सुहास पाटील
इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्स (ITBP), (गृहमंत्रालय, भारत सरकार) पुरुष उमेदवारांची ‘कॉन्स्टेबल (ड्रायव्हर)’ पदांवर भरती. एकूण रिक्त पदे – ४५८ (अजा – ७४, अज – ३७, इमाव – ११०, ईडब्ल्यूएस – ४२, खुला – १९५).
वेतन श्रेणी : पे-लेव्हल – ३ (रु. २१,७०० – ६९,१००) महागाई भत्ता आणि इतर भत्ते अंदाजे दरमहा वेतन रु. ४०,०००/-.
पात्रता : (i) १० वी उत्तीर्ण, (ii) अवजड वाहन चालविण्याचा परवाना (HMV Driving Licence).
वयोमर्यादा : (दि. २६ जुलै २०२३ रोजी) १८ ते २७ वर्षे. (उमेदवाराचा जन्म दि. २७ जुलै १९९६ ते २६ जुलै २००२ दरम्यानचा असावा.) (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/ अज – ५ वर्षे.)
निवड पद्धती : अॅडमिट कार्ड उमेदवारांना ऑनलाइन उपलब्ध करून दिले जातील. शारीरिक क्षमता चाचणी (PET) आणि शारीरिक मापदंड चाचणी (PST) च्या ठिकाणी हजर होताना उमेदवारांनी ऑनलाइन अर्जाची प्रिंटआऊट आणि अॅडमिट कार्ड घेऊन येणे आवश्यक.
(i) फेज- I – शारीरिक क्षमता चाचणी (PET)) : १.६ कि.मी. अंतर ७ मि. ३० सेकंदांत धावणे, लांब उडी – ११ फूट, उंच उडी – ३१/२ फूट (लांब उडी आणि उंच उडीसाठी ३ संधी दिल्या जातील.) ढएळ फक्त पात्रता स्वरूपाची असेल.
शारीरिक मापदंड चाचणी (PST) : उंची – १७० सें.मी., अनुसूचित जमातीसाठी १६२.५ सें.मी., छाती – ८०-८५ सें.मी. (अज – ७६-८१ सें.मी.), दृष्टी – दूरची दृष्टी (चष्म्याशिवाय) – चांगला डोळा – ६/६, खराब डोळा – ६/६.
(ii) PET/ PST मध्ये पात्र ठरलेले उमेदवारांना अॅडमिट कार्ड ऑनलाइन जारी केले जाईल.
(iii) फेज- II – लेखी परीक्षा : १०० गुणांची लेखी परीक्षा OMR बेस्ड किंवा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) घेतली जाईल. ज्यात (१) जनरल नॉलेज, (२) मॅथेमॅटिक्स, (३) इंग्लिश, (४) हिंदी प्रत्येकी १० प्रश्न, १० गुणांसाठी, (५) ट्रेड/ प्रोफेशनशी संबंधित – ६० प्रश्न, ६० गुण. एकूण १०० गुण, वेळ २ तास.
फेज- ककक – कागदपत्र पडताळणी : अजा/ अज उमेदवारांकडे Annexure- I, इमावसाठी सर्टिफिकेट Annexure- II, ईडब्ल्यूएससाठी Annexure- III मध्ये सर्टिफिकेट्स असणे आवश्यक. इमावच्या उमेदवारांनी Annexure- IIA मधील डिक्लेरेशन देणे आवश्यक.
प्रॅक्टिकल एक्झामिनेशन : कागदपत्र पडताळणीत उत्तीर्ण ठरलेल्या उमेदवारांची प्रॅक्टिकल टेस्ट घेतली जाईल. (i) इंजिन सुरू करण्यापूर्वी करावयाच्या तपासण्या – वेहिकल सेंसर, सिग्नल्स आणि rear view मिरर अॅडजस्टमेंट. (ii) सुरळीतपणे सरळ ड्रायिव्हग करताना गिर बदलणे, ट्रॅफिक कंडिशन पाहता टॉप गिअरमधून लोवर गिअरमध्ये येणे. (iii) चढावावर आणि उतारावर गाडी चढविणे उतरविणे, थांबणे आणि रोल बॅक न होता रिस्टार्ट मारणे. (iv) ओवर टेकिंगचे टेक्निक, पास देणे, लेन बदलणे आणि लेन ड्रायव्हिंग करताना इतर काळजी घेणे. (v) हाताच्या सिग्नलचा वापर तसेच इलेक्ट्रिक सिग्नल्स, इमरजन्सी थांबणेसाठी प्रिकॉशन्स आणि सेफ्टी पाहणे. (vi) वेहिकल रिव्हर्स घेणे, गॅरेजमधून गाडी ठेवणे-काढणे, डावीकडे-उजवीकडे गाडी वळविणे आणि थांबणे. (vii) इतर वाहन चालकांप्रती शिष्टाचार पाळणे, त्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी काळजी घेणे. (viii) अनिवार्य, चेतावनी आणि रोड साईन्सची माहिती असणे. (ix) अॅक्सिडंट झाल्यास ड्रायव्हरची कर्तव्ये काय असतात याचे ज्ञान. (x) मोटर मेकॅनिझमचे ज्ञान आणि लहान-मोठी दुरुस्तीची कामे करता यावीत. प्रॅक्टिकल एक्झामिनेशन फक्त पात्रता स्वरुपाची असेल. प्रत्येक विषयासाठी ५ गुण दिले जातील. एकूण ५० गुण.
मेरिट लिस्ट : लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार कॅटेगरीनिहाय गुणवत्ता यादी बनविली जाईल. (उमेदवारांची डिटेल्ड मेडिकल एक्झामिनेशन (ऊटए) घेतली जाईल. उमेदवार रिव्ह्यू मेडिकल एक्झामिनेशनसाठी Annexure- VII प्रमाणे २४ तासांच्या आत अपिल करू शकतात.) निवडलेल्या उमेदवारांना बेसिक ट्रेनिंग कोर्स आणि इतर कोर्सेस पूर्ण करावे लागतील. शंकासमाधानासाठी ई-मेल आयडी rectsupport@itbp.gov.in
हेल्पलाईन नं. ०११-२४३६९४८२/२४३६९४८३
परीक्षा शुल्क – रु. १००/-. (अजा/अज/माजी सैनिक उमेदवारांना फी माफ आहे.)
ऑनलाइन अर्ज http://www.recruitment.itbpolice.nic.in या संकेतस्थळावर २६ जुलै २०२३ (२३.५९ वाजे) पर्यंत करावेत.