​ISRO Recruitment 2023: इस्त्रोमध्ये नोकरी करु इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. इस्त्रोतर्फे एक अधिसूचना जाहीर केली आहे ज्यानुसार, विक्रम साराभाई अंतराळ केंद्रामध्ये टेक्निशिअन ए, ड्राफ्टसमन बी आणि रेडिओग्राफर ए या पदांसाठी भरती केली जाणार आहे. या मोहिमेनुसार इच्छूक उमेदवार इस्त्रोच्या अधिकृत संकेतस्थळ vssc.gov.in आणि isro.gov.in वर जाऊन अर्ज करु शकतात. या भरती मोहिमेतंर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया ४ मे पासून सुरु झाली आहे. या भरती मोहिमेसाठी अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख १८ मे २०२३ आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इस्त्रो भरती २०२३ : तपशील

या भरती मोहिमेतंर्गत संस्थेमध्ये ४९ पदांवर भरती केली जाणार आहे. यामध्ये टेक्निशिअन ए साठी ४३ पदे, ड्राफ्ट्समॅन बी पदासाठी ५ पदे आणि रेडिओग्राफर पदासाठी एका पदावर भरती केली जाईल.

इस्त्रो भरती २०२३ : शैक्षणिक पात्रता

या भरती प्रक्रियेतंर्गत या पदासाठी अर्ज करणारा इच्छूक उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेमधून १० वी पास असला पाहिजे. तसेच उमेदवाराला संबधित ट्रेड आयटीआय पास ( ITI pass) असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : बँक ऑफ बडोदामध्ये १५७ पदांसाठी होणार भरती, ८० हजारांहून अधिक मिळू शकतो पगार, या तारखेपूर्वी भरा अर्ज

इस्त्रो भरती २०२३ : वयोमर्यादा

या भरती मोहिमेंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय ३५ वर्षापेक्षा जास्त असू नये

इस्त्रो भरती २०२३ : किती मिळेल पगार

टेक्निशिअन ए लेवल ०३- २१७०० रुपये पासून ६९१०० रुपये
ड्राफ्ट्समॅन-बी- लेवल ०३ – २१७०० रुपये पासून ६९१०० रुपये
रेडियोग्राफर-ए- लेवल ०४- ३५५०० रुपये पासून ८११०० रुपये

हेही वाचा : भारतीय समुद्री विश्वविद्यालयात नोकरीची संधी! ‘या’ पदासाठी होणार भरती, जाणून घ्या पात्रता निकष

इस्त्रो भरती २०२३ : या तारखांकडे ठेवा लक्ष

ऑनलाईन अर्ज करण्याच्या प्रक्रियेची सुरूवात ४ मे २०२३
ऑनलाई अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ मे २०२३

इस्त्रो भरती २०२३ : इतके अर्ज शुल्क भरावे लागेल

या भरती अभियांनातंर्गत सामान्य व ओबीसी वर्गातील उमेदवारांना १०० रुपये शुल्क द्यावे लागेल. जेव्हा आरक्षित श्रेणीच्या उमेदवारांसाठी शुल्क शुन्य रुपये करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत संकेतस्थळाची मदत घेऊ शकता.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Isro recruitment 2023 apply for many posts at isro gov in from 4 mays snk
Show comments