सुहास पाटील

संरक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्या सन २०२४-२५ करिता अग्निपथ योजने अंतर्गत देशभरातील ११ रिक्रूटींग झोन्समधील इंडियन आर्मीमध्ये सन २०२४-२५ करिता अग्निवीर जनरल ड्युटी (वुमन मिलिटरी पोलीस) पदांची ४ वर्षं कालावधीसाठी भरती. झोनल रिक्रूटींग ऑफिस, पुणे अंतर्गत महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दमणदीव, दादरा नगर हवेलीमधील Domicile असलेल्या अविवाहित महिलांमधून ‘अग्निवीर जनरल ड्युटी वुमन मिलिटरी पोलीस’ या पदांच्या भरतीकरिता लेखी परीक्षा दि. २२ एप्रिल २०२४ पासून घेतली जाणार आहे. अग्निवीर आता अस्तित्वात असलेल्या रँकपेक्षा एक नवीन वेगळी रँक असून यात उमेदवारांस फक्त ४ वर्षांच्या कालावधीसाठी इंडियन आर्मीमधे नेमणूक दिली जाईल. ४ वर्षांची कारकीर्द संपल्यानंतर त्यांची ४ वर्षांची कामगिरी पाहून त्या बॅचमधील २५ टक्के अग्निवीर यांना आर्मीच्या रेग्युलर कॅडरमधे भरती होता येईल. त्यानंतर रेग्युलर कॅडरमधे निवडलेल्या उमेदवारांना १५ वर्षांची लष्कराची सेवा करता येईल.

Why change in sugar control order is needed after 58 years
साखर नियंत्रण आदेशात ५८ वर्षांनी बदलाची गरज का? नवीन तरतुदी काय आहेत?
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
mumbai, BEST, Deonar Agar, bus drivers, BEST drtivers strike, salary increase, Diwali bonus, bus service disruption, protest, Deonar Agar
बेस्टच्या कंत्राटी चालकांचे काम बंद आंदोलन मागे
icra predict growth rate to slow to 6 percent in the first quarter in
पहिल्या तिमाहीत विकास दराच्या ६ टक्क्यांच्या नीचांकांचा ‘इक्रा’चा अंदाज
Mumbai, Capital Markets, Stock Indices, Sensex, Nifty, Federal Reserve, Jerome Powell, Jackson Hole Meeting, Domestic Institutional Investors, Foreign Institutional Investors,
तेजीवाल्यांची पकड घट्ट; ‘सेन्सेक्स’मध्ये शतकी वाढ
The Union Health Ministry has announced that a committee will be constituted for the safety of healthcare professionals
केंद्र सरकारकडून समितीची घोषणा, आरोग्यसेवा व्यावसायिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना; डॉक्टरांचा देशव्यापी संप
Recruitment of chartered officers without examination Advertisement released for 45 seats by UPSC
परीक्षेविना सनदी अधिकाऱ्यांची भरती; ‘यूपीएससी’कडून ४५ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध
IPO of Forcas Studio Limited from August 19
फोर्कास स्टुडिओ लिमिटेडचा १९ ऑगस्टपासून ‘आयपीओ’

वेतन व इतर भत्ते – पहिल्या वर्षी रु. ३०,०००/-, दुसऱ्या वर्षी रु. ३३,०००/-, तिसऱ्या वर्षी रु. ३६,५००/- आणि चौथ्या वर्षे रु. ४०,०००/- दरमहा वेतन दिले जाईल. यातून दरमहा ३० टक्के रक्कम सेवा निधी पॅकेजसाठी कापली जाईल. याशिवाय रिस्क अँड हार्डशिप भत्ता, ड्रेस आणि प्रवास भत्ता दिला जाईल.

टर्मिनल फायदे – सेवा निधी पॅकेज – जेवढी रक्कम दरमहा अग्निवीर कॉर्प्स फंडाकरिता कापली जाईल. तेवढीच रक्कम दरमहा भारत सरकारकडून जमा केली जाईल. चार वर्षांच्या सेवेनंतर अग्निवीर यांच्या सेवा निधीमध्ये एकूण रु. १०.०४ लाख जमा होतील. (ठोक रक्कम व्याज वगळता) (अग्निवीर यांचे रु. ५.०२ लाख आणि सरकारचे रु. ५.०२ लाख) अग्निवीर यांना कोणताही प्रॉव्हिडंट फंड भरावा लागणार नाही. तसेच त्यांना ग्रॅच्युईटी आणि कोणत्याही प्रकारचे पेन्शन मिळणार नाही. ट्रेनिंग – भरती केलेल्या ‘अग्निवीर’ यांना मिलिटरी ट्रेनिंग दिले जाईल. बॉडी टॅटू – कायम स्वरूपी बॉडी टॅटू चालणार नाहीत. परंतु हाताच्या आतल्या बाजूस (हाताचे कोपर ( elbow) ते मनगट ( wrist) असलेले टॅटू चालू शकतात. हाताच्या पंजाच्या मागच्या बाजूस ( dorsal part of hand)) असलेले टॅटू चालू शकतात. रजा – वार्षिक रजा – ३० दिवस, सिक लिव्ह – वैद्याकीय शिफारशीनुसार. या रजा इंडियन आर्मीच्या अत्यावश्यकता (exigencies) पाहून दिल्या जातील. अग्निवीर आर्मीच्या सर्व्हिस हॉस्पिटलमध्ये वैद्याकीय सुविधा आणि कँटीन स्टोअर्स डिपार्टमेंटच्या सुविधा त्यांच्या नेमणुकीच्या कालावधीमध्ये मिळविण्यास पात्र असतील. इन्श्युरन्स – अग्निवीर यांना नॉन-काँट्रीब्युटरी रु. ४८ लाखांचे विम्याचे संरक्षण दिले जाईल.

अग्निवीर स्किल सर्टिफिकेट – चार वर्षांचा सेवाकाळ संपल्यानंतर अग्निवीर यांना त्यांनी सेवाकाळात प्राप्त केलेल्या कौशल्यांचे स्किल सेट सर्टिफिकेट दिले जाईल. अग्निवीर माजी सैनिक Ex- servicemen status साठी पात्र नाहीत. भरल्या जाणाऱ्या पदांचा तपशील पुढीलप्रमाणे – अग्निवीर जनरल ड्युटी (जीडी) (महिला) (वुमन मिलिटरी पोलीस) –

पात्रता – १० वी किमान सरासरी ४५ टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि प्रत्येक विषयात किमान ३३ टक्के गुण आवश्यक. (१० वीच्या परीक्षेस बसलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत, त्यांना भरती प्रक्रियेच्या स्टेज- II च्यावेळी १० वी ची मूळ गुणपत्रिका सादर करावी लागेल.)

हलके वाहन ( LMV) चालविण्याचा परवानाधारक उमेदवारांना ड्रायव्हरच्या कामासाठी प्राधान्य देण्यात येईल. विधवा, घटस्फोटीत, कायद्याने विभक्त महिला ज्यांना कोणतेही अपत्य नाही आहे अशा महिला अर्ज करण्यास पात्र आहेत. उंची – १६२ सें.मी. (मान्यताप्राप्त आदिवासी क्षेत्रातील आदिवासी महिलांसाठी उंचीत ४ सें.मी. ची सूट), वजन – उंची आणि वय यांचे प्रमाणात. (आर्मी मेडिकल स्टँडर्ड्सप्रमाणे) छाती – किमान ५ सें.मी. फुगविता येणे आवश्यक.

वयोमर्यादा – दि. १ ऑक्टोबर २०२४ रोजी वय – १७ १/२ ते २१ वर्षे. (जन्म दि. १ ऑक्टोबर २००३ ते १ एप्रिल २००७ दरम्यानचा असावा.) कामावर तैनात असताना कामी आलेल्या सैनिकांच्या विधवा यांना वयाची अट ३० वर्षे. कामावर तैनात असताना कामी आलेल्या सैनिकांची विधवा यांना उंचीत २ सें.मी., वजनात २ कि.ग्रॅ.ची सूट असेल. राष्ट्रीय/ राज्य स्तरावरील स्पर्धांत ज्यांनी जिल्हा, कॉलेज, शालेय, विद्यापीठ बोर्ड चँपियनशिपसाठी प्रतिनिधित्व केलेले खेळाडू यांना उंचीत २ सें.मी., वजनात ५ कि.ग्रॅ. ची सूट असेल.

निवड पद्धती – निवड प्रक्रिया दोन फेजेसमध्ये होईल. फेज-१ – ऑनलाइन कॉमन एन्ट्रन्स एक्झाम देशभरातील कॉम्प्युटर बेस्ड् टेस्ट सेंटर्सवर घेतली जाईल. फेज-२ – आर्मी रिक्रूटमेंट ऑफिस ( ARO) रिक्रूटमेंट रॅली आयोजित करतील. फेज-१ – ऑनलाइन कॉमन एन्ट्रन्स एक्झामिनेशन (सीईई) – लेखी परीक्षा २२ एप्रिल २०२४ पासून घ्यावयाचे ठरले आहे. लेखी परीक्षेसाठी अॅडमिट कार्डवर दर्शविलेल्या वेळी/ठिकाणी हजर रहावे लागेल. लेखी परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड Join Indian Army वेबसाईटवरील लिंक क्लिक करून डाऊनलोड करता येतील. यासाठी User Name (त्यांचा रोल नंबर) आणि Password (जो त्यांना SMS/ E- mail द्वारे दिला जाईल.) वापरावा लागेल. ऑनलाइन टेस्ट ऑब्जेक्टिव्ह टाईप असेल ज्यात MCQ टाईप ५० प्रश्न १ तासात किंवा १०० प्रश्न २ तासात सोडवावयाचे असतील. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी प्रश्नास असलेल्या गुणांच्या २५ टक्के गुण वजा केले जातील. उमेदवारांनी लेखी परीक्षेसाठी आपल्या पसंतीची ५ परीक्षा केंद्रं निवडावयाची आहेत. फेज-२ – लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार पुढील भरती प्रक्रियासाठी शॉर्ट लिस्ट केलेल्या उमेदवारांना अॅडमिट कार्ड https:// joinindianarmy. nic. in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील. उमेदवारांनी भरती मेळाव्यासाठी हजर होताना पुढील कागदपत्रांच्या मूळ प्रती आणि दोन साक्षांकीत प्रतींसह हजर रहावे. (१) अॅडमिट कार्ड, (आकार कमी न करता चांगल्या प्रतीच्या पेपरवर काढलेल्या लेसर पिंटर प्रिंट आऊट्स) (२) फोटोग्राफ – पांढऱ्या बॅकग्राऊंडवर काढलेले २० पासपोर्ट साईज रंगीत फोटो तयार ठेवावेत. फोटो ३ महिन्यांपूर्वी काढलेले नसावेत. (३) शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्रक (१० वी/१२ वी/पदवी इ.) (४) तहसीलदार/ DM यांनी जारी केलेले डोमिसाईल सर्टिफिकेट ज्यावर फोटो चिकटविलेला असावा, (५) जातीचा दाखला (तहसीलदार/डिस्ट्रीक्ट मॅजिस्ट्रेट यांनी जारी केलेला ज्यावर उमेदवाराचा फोटो चिकटविलेला असेल.), (६) धर्माचा दाखला जर जातीच्या दाखल्यावर शिख/ हिंदू/ मुस्लीम इ. असा उल्लेख नसल्यास तहसीलदारांनी जारी केलेला धर्माचा दाखला. (७) शेवटच्या संस्थेतील प्रिन्सिपल/ हेड मास्तर यांनी जारी केलेले स्कूल कॅरेक्टर सर्टिफिकेट. (८) सरपंच/नगरपालिका यांनी ६ महिन्यांच्या आतील जारी केलेले कॅरेक्टर सर्टिफिकेट ज्यावर उमेदवाराचा फोटो चिकटविलेला असेल. (९) सरपंच/ नगरपालिका यांनी गेल्या ६ महिन्यांपर्यंत जारी केलेले अनमॅरिड सर्टिफिकेट (फोटोसहित). (१०) एसओएस/ एसओईएक्स/एसओडब्ल्यू / एसओडब्ल्यूडब्ल्यू ( i) सैनिक/माजी सैनिक इ. च्या मुलांसाठी रिलेशनशिप सर्टिफिकेट, ( ii) Appendix- B मधील अॅफिडेविट, ( iii) Original Discharge Book. (११) एनसीसी (ए, बी, सी) सर्टिफिकेट आणि गणतंत्र दिवस सर्टिफिकेट (रिपब्लिक डे परेड) (फोटोग्राफसहीत) (१२) गेल्या दोन वर्षभरात मिळविलेले खेळातील नैपुण्य प्रमाणपत्र (किमान जिल्हा/ राज्य/ राष्ट्रीय/ आंतरराष्ट्रीय स्तरावरील) (१३) अॅफिडेव्हिट – रु. १०/- च्या नॉन-ज्युडिशिअल स्टँप पेपरवर दिलेल्या नमुन्यातील Appendix- D नोटरी केलेले अॅफिडेव्हिट. (१४) बोनस मार्कांकरिता सर्टिफिकेट – बोनस गुणांच्या संबंधित सर्व मूळ प्रमाणपत्र/त्यांच्या साक्षांकीत ( duly attested) प्रती, (१५) उमेदवाराच्या नावाचे पॅनकार्ड आणि आधारकार्ड, (१६) पोलीस कॅरॅक्टर सर्टिफिकेट. (१७) सरपंच/नगरसेवक यांनी दिलेला रहिवासाचा दाखला ( Residency Proof). (१८) अधिकृत आदिवासी क्षेत्रातील आदिवासी उमेदवारांच्या धार्मिक मान्यतेनुसार असलेले कायमस्वरूपी असलेले टॅटू चालू शकतात. त्यासाठी त्यांना Appendix- E- I मधील सर्टिफिकेट आणि DC/ DM/ SDM यांनी जारी केलेले Appendix- E- II मधील सर्टिफिकेट. (१९) स्वेच्छेने आर्मी रिक्रूटमेंट रॅलीसाठी हजर राहण्याबाबतचे इंडेम्निटी बाँड सर्टिफिकेट Appendix- E- III, (२०) रॅली साईटवर घेवून जावयाच्या कागदपत्रांची यादी Appendix- B- IV. (१) शारीरिक क्षमता चाचणी भरती रॅलीच्या ठिकाणी – १.६ कि.मी. अंतर ७ मि. ३० सेकंदांत धावणे. (२) लांब उडी – १० फूट, (३) उंच उडी – ३ फूट. या चाचण्या फक्त पात्रता स्वरूपाच्या असतील. उमेदवारांनी भरती मेळाव्याच्या ठिकाणी नेमून दिलेल्या दिवशी ०४.०० वाजेपर्यंत हजर राहणे आवश्यक. योग्य कारण असल्याशिवाय उमेदवारांना ०६.०० वाजेनंतर प्रवेश दिला जाणार नाही. (२) शारीरिक मापदंड तपासणी – भरती मेळाव्याच्या ठिकाणी होईल. (३) वैद्याकीय तपासणी – भरती मेळाव्याच्या ठिकाणी वैद्याकिय तपासणीत नापास झाल्यास त्याविरुद्ध ५ दिवसांच्या आत मिलिटरी हॉस्पिटलकडे स्पेशालिस्ट रिह्यूसाठी पाठविले जाईल. लेखी परीक्षा CEE मध्ये पुढील बोनस गुण मिळविले जातील. एकापेक्षा अधिक प्रकारच्या बोनस गुणांसाठी जास्तीत जास्त २५ गुण दिले जातील.

लेखी परीक्षेचा निकाल www. joinindianarmy. nic. in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल. उमेदवारांनी आपला निकाल पाहून आर्मी रिक्रूटमेंट ऑफिसकडे कागदपत्र पडताळणीसाठी संपर्क साधावा. उमेदवारांना वेगळे सूचित केले जाणार नाही. अर्ज केलेल्या दिनांकापासून ट्रेनिंग पूर्ण होईपर्यंत उमेदवारांना विवाह करण्यास प्रतिबंध आहे. परीक्षा शुल्क – रु. २५०/-. अर्ज यशस्वीरित्या भरल्यावर वेबसाईटवरील लिंकमधून SBI पोर्टलवर जाऊन फी भरावयाची आहे.

ऑनलाइन अर्ज www. joinindianarmy. nic. in या वेबसाईटवर दि. २२ मार्च २०२४ पर्यंत करावेत. (Agneepath Link)

शंकासमाधानासाठी हेल्पलाईन नं. ०२०-२६३६०३४९, मुख्यालय रिक्रूटींग झोन, पुणे. कामकाजाच्या दिवशी १०.०० ते १४.०० वाजेदरम्यान.