Sarkari Naukari 2023: दहावी, बारावी आणि पदवीधर उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची एक उत्तम संधी निर्माण झाली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया काही काळापासून सुरू असून अर्ज करण्याची अंतिम तारीख १० मार्च आहे. ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज भरायचे आहेत, त्यांनी विहित नमुन्यात वेळेत अर्ज करावेत. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात या रिक्त जागा आल्या आहेत, ज्या अंतर्गत अनेक शिक्षकेतर पदांसाठी उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अर्जाशी संबंधित महत्त्वाची माहिती जाणून घ्या

  • या पदांसाठी अर्ज केवळ ऑनलाइनच करता येतील. यासाठी, तुम्हाला जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल , ज्याचा पत्ता आहे – jnu.ac.in.
  • १८ फेब्रुवारीपासून अर्ज स्वीकारले जात आहेत आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख १० मार्च २०२३ आहे.
  • या पदांसाठी अर्ज करण्याची शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगळी आहे.
  • संबंधित क्षेत्रात आयटीआय डिप्लोमा असलेले १०वी, १२वी किंवा पदवी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.

( हे ह वाचा: Air India मध्ये एयरक्राफ्ट टेक्निशियन पदासाठी बंपर भरती; ‘या’ तारखेपूर्वी अर्ज करा)

  • किमान वयोमर्यादा १८ वर्षे आहे आणि कमाल वयोमर्यादा पोस्टनुसार बदलते.
  • आरक्षित वर्गाला सरकारी नियमांनुसार वयात सवलत मिळेल.
  • या पदांसाठी उमेदवारांची निवड परीक्षेचे अनेक टप्पे पार केल्यानंतर केली जाईल.
  • या पदांसाठी अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण श्रेणीतील उमेदवारांना १००० रुपये शुल्क भरावे लागेल.
  • SC, ST, OBC, महिला प्रवर्ग आणि PWD प्रवर्गासाठी ६०० रुपये शुल्क भरावे लागेल.
  • या भरती प्रक्रियेद्वारे कनिष्ठ सहाय्यक, MTS, लघुलेखक, कुक, मेस हेल्पर, कार्य सहाय्यक आणि अभियांत्रिकी परिचर ही पदे भरली जातील.
  • प्रत्येक पदासाठी रिक्त पदांची संख्या वेगळी आहे, ज्याबद्दल तुम्ही सूचनांमधून माहिती मिळवू शकता.
मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jnu recruitment 2023 for 388 non teaching posts apply before 10 march gps
Show comments