नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने १ जानेवारी रोजी २०२५ साठी संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. JEE Main दोन पेपरसाठी घेतली जाते – पेपर १ (BE/BTech) आणि पेपर २ (BArch/BPharm). २२, २३,२४,२८ आणि २९ जानेवारीला पहिला पेपर होणार आहे, तर दुसरा पेपर २०0 जानेवारीलाच होणार आहे.
BE/BTech चा पेपर दोन शिफ्टमध्ये घेतला जाईल – पहिली शिफ्ट सकाळी ९ ते दुपारी १२ आणि दुसरी शिफ्ट दुपारी ३ ते ६ दरम्यान होईल. पेपर २ए (BArch), पेपर २बी (BPlanning) आणि पेपर २A आणि २बी (BArch आणि BPlanning दोन्ही) हे पेपर ६.३० रोजी दुपारी३ च्या दरम्यान दुसऱ्या शिफ्टमध्ये होतील.
हेही वाचा –बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करण्याची हीच ‘ती’ मोठी संधी; १२०० हून अधिक पदांवर भरती, कसा कराल अर्ज जाणून घ्या
असाच ट्रेंड चालू ठेवत, या वर्षी जेईई मेन देखील दोन सत्रांमध्ये होणार आहे. पहिले सत्र जानेवारीत, तर पुढचे सत्र एप्रिलमध्ये होणार आहे.
जेईई मेनची अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in आहे. जेईई मेन वेबसाइटने जेईई मुख्य तारखा, अधिसूचना आणि अभ्यासक्रमासह सर्व माहिती उपलब्ध करून दिली आहे.
अधिकृत सुचना – https://cdnbbsr.s3waas.gov.in/s3f8e59f4b2fe7c5705bf878bbd494ccdf/uploads/2025/01/2025010196.pdf
२०२४ मध्ये, जेईई मेन जानेवारी आणि एप्रिलमध्ये घेण्यात आले होते. जानेवारी सत्र परीक्षा २४ ते ३१ जानेवारी आणि एप्रिल सत्र परीक्षा ६ ते १२ एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आली होती. मागील वर्षी, जेईई मेनसाठी नोंदणी १ नोव्हेंबरपासून सुरू झाली होती आणि एक महिन्यापेक्षा जास्त काळ चालू होती. परीक्षा कोणत्या शहरात होईल याबाबत माहिती नंतर उपलब्ध करून दिली जाते.
जानेवारी २०२४ (सत्र १) परीक्षेत एकूण १२,२१,६२४ उमेदवारांची नोंदणी झाली, त्यापैकी ११,७०,०४८ उमेदवारांनी हजेरी लावली आणि एप्रिल २०२४ (सत्र २) परीक्षेत एकूण ११७९,५६९ उमेदवारांनी नोंदणी केली, त्यापैकी १०,६७, ९५९ उमेदवार परीक्षेला बसले. एकूण नोंदणीची संख्या २०२२ मध्ये १०.२६ लाखांवरून २०२३ मध्ये ११.६२ लाख झाली आहे.
ज