ITAT Mumbai Recruitment 2024 : आयकर अपिलीय न्यायाधिकरण [Income Tax Appellate Tribunal] मुंबई येथे सध्या, सदस्य (न्यायिक) [Member (Judicial)], सदस्य (लेखापाल) [Member (Accountant)], उपाध्यक्ष [Vice President] अशा पदांवर भरती होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याआधी पद आणि पदसंख्या, अर्जाची अंतिम तारीख यांबद्दलची माहिती जाणून घ्यावी.
ITAT Mumbai Recruitment 2024 : पद आणि पदसंख्या
सदस्य (न्यायिक) या पदासाठी एकूण तीन जागांवर भरती होणार आहे.
सदस्य (लेखापाल) या पदासाठी एकूण सात जागांवर भरती होणार आहे.
उपाध्यक्ष या पदासाठी एकूण पाच जागांवर भरती होणार आहे.
अशा एकूण १५ जागांवर आयकर अपिलीय न्यायाधिकरणामध्ये भरती होणार आहे.
हेही वाचा : SAI recruitment 2024 : भारतीय क्रीडा प्राधिकरणात नोकरीची सुवर्णसंधी! पाहा भरतीची माहिती
ITAT Mumbai Recruitment 2024 – आयकर अपिलीय न्यायाधिकरण अधिकृत वेबसाइट –
https://legalaffairs.gov.in/
ITAT Mumbai Recruitment 2024 – अधिसूचना –
https://legalaffairs.gov.in/itat-recruitment/docs/Members_Notice.pdf
ITAT Mumbai Recruitment 2024 : अर्ज प्रक्रिया
वर नमूद केलेल्या कोणत्याही पदावर नोकरीस इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करायचा असल्यास तो ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
कोणत्याही पदासाठी अर्ज करण्याआधी नोकरीसंबंधीची अधिसूचना काळजीपूर्वक वाचून घ्यावी. त्यानंतरच नोकरीसाठी अर्ज करावा.
नोकरीचा अर्ज भरताना संपूर्ण आणि अचूक माहिती द्यावी.
तसेच, अर्जासह आवश्यक सर्व कागदपत्रे जोडावीत.
नोकरीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर एका महिन्याच्या आत उमेदवाराने नोकरीचा अर्ज करणे अपेक्षित आहे.
वर नमूद केलेल्या नोकरीसंबंधीची अधिसूचना १५ मार्च २०२४ च्या तारखेची आहे.
नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास नोकरीसंदर्भात अधिक माहिती हवी असल्यास आयकर अपिलीय न्यायाधिकरणाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी अथवा नोकरीची अधिसूचना वाचावी. वेबसाइट, तसेच अधिसूचना वर नमूद केलेली आहे.