ITBP Recruitment 2024: इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्समध्ये उपनिरीक्षक (टेलिकम्युनिकेशन), हेड कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) आणि कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरतीसाठी आवश्यक पात्रता, अनुभव, अर्ज प्रक्रिया, तसेच निवड प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती लेखात देण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पात्र उमेदवार recruitment.itbpolice.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. आयटीबीपीमध्ये ज्यांना नोकरी करण्याची इच्छा आहे त्यांना १ ५ नोव्हेंबरपासून १४ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करता येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोणत्या पदासाठी किती जागांची भरती ?

उपनिरीक्षक (टेलिकम्युनिकेशन) या पदाच्या एकूण ९२ जागा भरल्या जाणार आहेत. यापैकी ७८ पुरुष उमेदवारांसाठी तर १४ महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या पदावर निवड होणाऱ्या उमेदवारांना ३५४०० ते ११२४०० रुपये वेतनश्रेणीनुसार वेतन मिळेल. या पदासाठी अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांचं वय २० ते २५ वर्ष असणं आवश्यक आहे.

हेड कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) या पदाच्या एकूण ३८३ जागांवर भरती केली जाणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी ३२५ आणि महिला उमेदवारांसाठी ५८ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना २५५०० ते ८११०० रुपये वेतनश्रेणीनुसार पगार दिला जाईल. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय १८-२५ वर्ष दरम्यान असावं.

कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) या पदासाठी एकूण ५१ जागा भरल्या जाणार आहेत. यापैकी ४४ जागा पुरुष उमेदवारांसाठी राखीव आहेत. ७ जागा महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय १८ ते २३ वर्ष असणं आवश्यक आहे. निवड होणाऱ्या उमेदवारांना २१७०० रुपये ते ६९१०० रुपये वेतनश्रेणीनुसार वेतन मिळेल. या भरतीपैकी १० टक्के जागा माजी सैनिकांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

हेही वाचा >> तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; इंजीनियर्स इंडिया लिमिटेडमध्ये मोठी भरती; जाणून घ्या कसा कराल अर्ज

अर्ज शुल्क

उपनिरीक्षक पदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी अर्जाचं शुल्क म्हणून २०० रुपये भरावे लागतील. हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करणाऱ्यांना १०० रुपये शुल्क भरावं लागेल. महिला, माजी सैनिक, अनुसूचित जाती, अनूसुचित जमाती या प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क भरावं लागणार नाही.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Itbp recruitment 2024 for 526 seats sub inspector head constable and constable check details career news in marathi srk