what to know before starting a new job : शिक्षणानंतर अनेकांना वाटते की त्यांना एक चांगली नोकरी मिळावी. नोकरी करण्यास प्रत्येक जण उत्सुक असतात. पहिली नोकरी ही प्रत्येकासाठी खास असते. तुम्ही सुद्धा तुमच्या पहिल्या नोकरीच्या शोधात आहात का? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. फ्रेशर्सनी नोकरी करण्यापूर्वी खालील गोष्टी जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.
- लक्षात घ्या, तुम्ही एकदा नोकरी करायला सुरूवात केली तर तुमचे संपूर्ण आयुष्य नोकरी करण्यात जाईल. तुम्ही मध्येच नोकरी सोडून व्यवसाय करू शकता पण त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल.
- तुम्हाला ज्या क्षेत्रात काम करायचे आहे त्या क्षेत्रात नोकरी शोधा कारण सुरुवातील पैसा पाहून आपण नोकरी करायला सुरूवात करतो पण त्या कामात आपल्याला आवड नसते. अशा नोकरीमुळे पैसा आपल्याला मिळतो पण मानसिक तणाव वाढतो. त्यामुळे आवडत्या क्षेत्रात नोकरी करा.
- तुम्ही एखाद्या विशिष्ट क्षेत्रात नोकरी केल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या क्षेत्रात नोकरी करायची इच्छा असेल, तर तुम्हाला कदाचिक कठीण जाऊ शकते पण ही गोष्ट अशक्य नाही, हे तितकेच महत्त्वाचे आहे.
- जर तुम्ही पहिल्या नोकरीच्या शोधात असाल तर नोकरी मिळवण्यापूर्वी स्वत:साठी वेळ काढा. कारण नोकरीनंतर आपल्याला स्वत:साठी वेळ काढणे कठीण जाते.
- लक्षात घ्या, तु्म्हाला नोकरीच्या ठिकाणी ३० सुट्ट्या असू शकतात पण त्या सुट्या घेणे तुमच्या हातात नसते. त्यासाठी तुम्हाला मॅनेजरची परवानगी घ्यावी लागेल.
- नोकरीच्या ठिकाणी तुम्ही चांगले मित्र बनवाल आणि जेव्हा ते नोकरी सोडतील तेव्हा तुम्हालाही नोकरी सोडण्याची इच्छा होऊ शकते.
- तुम्ही तुमचा पहिला पगार स्वत: निवडू शकता त्यासाठी कंपनीच्या एचआरबरोबर तुम्ही बिनधास्त बोलू शकता.
- अनेकांना नोकरी करण्याची खूप घाई असते त्यामुळे काही लोक लगेच पदवीनंतर काम सुरू करतात पण असे करू नका. पदव्युत्तर नोकरी करा.
- नोकरी करताना अनेक कठीण प्रसंग येतात. अनेकदा तीन शिफ्टमध्ये काम करावे लागते. अशावेळी तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी रात्रीची शिफ्ट सुद्धा असू शकते.
- लक्षात घ्या, तुम्ही नोकरी करून कोणावर उपकार करत नाही. तुम्हाला तुमच्या कामाचा मोबदला मिळतो त्यामुळे तुम्ही नोकरी सोडल्यामुळे कुणाचाही तोटा होणार नाही.