IRCTC Recruitment 2024 : अनेकांचे रेल्वे विभागात नोकरी करण्याचे स्वप्न असते. आता रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे तुमचेही स्वप्न पूर्ण होऊ शकते. रेल्वे विभागात नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे नक्कीच आहे. रेल्वेत मेगा भरती लवकरत सुरू होणार आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) कडून भरती प्रक्रिया राबवली जातंय. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालविता, भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया. मग लगेचच करा या भरती प्रक्रियेसाठी अर्ज.

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन डेप्युटी जनरल मॅनेजर (फायनान्स) या पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.पात्र उमेदवार IRCTC च्या अधिकृत वेबसाइट irctc.com वर ऑनलाइन अर्ज करू शकतात.अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ नोव्हेंबर २०२४ असून पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर तपशीलांसाठी खाली वाचा.

Vacancy Details: रिक्त जागा तपशील

डेप्युटी जनरल मॅनेजर/फायनान्स (कॉर्पोरेट ऑफिस, नवी दिल्ली): १ जागा
उपमहाव्यवस्थापक/वित्त (पश्चिम विभाग/मुंबई): १ जागा

Eligibility Criteria: पात्रता निकष

१. रेल्वे/राज्य सरकार/केंद्र सरकारसाठी. आणि सरकार मालकीच्या स्वायत्त संस्था जसे की CRIS इत्यादी- कोणत्याही विषयातील पदवी.

२. PSU उमेदवारासाठी- चार्टर्ड अकाउंटंट/ कॉस्ट आणि मॅनेजमेंट अकाउंटंट.

३. लेखा/वित्त/कर विभागामध्ये किमान १२ वर्षांचा काम केल्यानंतर पात्रता अनुभव.

Age Limit: वयोमर्यादा

रिक्त पदाच्या सूचनेच्या शेवटच्या तारखेनुसार कमाल वयोमर्यादा ५५ वर्षे असावी.

Selection Process: निवड प्रक्रिया

निवड प्रक्रियेमध्ये मुलाखतीसाठी उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल. पात्रतेच्या आधारे, निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. APARs, शैक्षणिक/व्यावसायिक पात्रता, अनुभव प्रोफाइल आणि व्यक्तिमत्व, आणि मुलाखतीद्वारे संभाषण कौशल्ये यासारख्या विविध गुणांना महत्त्व दिले जाईल. उमेदवारांची कागदपत्र पडताळणी मुलाखतीच्या तारखेला केली जाईल.

Documents required for applying: अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

इयत्ता १० वी प्रमाणपत्र/ जन्मतारीख प्रमाणपत्र, इयत्ता १२ वी प्रमाणपत्र, स्पेशलायझेशन/स्ट्रीम आणि मार्कशीटसह पदवी प्रमाणपत्र, स्पेशलायझेशन/स्ट्रीम आणि मार्कशीटसह पदव्युत्तर पदवी/पीजी डिप्लोमा प्रमाणपत्र. नियुक्ती पत्र, जॉईनिंग ऑर्डर आणि सध्याच्या संस्थेची शेवटची तीन महिन्यांची पगार स्लिप, गेल्या चार वर्षांच्या APARs/ACRs/मूल्यांकन अहवालांच्या प्रती, अनुभव प्रमाणपत्रे, वेतन समतुल्य प्रमाणपत्र, नवीनतम दक्षता आणि D&AR मंजुरी.

हेही वाचा >> Govt Job: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा सरकारी नोकरी! ऑयल इंडिया लिमिटेडकडून मेगा भरती

Where to send applications: अर्ज कुठे पाठवायचे

अर्ज HR/Personnel Dept. GGM/HRD, IRCTC कॉर्पोरेशन ऑफिस, १२वा मजला, स्टेट्समन हाऊस, बाराखंबा रोड, नवी दिल्ली- ११०००१ येथे पाठवावेत.