Om Prakash Behera success story : असं म्हणतात, जर कोणतीही गोष्ट मनापासून मिळवण्याचा प्रयत्न केला, तर यश मिळतेच मिळते. त्यासाठी फक्त मेहनत आणि प्रबळ इच्छाशक्ती असावी लागते. आज आपण अशाच एका मेहनती विद्यार्थ्याविषयी जाणून घेणार आहोत. ज्याने परीक्षेत यश मिळवीत आईवडिलांचे नाव मोठे केले.
नुकताच JEE Mains 2025 चा निकाल जाहीर झाला. या परिक्षेतील टॉपर्सची लिस्ट समोर आली आहे. त्यामध्ये १०० टक्के मिळवण्यात २४ विद्यार्थ्यांना यश आले आहेत. या २४ विद्यार्थ्यांमध्ये ओडिशा राज्यातील भुवनेश्वर येशील ओमप्रकाश बेहरानेसुद्धा पूर्ण देशात टॉप केले आहे आणि ऑल इंडिया रँक (AIR) मिळवली आहे. ओमप्रकाशने मिळवलेले हे यश वाटते तेवढे इतके सोपे नव्हते, त्यामागे त्याने दिवस-रात्र घेतलेली मेहनत होती. मेहनतीच्या जोरावर त्याने हे यश कमावले. त्याने खूप जीव तोडून अभ्यास केला आणि ही कठीण परीक्षा तो उत्तीर्ण झाला. आज आपण ओमप्रकाश बेहेराचा करिअर प्रवास आणि त्याला हे यश कसे मिळाले, त्याविषयी जाणून घेणार आहोत.

मेहनतीचे गोड फळ

ओमप्रकाश बेहरा ओडिशाच्या भुवनेश्वर येथे राहणारा मुलगा. तो लहानपणापासून अभ्यासात हुशार होता. त्याने दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवले. त्यानंतर त्याने तीन वर्षे राजस्थानच्या कोटामध्ये राहून JEE ची तयारी सुरू केली. खूप मेहनतीने अभ्यास केला आणि शिक्षकांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्ट फॉलो केली. आज त्याला त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले. ओमप्रकाशने JEE Mains 2025 मध्ये ३०० पैकी ३०० गुण मिळवले. त्याचे यश लाखो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा आहे.

IIT मुंबईमधून शिक्षणाची आस

ओमप्रकाश सांगतो की, तो नेहमी वर्तमानावर लक्ष केंद्रित करतो. त्याच्या मते, मोबाईलमुळे लक्ष विचलित होते. त्यामुळे त्याच्याकडे स्मार्टफोन नाही. दर दिवशी तो आठ ते नऊ तास सेल्फ स्टडी करायचा. आता तो जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेची तयारी करीत आहे.
ओमप्रकाशला IIT मुंबईमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक.चे शिक्षण घ्यायचे आहे. त्याला कादंबरी वाचायला आवडते. ओमप्रकाशची आई स्मिता राणी या ओडिशामध्ये कॉलेज लेक्चरर आहे; पण मुलाच्या मदतीसाठी कोटा येथे त्या तीन वर्षांसाठी सुट्टी घेऊन आलेल्या आहेत.