शब्दांकन : दुलारी देशपांडे )

Story img Loader