ITBP Bharti 2023: इंडो-तिबेट सीमा पोलीस दलाने काही रिक्त जागासाठीची भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. TBPF भरतीअंतर्गत कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) पदाच्या एकूण ४५८ रिक्त जागा भरणार आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जुलै २०२३ ही आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार अर्ज करु शकतात. या भरतीसाठी उमेदवारांची आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज फी याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पदाचे नाव – कॉन्स्टेबल (ड्रायव्हर)
एकूण पदसंख्या – ४५८
शैक्षणिक पात्रता व अनुभव –
- मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून १० वी पास किंवा समकक्ष शिक्षण.
- वैध अवजड वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
हेही वाचा- सरकारी नोकरीची संधी! SEBIमध्ये ‘या’ पदांसाठी होणार भरती! कोण करू शकते अर्ज? जाणून घ्या
अर्ज शुल्क – शंभर रुपये.
वयोमर्यादा – २१ ते २७ वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
महत्वाच्या तारखा –
- अर्ज सुरू होण्याची तारीख – २७ जुन २०२३
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ जुलै २०२३
अधिकृत वेबसाईट – recruitment.itbpolice.nic.in
पगार – २१ हजार ७०० रुपये ते ६९ हजार १०० रुपयांपर्यंत.
भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती पाहण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1J8c4NMCIONEXQdzcpr2o8w8iJ7PZTLzx/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.