ITBP Constable Recruitment 2024: इंडो तिबेट बॉर्डर पोलीस फोर्सद्वारे (ITBP) कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार ITBP च्या अधिकृत वेबसाइट recruitment.itbpolice.nic.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेद्वारे संस्थेतील ८१९ पदे भरण्यात येणार आहेत.

ITBP Constable Recruitment 2024: केव्हा सुरू होईल नोंदणी?

नोंदणी प्रक्रिया 2 सप्टेंबर रोजी सुरू होईल आणि १ ऑक्टोबर 2024 रोजी समाप्त होईल. पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर तपशीलांसाठी खाली वाचा.

maharashtra govt introduces new guidelines for school picnic
शैक्षणिक सहलींसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडून दक्षतेची सूचना
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
education board warning against schools for obstructing students while filling exam application zws
परीक्षा अर्ज भरताना अडवणूक केल्यास शाळांवर कारवाई;  शिक्षण मंडळाचा इशारा
NEET Postgraduate Exam Schedule Announced Wardha news
नीट पदव्युत्तर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; वैद्यक आयोग म्हणतो…
DoT recruitment 2024 Apply for Sub Divisional engineer salary up to Rs 151100
DoT recruitment 2024: सब-डिव्हिजन इंजीनिअरच्या पदासाठी होणार भरती;१,५१,१०० रुपयांपर्यंत मिळेल पगार, आताच करा अर्ज
Kolkata Metro Railway to recruit for 128 Apprentice posts, registration begins on Dec 23 at mtp.indianrailways.gov.in
कोलकाता मेट्रोमध्ये भरती; नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी, लगेचच करा अर्ज
Central Electronics Limited Recruitment 2024: Application Begins For Junior Technical Assistant And Technician Posts, Check Details
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्समध्ये भरती, मिळणार ७५ हजारपर्यंत पगार, अर्ज कसा करायचा? जाणून घ्या
SBI Clerk Recruitment 2024 Notification 2024 released for recruitment of Junior Associates at sbi.co.in
SBI Recruitment 2024: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती; इच्छुक उमेदवारांनी लगेच करा अर्ज; अर्जाची लिंक बातमीत

हेही वाचा – Success Story: नोकरी सोडून स्वतःच्या गावात सुरू केला मसाल्यांचा व्यवसाय; महिन्याला कमावतात लाखो रुपये

ITBP Constable Recruitment 2024 रिक्त जागा तपशील

पुरुष : ६९७ पदे
महिला: १२२ पदे

ITBP Constable Recruitment 2024 पात्रता निकष

ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांच्याकडे मान्यता प्राप्त मंडळाकडून मॅट्रिक किंवा इयत्ता दहावी पास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा १८ ते२५ वर्षांच्या दरम्यान असावी.

हेही वाचा – CISF Recruitment 2024: ११३० कॉन्स्टेबल फायरमनच्या पदासाठी होणार भरती! या तारखेपूर्वी करा अर्ज

ITBP Constable Recruitment 2024 निवड प्रक्रिया

निवड प्रक्रियेमध्ये शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), शारीरिक मानक चाचणी (PST), लेखी परीक्षा, मूळ कागदपत्रांची पडताळणी आणि तपशीलवार वैद्यकीय परीक्षा (Detailed Medical Examination )/ पुनरावलोकन वैद्यकीय परीक्षा (Review Medical examination ) यांचा समावेश असेल. उमेदवारांच्या तंदुरुस्तीचे मूल्यांकन करण्यासाठी वैद्यकीय तपासणी CAPF आणि AR मध्ये GO आणि NGO साठी भरतीसाठी एकसमान मार्गदर्शक तत्त्वांच्या संदर्भात घेतली जाईल.

ITBP Constable Recruitment 2024 अर्ज शुल्क

अर्जाची फी ₹१००/- आहे. महिला, माजी सैनिक आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्कामध्ये सूट देण्यात आली आहे.

ITBP Constable Recruitment 2024 अधिसुचना वाचा – https://cbcindia.gov.in/cbc/public/uploads/client-request/English-19143-11-0018-2425-66bef6237d111-1723790883-creatives.pdf

ITBP Constable Recruitment 2024 अर्ज कसा करावा

  • ITBP च्या recruitment.itbpolice.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • होम पेजवर उपलब्ध असलेल्या ITBP कॉन्स्टेबल रिक्रूटमेंट २०२४ लिंकवर क्लिक करा.
  • एक नवीन पेज उघडेल जिथे उमेदवारांना नोंदणी तपशील भरावा.
  • सबमिट बटनावर क्लिक करा आणि खात्यात लॉग इन करा.
  • अर्ज शुल्क भरा
  • सबमिट बटनावरवर क्लिक करा आणि अर्ज डाउनलोड करा.
  • पुढील आवश्यकतेसाठी त्याची हार्ड कॉपी जवळ ठेवा.
  • अधिक संबंधित तपशीलांसाठी उमेदवार ITBP ची अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.

Story img Loader