MO Recruitment 2023 Last Date: इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्सने काही काळापूर्वी वैद्यकीय अधिकाऱ्याच्या बंपर पदासाठी भरती केली होती. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया बराच काळ सुरू असून अर्ज करण्याची अंतिम तारीखही काही दिवसांनी येणार आहे. त्यामुळे इच्छा असूनही तुम्हाला कोणत्याही कारणास्तव अर्ज करता आला नसेल, तर आताच करा. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ मार्च २०२३ आहे. या भरतीच्या अर्जाशी संबंधित महत्त्वाची माहिती जाणून घ्या. ज्या उमेदवारांना ITBP मध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून सामील व्हायचे आहे ते अर्ज करू शकतात.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
अर्जाशी संबंधित महत्त्वाची माहिती जाणून घ्या
- या भरती मोहिमेद्वारे सुपर स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी, विशेष वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी ही पदे भरण्यात येणार आहेत.
- १५ फेब्रुवारीपासून अर्ज स्वीकारले जात आहेत आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ मार्च २०२३ आहे.
- या पदांसाठी फक्त ऑनलाइन अर्ज करता येतील. यासाठी तुम्हाला इंडो तिबेट बॉर्डर पोलिस फोर्सच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल, ज्याचा पत्ता आहे itbpolice.nic.in .
( हे ही वाचा: Air India मध्ये एयरक्राफ्ट टेक्निशियन पदासाठी बंपर भरती; ‘या’ तारखेपूर्वी अर्ज करा)
- इतर कोणत्याही माध्यमातून केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- या भरती मोहिमेद्वारे एकूण २९७ पदे भरण्यात येणार आहेत. यापैकी ५ पदे सुपर स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी, १८५ पदे स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी आणि १०७ पदे वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी आहेत.
- ITBP च्या या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, सामान्य, OBSC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना ४०० रुपये शुल्क भरावे लागेल.
- एससी, एसटी आणि माजी सैनिकांना अर्ज शुल्क भरावे लागणार नाहीत.
- अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय आणि शैक्षणिक पात्रता पदानुसार बदलते. यासाठी तुम्ही नोटीस तपासू शकता.
- या पदांसाठी उमेदवारांची निवड कागदपत्रे आणि बी शारीरिक मानक चाचणीसह मुलाखतीच्या आधारे केली जाईल.
First published on: 03-03-2023 at 17:23 IST
मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Itbp recruitment 2023 for 2 medical officer posts apply before 16 march gps