ITBP Recruitment 2024: इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्समध्ये सुपर स्पेशॅलिस्ट मेडिकल ऑफिसर, स्पेशॅलिस्ट मेडिकल ऑफिसर आणि मेडिकल ऑफिसर या पदांसाठी जागा भरण्यात येत आहेत. या भरतीसाठी आवश्यक पात्रता, अनुभव, अर्ज प्रक्रिया, तसेच निवड प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती लेखात देण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.पात्र उमेदवार recruitment.itbpolice.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

रिक्त जागा तपशील

सुपर स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी: ५ पदे

स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी: १७६ पदे

वैद्यकीय अधिकारी: १६४ पदे

अधिसूचनेमध्ये असे म्हटले आहे की, भरती झाल्यावर उमेदवाराला वेळोवेळी सुधारित केलेल्या कायद्या आणि नियमांद्वारे नियंत्रित केले जाईल. निवडलेले उमेदवार भारतात किंवा परदेशात कुठेही सेवा करण्यास जबाबदार असतील. सेवेच्या आवश्यकतेनुसार, १ जानेवारी २००४ पासून लागू होणाऱ्या केंद्र सरकारच्या सेवांमधील नवीन प्रवेशकर्त्यांना ‘नवीन पुनर्रचित परिभाषित अंशदायी पेन्शन योजना’ नुसार निवृत्तीवेतन लाभांसाठी उमेदवार पात्र असतील.”

ज्या उमेदवारांचे ऑनलाइन अर्ज स्वीकारले गेले आहेत त्यांना मुलाखतीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाणाचा तपशील असलेले ई-प्रवेशपत्र मिळेल. CAPF आणि AR मध्ये नियुक्तीसाठी त्यांच्या योग्यतेचे मूल्यांकन करण्यासाठी यानंतर शारीरिक मानक चाचण्या (PST) आणि वैद्यकीय परीक्षा चाचण्या (MET) घेतल्या जातील.

हेही वाचा >> बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ६०० रिक्त पदांसाठी भरती; अर्ज कसा करायचा जाणून घ्या

वयोमर्यादा

१. सुपर स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी (सेकंड-इन-कमांड): अर्जाच्या शेवटच्या तारखेनुसार कमाल वयोमर्यादा ५० वर्षे आहे.
२. विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी (डेप्युटी कमांडंट): अर्जाच्या शेवटच्या तारखेनुसार कमाल वयोमर्यादा ४० वर्षे आहे.
३. वैद्यकीय अधिकारी (असिस्टंट कमांडंट): अर्जाच्या शेवटच्या तारखेनुसार कमाल वयोमर्यादा ३० वर्षे आहे