ISRO recruitment 2024: नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर (NRSC) भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO), अंतराळ विभागाच्या केंद्रांपैकी शास्त्रज्ञ/ इंजिनिअर ‘एससी’ आणि इतर पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. अर्जाची प्रक्रिया सुरू आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ फेब्रुवारी आहे. इंटरसेट केलेले उमेदवार http://www.nrsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ISRO recruitment 2024: रिक्त पदांचा तपशील:

ही भरती मोहीम ४१ रिक्त पदे भरण्यासाठी आयोजित केली जात आहे, त्यापैकी ३५ रिक्त जागा शास्त्रज्ञ/ इंजिनिअर ‘एससी साठी आहेत, १ रिक्त जागा वैद्यकीय अधिकारी ‘SC’ पदासाठी आहे, २ रिक्त जागा परिचारिका(Nurse)’B’ साठी आहेत. , आणि ३ रिक्त जागा ग्रंथालय सहाय्यक(Library Assistant) ‘ए’ साठी आहेत.

हेही वाचा – Talathi Final Result 2023: महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर; कुठे पाहू शकता निवड यादी? जाणून घ्या

ISRO recruitment 2024 : वयोमर्यादा:

पोस्ट कोड ०६,०९,१३,१४,१५,१६ साठी उमेदवारांचे वय १८ ते ३० वर्षे दरम्यान असावे. पोस्ट कोड -०७,०८,१०,११,१२साठी उमेदवारांचे वय १८ ते २८ वर्षे दरम्यान असावे. पोस्ट कोड १७,१८ आणि १९साठी उमेदवारांचे वय १८ ते ३५ वर्षे दरम्यान असावे.

ISRO recruitment 2024: अर्ज शुल्क

ISRO recruitment 2024 : अर्ज शुल्क त ₹२५० आहे, जी परत केले जाणार नाही. पण, प्रथम, प्रत्येक उमेदवाराने ७५० रुपयांची प्रक्रिया खर्च भरणे आवश्यक आहे.

हेही वाचा – Pune University Bharti 2024 : पुणे विद्यापीठात १११ पदांसाठी मेगाभरती! मिळणार १ लाखाहून अधिक पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख

ISRO recruitment 2024: अर्ज करण्याची थेट लिंक
https://apps.nrsc.gov.in/eRecruitment_NRSC/
ISRO recruitment 2024: अधिसुचना
https://www.nrsc.gov.in/sites/default/files/pdf/Careers/NRSC-RMT-1-2024%20dated%2022012024.pdf

ISRO recruitment 2024: अर्ज कसा करावा

  • http://www.nrsc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  • मुख्य पेजवर, जाहिरात क्रमांक NRSC-RMT-1-2024” वर क्लिक करा.
  • स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल.
  • Apply लिंकवर क्लिक करा
  • अर्ज व्यवस्थित भरून घ्या
  • सर्व आवश्यक कागदपत्रे जोडा
  • अर्ज जमा करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट घ्या.
  • उमेदवार तपशीलवार सूचना येथे तपासू शकतात.
मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Isro recruitment 2024 apply for scientist and other posts till feb 12 snk
Show comments