ISRO VSSC Recruitment 2023 Apply for Technician: इस्त्रो विक्रम साराभाई अंतराळ केंद्रामध्ये टेक्निशिअन ए, ड्राफ्टसमॅन -बी आणि रेडिओग्राफर ए या पदांसाठी भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. अर्जाची प्रक्रिया ४ मेपासून सुरू झाली होती आणि अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख १८ मे पर्यंत होते जी वाढवून आता २३मे करण्यात आली आहे. याप्रक्रियेंतर्गत इस्त्रो विक्रम साराभाई अंतराळ केंद्रामध्ये टेक्निशिअन ए, ड्राफ्टसमॅन -बी आणि रेडिओग्राफर ए यासाठी ४९ पदांची भरती होणार आहे.

ISRO VSSC भरती २०२३ पदांची माहिती:

ही भरती मोहीम ४९ पदांच्या भरतीसाठी आयोजित केली जात आहेत, ज्यापैकी ४३ पदे टेक्निशिअन ए-सहित, ५ पदे ड्रॉसमॅन-बी आहेत आणि १ पद रेडिओग्राफरसाठी

Bharat Products salse at reliance retail
Bharat Brand: ‘भारत ब्रँडच्या वस्तू आता रिलायन्स रिटेलमध्ये विकल्या जाणार’, केंद्र सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत
Samson's disclosure about Rohit Sharma
Sanju Samson : मी फायनल खेळणार होतो पण…
Adar Poonawalla Net Worth Car Collection House Property in Marathi
Adar Poonawalla Net Worth : करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनमध्ये अदर पूनावालांची हजार कोटींची गुंतवणूक, एकूण किती संपत्तीचे आहेत मालक?
All Women Service Centre by Schwing Stetter
Schwing Stetter : आता सिमेंट मिक्सरची पिवळी यंत्रे महिला दुरुस्त करणार; वाचा कोणत्या कंपनीने घेतला निर्णय, नेमका प्रयोग काय?
Diwali Sale Top Offers for Ola Electric S1 X
९०,००० रुपयांत खरेदी करा ओलाची ‘ही’ दमदार इलेक्ट्रिक स्कूटर! गूगलवरही होतेय सर्वाधिक ट्रेंड? जाणून घ्या फीचर्स अन् बरचं काही
AI shield to protect against cyber criminals
सायबर गुन्हेगारांपासून बचावासाठी ‘एआय’ची ढाल
survey of the cluster scheme was halted due to public outrage
नागरिकांच्या रोषामुळे क्लस्टर योजनेचे सर्व्हेक्षण थांबवले
upi
त्रिनिदाद-टोबॅगोमध्ये ‘यूपीआय’सारखी प्रणाली विकसित करण्यासाठी एनपीसीआय करारबद्ध

ISRO VSSC भरती २०२३ असा करा अर्ज:

ISRO VSSC भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार अधिकृत वेबसाइट www.vssc.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. २३ मे २०२३ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येतील. अर्जाची पात्रता, वयोमर्यादा, अर्जाच्या अटी आणि निवड प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहितीसाठी, तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता

ISRO VSSC भरती २०२३ निवड प्रक्रिया

निवड प्रक्रियेमध्ये लेखी चाचणी आणि कौशल्य चाचणी असते. लेखी परीक्षेत ८० बहुपर्यायी प्रश्न असतात.
परीक्षेचा कालावधी: ९० मिनिटे.
प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.33 गुण आणि प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण वजा केले जातील.

हेही वाचा – पदवीधरांना भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी, ३७२ पदांसाठी होणार भरती, महिलांना विशेष सूट

ISRO VSSC भरती २०२३ पास निकष:

अनारक्षित श्रेणीसाठी – ३२/८० गुण.
आरक्षित श्रेणीसाठी – २४/८० गुण.

ISRO VSSC भरती २०२३ भरतीची अधिसूचना – https://www.vssc.gov.in./assets/img/PDF/Recruitment/Advt324_EN_BILINGUAL.pdf

ISRO VSSC भरती २०२३ अर्जाची अंतिम मुदतीमध्ये वाढ – https://www.vssc.gov.in./assets/img/PDF/Recruitment/Flash_News_Fireman_A.pdf

ISRO VSSC भरती २०२३ अर्ज करण्यासाठी लिंक – https://www.vssc.gov.in./advt324.html\

हेही वाचा – इंडिया पोस्टमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! मेल मोटर सेवा मुंबई येथे ‘या’ पदासाठी होणार भरती, मिळेल ‘इतका’ पगार

ISRO VSSC भरती २०२३ अर्ज शुल्क:

सुरुवातीला, सर्व अर्जदारांना समान रीतीने अर्ज शुल्क म्हणून ७५० रुपये भरावे लागतील. महिला/अनुसूचित जाती (SC)/अनुसूचित जमाती (ST)/ माजी सैनिक [माजी-एसएम] आणि बेंचमार्क अपंग (PWBD) उमेदवारांना पूर्ण शुल्क परत केले जाईल, जर उमेदवार लेखी परीक्षेत उपस्थित असेल तर. लेखी परीक्षेत बसलेल्या इतर उमेदवारांसाठी रु.५०० योग्य वेळी परत केले जातील. एकात्मिक SBI ePay सुविधेद्वारे क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड/ इंटरनेट बँकिंग/ UPI द्वारे फी भरली जाऊ शकते. पेमेंटची इतर कोणतीही पद्धत स्वीकार्य राहणार नाही.