IRCTC Recruitment 2025 : रेल्वेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. कारण आयआरसीटीसीमध्ये कोणत्याही परीक्षेशिवाय भरती प्रक्रिया राबवली जात आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने जनरल मॅनेजर (IRCTC Recruitment 2025) पदासाठी भरती जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे नवी दिल्ली येथील आयआरसीटीसी कार्यालयातील आयटी विभागात जनरल मॅनेजर पदांसाठी भरती ( IRCTC Manager Vacancy) केली जाईल. पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट irctc.com ला भेट देऊन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे फक्त ७ दिवस शिल्लक आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ एप्रिल २०२५ आहे. पण उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया आणि निवड प्रक्रिया जाणून घेणं महत्वाचे आहे.

पात्रता (IRCTC Recruitment 2025 Eligibility)

आयआरसीटीसीमध्ये जनरल मॅनेजर पदासाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बी.एससी, बी.टेक किंवा बी.ई. असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा (IRCTC Recruitment 2025 Age Llimit)

उमेदवारांचे कमाल वय ५५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. तसेच, येथे राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात विशेष सूट दिली जाईल.

पगार (IRCTC Recruitment 2025 Salary)

ग्रुप जनरल मॅनेजर पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना महिना ३७४०० ते ६७००० रुपयांपर्यंत पगार दिला जाऊ शकतो. या पदासाठी सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगानुसार पगार दिला जाईल.

अर्ज कसा करावा? (IRCTC Recruitment 2025 Apply Online)

१) सर्वप्रथम IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
२) यानंतर होमपेजवर जाऊन IRCTC General Manager Post Recruitment 2025 लिंकवर क्लिक करा.
३) येथे रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन करताच त्याचा आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवर येईल.
४) त्यानंतर अर्ज पूर्णपणे भरा.
५) आता आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करा.

उमेदवारांची निवड कशी केली जाईल? (IRCTC IT Manager Vacancy)

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनमध्ये जनरल मॅनेजर पदासाठी उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावले जाईल. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी होईल. पण या भरती प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला एकदा भेट द्या.