NTA JEE Main 2024 Result Updates, Session 1: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) तर्फे आज (१२ फेब्रुवारी) संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) मुख्य २०२४ चा निकाल जाहीर करण्यात येऊ शकतो. देशभरातील तब्बल ११ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. आज संध्याकाळपर्यंत हा निकाल जाहीर केला जाऊ शकतो व निकाल पाहण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट jeemain.nta.ac.in. ला भेट द्यायची आहे. २४ जानेवारी ते १ फेब्रुवारीच्या दरम्यान जेईई मेनची परीक्षा झाली होती. इयत्ता १२ वीची परीक्षा पूर्ण झाल्यावर जेईई मेन सेशन २ ची परीक्षा एप्रिलमध्ये घेण्यात येणार आहे. आज जेईई मेनच्या भाग १ चा निकाल जाहीर झाल्यावर स्कोअरकार्ड जाहीर केले जाईल पण ऑल इंडिया रँक एप्रिलमधील परीक्षा झाल्यावर जाहीर केली जाईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

NTA JEE मेन रिझल्ट २०२४: स्कोअर कार्ड डाउनलोड कसे कराल?

  • अधिकृत वेबसाइट – jeemain.nta.ac.in – ला भेट द्या
  • नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड भरून लॉग इन करा
  • एकदा यशस्वीरित्या लॉग इन केल्यानंतर, आपण प्रोफाइलमध्ये स्कोअर कार्ड तपासू शकाल.

जेईई मेन रिझल्ट २०२४ तपासण्याआधी गुण कसे मोजले जातील हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. लक्षात घ्या निकाल तुम्हाला पुन्हा तपासणीसाठी देता येणार नाही. इथे पाहा गुण मोजण्याची पद्धत..

1- जेईई मेन परीक्षेत प्रत्येक बरोबर उत्तरासाठी ४ गुण दिले हाटेल (+4).

2- निगेटिव्ह मार्किंग असल्याने चुकीच्या उत्तरासाठी १ गुण कमी केला जाईल(-1).

3- एखाद्या प्रश्नाचे उत्तर दिले नसेल आणि त्याला रिव्ह्यू साठी राखीव ठेवले असेल तर शून्य गुण मिळतील(0).

4- जर एखाद्या प्रश्नाच्या योग्य उत्तराचे एकाहून अधिक पर्याय असतील तर कोणत्याही योग्य उत्तरासाठी चार गुण दिले जातील (+4).

5- जर सगळे पर्याय योग्य असतील तर प्रश्न सोडवल्यास सुद्धा चार गुण मिळतील. (+4).

दरम्यान, NTA ने शेअर केलेल्या माहितीनुसार, नोंदणीकृत उमेदवारांपैकी ९५.८ टक्के उमेदवार जेईई मेन जानेवारी २०२४ च्या परीक्षेत पेपर 1 (बीई / बीटेक) साठी हजर होते. ही आकडेवारी एनटीएने जेईई मेन परीक्षा घेण्यास सुरुवात केल्यापासून ही उपस्थितीची सर्वाधिक टक्केवारी आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jee main 2024 result updates in marathi to check the scorecard candidates should visit the official website jeemain nta ac in svs