एआय् एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AI Airport Services Limited) (AIASL) (पूर्वीची एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड) (AiATSL) – मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट येथे पुरुष व महिला उमेदवारांची पुढील ग्राऊंड ड्युटी पदांवर ३ वर्षांसाठी करार पद्धतीने भरती. (उमेदवारांना नेमून दिलेल्या दिवशी वॉक-इन भरतीसाठी सकाळी ०९.३० ते १२.३० पर्यंत हजर रहावे.)

एकूण रिक्त पदे – १,४९६. (Ref. No. AIASL/०५-०३/ HR/६४४ dt. १५.१०.२०२४)

indigo planes bomb threat
दोन दिवसांत मुंबईतील १३ विमानांत बॉम्ब ठेवल्याची धमकी, तपासणीत सर्व धमक्या खोट्या असल्याचे निष्पन्न
22nd October Rashi Bhavishya In Marathi
२२ ऑक्टोबर पंचांग: जन्मराशीनुसार आज कर्तुत्वाला मिळेल चांगला…
Rumors of a bomb, Pune Airport, Rumors bomb Pune Airport
विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा; एकाविरुद्ध गुन्हा, पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर घबराट
planes left wing was broken High Court rejected the claim for compensation of around 25 crores
विमानाचे डावे पंख तुटले; तब्बल २५ कोटींच्या नुकसान भरपाईचा…
Air Force fighter jet test at Navi Mumbai Airport soon
नवी मुंबई विमानतळावर वायू दलाच्या लढाऊ विमानाची चाचणी लवकरच
Traffic Congestion Mumbai Ahmedabad Highway,
पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कोंडी, वर्सोवा पुलापासून चिंचोटीपर्यंत वाहनांच्या रांगा
Attempting to go abroad on the basis of fake passport woman arrested from airport
बनावट पारपत्राच्या आधारे परदेशात जाण्याचा प्रयत्न, विमानतळावरून महिलेला अटक
Inauguration of Solapur Airport
सोलापूर विमानतळाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण; महायुतीच्या दहाही आमदारांची पाठ

(१) रँप सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह – १७० पदे. एकत्रित वेतन – दरमहा रु. २७,४५०/-.

पात्रता : (दि. १ जुलै २०२४ रोजी) मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स/ ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा हिंदी/ इंग्रजी/ स्थानीय भाषा यापैकी एका विषयासह १० वी उत्तीर्ण आणि मोटर वेहिकल ऑटो इलेक्ट्रिकल/ एअर कंडिशनिंग/ फिटर ट्रेडमधील आय्टीआय् NCTVT सर्टिफिकेट (एकूण ३ वर्षं कालावधी) आणि HMV ड्रायव्हिंग लायसन्स सादर करणे.

(२) युटिलिटी एजंट कम रँप ड्रायव्हर – १००पदे. एकत्रित वेतन – दरमहा रु. २४,९६०/-.

पात्रता : १० वी उत्तीर्ण. (ट्रेड टेस्टसाठी येताना HMV ड्रायव्हिंग लायसन्स ट्रेड टेस्टच्या वेळी घेऊन येणे आवश्यक.)

(३) ज्युनियर ऑफिसर – टेक्निकल – ३१ पदे. एकत्रित वेतन – दरमहा रु. २९,७६०/-

पात्रता : बी.ई. (मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग) उमेदवाराकडे हलके वाहन (LMV) चालविण्याचा परवाना असणे आवश्यक. निवड झाल्यास हजर झाल्या दिवसापासून १२ महिन्यांच्या आत अवजड वाहन (HMV) ड्रायव्हिंग लायसन्स मिळविणे आवश्यक. (Aviation experience किंवा जीएस् इक्विपमेंट्स/ वेहिकल/ हेवी अर्थ मुव्हर्स इक्विपमेंट मेंटेनन्समधील अनुभव असल्यास प्राधान्य.)

(४) पॅरामेडिकल कम कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह – १ पद. एकत्रित वेतन – दरमहा रु. २७,४५०/-.

पात्रता : पदवी उत्तीर्ण आणि नर्सिंग डिप्लोमा किंवा बी.एससी. (नर्सिंग) उमेदवार संगणक चालविण्यात निपुण असावा. हिंदी/इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व.

(५) कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह/

(६) सिनिअर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह – एकूण ५२४ पदे.

कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह पात्रता : (दि. १ जुलै २०२४ रोजी) पदवी (१०+२+३ पॅटर्न) (एअरलाईन/ GHA/ Cargo/ Airline Ticketing मधील अनुभव किंवा एअरलाईन डिप्लोमा किंवा IATA- UFTAA/ IATA- FIATA/ IATA- DGR/ IATA- CARGO डिप्लोमाधारकांना प्राधान्य देण्यात येईल.) संगणकावरील कौशल्य आवश्यक. हिंदी/इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व. एकत्रित वेतन – दरमहा रु. २७,४५०/-.

सिनिअर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह पात्रता : पदवी (१०+२+३) उत्तीर्ण आणि फेअर्स, रिझर्व्हेशन, टिकेटिंग, कॉम्प्युटराईज्ड् पॅसेंजर चेकइन/ कार्गो हँडलिंग कामाचा ५ वर्षांचा अनुभव. (संगणकावर प्रभुत्व असावे.) (हिंदी/इंग्रजी भाषेवरील लिहिता/ बोलता येण्याचे प्रभुत्व) एकत्रित वेतन – दरमहा रु. २८,६०५/-.

वरील सर्व पदांची भरती करार पद्धतीने ३ वर्षांच्या मुदतीसाठी (Fixed Term Contract) केली जाईल. प्रतीक्षा यादीसुद्धा बनविली जाईल. उमेदवारांची कामगिरी पाहून कराराचा कालावधी वाढविला जावू शकतो.

वॉक-इनसाठीचे ठिकाण : जीएसडी काँप्लेक्स, सहार पोलीस स्टेशनजवळ, CSMI एअरपोर्ट टर्मिनल – २, गेट नं. ५, सहार, अंधेरी (पूर्व), मुंबई – ४०० ०९९.

आणि इतर सारी पदे जेथे ०९/१२/१५/१८ वर्षे अनुभव आवश्यक आहे जसे की (७) डेप्युटी टर्मिनल मॅनेजर पॅसेंजर – १ पद, (८) ड्युटी ऑफिसर पॅसेंजर – ४२ पदे, (९) ड्युटी ऑफिसर कार्गो – १९ पदे, (१०) ज्यु. ऑफिसर कार्गो – ५६ पदे, (११) ड्युटी मॅनेजर रँप – ४० पदे, (१२) ज्यु. ऑफिसर कस्टमर सर्व्हिस – ४४ पदे इ. पदांची माहिती AIASL च्या वेबसाइटवरील जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे.

वयोमर्यादा : (दि. १ ऑक्टोबर २०२४ रोजी) पद क्र. १ ते ५ साठी २८ वर्षे. पद क्र. ६ साठी ३३ वर्षे.

वयोमर्यादेत सूट इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे).

निवड पद्धती : पद क्र. १ व २ साठी (अ) ट्रेड टेस्ट (ट्रेड नॉलेज आणि HMV ड्रायव्हिंग टेस्ट), (ब) इंटरव्ह्यू.

इतर पदांसाठी (अ) पर्सोनल/ Virtual इंटरव्ह्यू आणि /किंवा (ब) ग्रुप डिस्कशन.

निवड प्रक्रिया : एकाच दिवशी किंवा पुढील दिवशी घेतली जाईल.

अर्जाचे शुल्क : रु. ५००/-. (डिमांड ड्राफ्ट ‘AI Airport Services Limited’ यांचे नावे मुंबई येथे देय असावा.) (डिमांड ड्राफ्टच्या मागे उमेदवाराने आपले पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर लिहावा.)

रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो अर्जावर चिकटवावा. (फोटो ३ महिन्यांपूर्वी काढलेला नसावा.)

अर्जाचा विहीत नमुना www. aiasl. in या संकेतस्थळावरील जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे.

वॉक-इन-सिलेक्शन दि. २५/२६ ऑक्टोबर २०२४ – (२) रँप सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह – १७० पदे आणि पद क्र. (३) युटिलिटी एजंट कम रँप ड्रायव्हर – १०० पदे.

इतर पदांसाठी वॉक-इन-सिलेक्शन दि. २२/२३/२४ ऑक्टोबर २०२४.

पात्र उमेदवारांनी वर नमूद केलेल्या वॉक-इन सिलेक्शन दिनांकास सकाळी ९.३० ते १२.३० वाजे दरम्यान विहित नमुन्यातील पूर्ण भरलेल्या अर्जासोबत इतर मूळ कागदपत्रे, डिमांड ड्राफ्ट, पासपोर्ट व स्वयंसाक्षांकीत प्रती घेऊन उपस्थित रहावे. अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्रांची यादी वेबसाईटवरील जाहिरातीमधील पान क्र. २७ वर दिलेली आहे.