ITBP Constable GD Recruitment 2023: इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस फोर्समध्ये कॉन्स्टेबल GD या पदासाठी रिक्त जागा निघाल्या आहेत. २० फेब्रुवारीपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्याची इच्छा आहे ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ मार्च २०२३ आहे. शेवटच्या तारखेनंतर केलेले अर्ज कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या वेबसाइटवरून फॉर्म भरा..

इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्सच्या कॉन्स्टेबल जनरल ड्युटी या पदासाठी फक्त ऑनलाइन अर्ज करता येईल. यासाठी तुम्हाला ITBP च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल ज्याचा पत्ता recruitment.itbpolice.nic.in आहे . इतर कोणत्याही माध्यमातून केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

रिक्त जागा तपशील

या भरती मोहिमेद्वारे एकूण ७१ पदे भरण्यात येणार आहेत. ही पदे कॉन्स्टेबल/जनरल ड्युटीसाठी आहेत. तपशील जाणून घेण्यासाठी, तुम्ही अधिकृत वेबसाइटवर दिलेली सूचना तपासू शकता.

शैक्षणिक पात्रता काय आहे

या पदांसाठी अर्ज करण्याची पात्रता वेबसाइटवर दिलेल्या नोटिसमध्ये तपासली जाऊ शकते. शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही पुढे असलेल्या उमेदवारांसाठी ही पदे खास आहेत. अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा १८ ते २३ वर्षे ठेवण्यात आली आहे. २१ मार्च २०२३ पासून वयाची गणना केली जाईल.

( हे ही वाचा: ‘हे’ ऑनलाइन प्लॅटफॉर्म मोफत देतात चांगल्या खाजगी नोकऱ्या, नोंदणीसाठी एक रुपयाही लागत नाही)

अर्जाची फी किती आहे

UTBP च्या या रिक्त पदांसाठी अर्ज करण्यासाठी UR, OBC, EWS श्रेणीतील उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरावे लागेल. तर SC, ST, महिला आणि माजी सैनिकांना अर्ज शुल्क भरावे लागत नाही.

पगार किती आहे

या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना २१,७०० रुपये ते ६९,१०० रुपये प्रति महिना पगार मिळेल. इतर कोणत्याही गोष्टीबद्दल तपशीलवार माहिती मिळविण्यासाठी, तुम्ही अधिकृत वेबसाइटवर दिलेली सूचना तपासू शकता.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Itbp constable gd recruitment 2023 for 71 posts apply before 21 march gps
Show comments