JKSSB to recruit 669 Sub Inspectors: जम्मू आणि काश्मीर सेवा निवड मंडळ जम्मू आणि काश्मीर पोलिसांमध्ये ६६९ उपनिरीक्षकांच्या रिक्त जागांसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच भरतीसाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. मग उशीर कशाला करता लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी. कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही भरतीसाठी अर्ज करू शकता. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.
अधिकृत वेळापत्रकानुसार, भरतीसाठी अर्जप्रक्रिया ३ डिसेंबरपासून सुरू होईल आणि २ जानेवारी २०२५ रोजी संपेल. एकदा भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर, सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार jkssb.nic.in या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.
JKSSB SI Recruitment 2024: पात्रता निकष
JKSSB SI Recruitment 2024: अधिवास: अर्जदार जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशात निवासी असणे आवश्यक आहे. हे सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे २ जानेवारी २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी जारी केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
JKSSB SI Recruitment 2024: वयोमर्यादा:
सेवेतील कर्मचारी वगळता उमेदवारांचे वय १८-२८ वर्षांच्या दरम्यान असावे. त्यांच्यासाठी, वयोमर्यादा १८-३० वर्षे आहे. वयोमर्यादा निश्चित करण्यासाठी कट-ऑफ तारीख १ जानेवारी २०२४ आहे.
JKSSB SI Recruitment 2024: शिक्षण:
अर्जदारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी आवश्यक आहे. या व्यतिरिक्त, शारीरीकदृष्ट्या निरोगी असणं आवश्यक आहे.
JKSSB SI Recruitment 2024: फी –
SC, ST-1, ST-2 आणि EWS श्रेणीतील उमेदवारांशिवाय अर्जाची फी ₹७०० आहे. या श्रेण्यांसाठी, अर्जाची फी ₹६०० आहे.
परीक्षेची तारीख, केंद्र आणि अभ्यासक्रम नंतर जाहीर केला जाईल. निवड प्रक्रियेत तीन टप्पे आहेत – लेखी परीक्षा, शारीरिक मानक चाचणी आणि शारीरिक सहनशक्ती चाचणी. लेखी परीक्षेत वस्तुनिष्ठ स्वरूपाचे बहुपर्यायी प्रश्न असतील. पेपर फक्त इंग्रजीत असेल.लेखी परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग असेल. प्रश्नाचे उत्तर चुकीचे असल्यास एकूण गुणांपैकी एक चतुर्थांश वजा केले जातील.
नॅशनल कॅडेट कॉर्प्स (NCC) ‘C’ प्रमाणपत्र धारकांना ५ टक्के बोनस गुण मिळतील. NCC ‘B’ प्रमाणपत्र धारक ३ टक्के बोनस गुणांसाठी पात्र आहेत आणि NCC ‘A’ प्रमाणपत्र धारक २ टक्के बोनस गुणांसाठी पात्र आहेत.अधिक तपशीलांसाठी, उमेदवार JKSSB च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.