JEE Main Exam Topper Story : ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ने (National Testing Agency) जानेवारीत घेतलेल्या जेईई मेन परीक्षेचा (JEE Main Exam) निकाल मंगळवारी जाहीर केला . या निकालात १४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल गुण मिळाले आहेत. महाराष्ट्रातील विशाद जैनने १०० पर्सेंटाइल गुण मिळवीत पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या टॉपर्सच्या अनेक प्रेरणादायी कथा व्हायरल होत आहेत. तर आज आपण अशाच एका १०० पर्सेंटाइल गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याचा आत्मविश्वास इतका वाढला होता की, त्याने उत्तर कीदेखील तपासली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या विद्यार्थ्याचे नाव रजित गुप्ता असे आहे. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत रजितने यश मिळविण्याचा आपला अनोखा दृष्टिकोन शेअर केला. “आनंद ही माझ्या यशाची गुरुकिल्ली आहे. मी प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहतो“, असे तो म्हणाला. अभ्यासाचे (JEE Main Exam) काटेकोर वेळापत्रक पाळणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या विपरीत रीतीने म्हणजे रजितने त्याला वाटेल तेव्हाच अभ्यास केला. पण, तो अभ्यास त्याने पूर्ण लक्ष केंद्रित करून केला.

पप्पा, काळजी करू नका…

त्याचप्रमाणे त्याने झालेल्या चुका पुन्हा घडणार नाहीत यावर लक्ष केंद्रित केले. कारण- जेव्हा चुका काढल्या जातात, तेव्हाच तुमच्या विषयाचा पाया मजबूत होतो, असे त्याने स्पष्ट केले. त्याच्या अभ्यासाच्या तयारीवरचा विश्वास इतका दृढ होता की, जेव्हा वडिलांनी उत्तर की तपासण्यास सुचवले तेव्हा त्याने उत्तर दिले, “पप्पा, काळजी करू नका.“

रजित हा राजस्थानमधील चार विद्यार्थ्यांपैकी एक आहे, ज्यांनी १०० पर्सेंटाइल गुण मिळवले आहेत. तसेच हे सर्व विद्यार्थी एकाच कोटा-बेस कोचिंग संस्थेतील आहेत. संस्थेतील इतर १०० पर्सेंटाइल गुण मिळवणाऱ्यांमध्ये ओम प्रकाश बेहरा, सक्षम जिंदाल व अर्णव सिंग यांचा समावेश आहे. संपूर्ण भारतातील १४ विद्यार्थ्यांनी जेईई मेन २०२५ मध्ये (JEE Main Exam) १०० पर्सेंटाइल गुण मिळवले, ज्यामध्ये राजस्थानचे सर्वाधिक टॉपर्स आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने ४४ राज्य टॉपरदेखील जाहीर केले, त्यापैकी १४ कोटा कोचिंग इन्स्टिट्यूटशी जोडलेले आहेत.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jee main exam topper rajit gupta success story who studied only when he felt like it but ensured he studied with full focus asp