IRCTC Recruitment 2023 :इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरीझम कॉरपॉरेश लिमिटेड म्हणजेच IRCTCने उमेदवारांकडून अप्रेंटीस ट्रेनी पदांसाठी अर्ज मागवले आहे. पात्र उमेदावार ऑनलाई अर्ज करू शकतात. त्यासाठी IRCTCच्या अधिकृत वेबसाइट irctc.com ला भेट द्या. या भरती मोहिमेंतर्गत २५ पदांसाठी भरती होणार आहे. पदाचा तपशील, पात्रता आणि निवड प्रक्रियेबाबत सविस्तर जाणून घ्या.
IRCTC Recruitment 2023 :महत्त्वाच्या तारखा
अर्जाची नोदणी सुरू झाली : १४ जून २०२३
अर्जाची शेवटची तारीख : २९ जून २०२३
IRCTC Recruitment 2023 : पदाचा तपशील
कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅमिंग असिस्टंट – २५ पदे
IRCTC Recruitment 2023 : पात्रता निकष
उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून एकूण किमान ५०% गुणांसह मॅट्रिक आणि COPA ट्रेडमध्ये NCVT/SCVT शी संलग्न ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
IRCTC Recruitment 2023 : वयोमर्यादा
उमेदवारांनी १५ वर्षे पूर्ण केलेली असावीत आणि १ जून २०२३ रोजी २५ वर्षे पेक्षा जास्त वय नसावे.आरक्षित वर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सुट देण्यात आली आहे.
IRCTC Recruitment 2023 : अधिकृत अधिसुचना – https://irctc.com/assets/images/Apprentice%20advertisement-01-EZ-2023-24.pdf
हेही वाचा – BDL मध्ये डेप्युटी मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर पदासाठी होणार भरती! १,६०,००० रुपयांपर्यंत मिळू शकतो पगार
IRCTC Recruitment 2023 : निवड प्रक्रिया
गुणांच्या टक्केवारीच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीवर निवड केली जाईल. कोणतीही लेखी परीक्षा किंवा तोंडी परिक्षा होणार नाही. अर्जदारांची अंतिम निवड मूळ प्रशस्तिपत्रांच्या पडताळणीच्या अधीन असेल. अधिक संबंधित तपशीलांसाठी उमेदवार IRCTC ची अधिकृत साइट पाहू शकतात.