वैद्याकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई अंतर्गत ‘राजर्षि शाहू महाराज शासकीय वैद्याकीय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय’ यांच्या आस्थापनेवरील गट-ड (वर्ग-४) संवर्गातील पुढील रिक्त पदांची सरळसेवा पद्धतीने भरती. छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील रिक्त पदे –

(१) कक्ष सेवक (रुग्णालय) – एकूण ५६ पदे (अजा – ५, अज – ६, विजा-अ – ३, भज-ड – २, विमाप्र – १, भज-क – ३, इमाव – १०, एसईबीसी – ६, ईडब्ल्यूएस – ६, खुला – १४) (२ पदे दिव्यांगांसाठी राखीव).

Devendra fadnavis meet amit shah
नाराज एकनाथ शिंदेंची भाजपकडून मनधरणी, फडणवीस – शहा चर्चेनंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
maharashtra govt introduces new guidelines for school picnic
शैक्षणिक सहलींसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडून दक्षतेची सूचना
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
Dhavalsingh Mohite Patil resigned as district president due to Sushilkumar and Praniti Shindes arbitrariness
सोलापुरात काँग्रेस पक्ष नसून शिंदे काँग्रेस; धवलसिंह मोहिते यांचा आरोप करीत जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा
cm Eknath shinde
शिवसेनेत फिरती मंत्रीपदे; इच्छुक, नाराजांना थोपविण्यासाठी शिंदे यांचा तोडगा
Eknath Shinde is now Deputy CM and second ranked leader in Devendra Fadnavis government
एकनाथ शिंदेंचे सरकारमधील स्थान दुसऱ्या क्रमांकाचे, शिंदेंना ‘देवगिरी’
amshya padawi
शपथविधीदरम्यान शिंदेंच्या आमदाराचा गोंधळ, एकही शब्द व्यवस्थित वाचता येईना!

(२) बाह्यरुग्ण सेवक (रुग्णालय) – ७ पदे (अजा – १, अज – १, भज-क – १, इमाव – १, एसईबीसी – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – १).

(३) अपघात सेवक (रुग्णालय) – ५ पदे (अजा – १, विजा-अ – १, इमाव – १, एसईबीसी – १, खुला – १).

(४) रक्तपेढी परिचर (रुग्णालय) – ४ पदे (अजा – १, भज-ब – १, एसईबीसी – १, खुला – १).

(५) शिपाई (रुग्णालय) – ८ पदे (अज – १, विजा-अ – १, भज-ब – १, इमाव – २, एसईबीसी – १, ईडब्ल्यूएस – १, अराखीव – १).

(६) क्ष-किरण परिचर (रुग्णालय) – ७ पदे ( अजा – १, अज – १, भज-ब – १, एसईबीसी – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – २).

(७) मदतनीस (रुग्णालय) – १ पद (खुला).

(८) शिपाई (महाविद्यालय) – ३ पदे (विजा-अ – १, इमाव – १, एसईबीसी – १).

(९) प्रयोगशाळा परिचर (महाविद्यालय) – ८ पदे (अज – १, भज-ब – १, इमाव – ३, एसईबीसी – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – १).

(१०) प्रयोगशाळा परिचर (रुग्णालय) – ३ पदे (अज – १, विजा-अ – १, एसईबीसी – १).

पद क्र. १ ते ८ साठी पात्रता – १० वी उत्तीर्ण.

पद क्र. ९ व १० प्रयोगशाळा परिचरसाठी – १० वी (विज्ञान) विषयासह उत्तीर्ण.

उमेदवाराने महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक.

वयोमर्यादा : (दि. ३० सप्टेंबर २०२४ रोजी) सर्व पदांसाठी – खुला – १८-३८ वर्षे; मागासवर्गीय/ खेळाडू/ अनाथ/ एसईबीसी – १८-४३ वर्षे; प्रकल्पग्रस्त/ भूकंपग्रस्त/ दिव्यांग/ स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य/ १९९१ जनगणना कर्मचारी/ १९९४ नंतरचे निवडणूक कर्मचारी – १८-४५ वर्षे; माजी सैनिक सेवा कालावधी ३ वर्षे (कमाल वयोमर्यादा – ४५ वर्षे).

आरक्षण : महिलांसाठी ३० टक्के, माजी सैनिकांसाठी – १५ टक्के, खेळाडू – ५ टक्के, प्रकल्पग्रस्त – ५ टक्के, भूकंपग्रस्त – २ टक्के, पदवीधर अंशकालीन – १० टक्के, अनाथ – १ टक्के, दिव्यांग – ४ टक्के पदे राखीव.

वेतन श्रेणी : पद क्र. १ ते ८ साठी एस-१ रु. १५,००० – ४७,६००, अंदाजे वेतन दरमहा रु. २८,०००/-; प्रयोगशाळा परिचर पद क्र. ९ व १० साठी एस-६ रु. १९,९०० – ६३,२०० अंदाजे वेतन दरमहा रु. ३५,०००/-.

निवड पद्धती : प्रत्येक संस्थेकरिता व पदाकरिता स्वतंत्र अर्ज सादर करावयाचा असल्यामुळे त्यानुसार प्रत्येक पदाची संस्थानिहाय स्वतंत्र निवड यादी जाहीर केली जाईल.

परीक्षेचे स्वरूप : परीक्षा ही ऑनलाइन (कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट) पद्धतीने घेण्यात येईल. प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील. प्रत्येक प्रश्नास २ गुण ठेवण्यात येतील. (मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांवर प्रत्येकी २५ प्रश्न असे एकूण १०० प्रश्न २०० गुण असतील.) गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक.

मुलाखती घेण्यात येणार नाहीत.

परीक्षा शुल्क : सर्व पदांसाठी प्रत्येकी रु. १,०००/- खुला प्रवर्ग; रु. ९००/- इतरांसाठी, माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.

परीक्षेचा दिनांक व कालावधी http://www.rcsmgmc.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच उमेदवारांच्या प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल.

ऑनलाइन अर्ज http://www.rcsmgmc.ac.in या संकेतस्थळावर दि. २० नोव्हेंबर २०२४ पर्यंत करावेत. सोबत प्रमाणपत्रे/कागदपत्रे या संकेतस्थळावरील उपलब्ध लिंकवर उमेदवारांना सर्वसाधारण सूचनांमध्ये प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे असणे अनिवार्य आहे.

सीबीआयमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी

प्रोग्रामिंग आणि इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंगमध्ये कौशल्य असलेल्या Tech- savvy उमेदवारांना CBI मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी. युनियन पब्लिक पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC) मार्फत सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (CBI) डिपार्टमेंट ऑफ पर्सोनेल अँड ट्रेनिंग (DOPT) अंतर्गत असिस्टंट प्रोग्रामरपदांची थेट भरती. (Advt. No. १२/२०२४)

पदाचे नाव : असिस्टंट प्रोग्रामर (ग्रुप-बी गॅझेटेड नॉन-मिनिस्ट्रीयल).

एकूण रिक्त पदे – २७ (अजा – ४, अज – २, इमाव – ९, ईडब्ल्यूएस – ४, खुला – ८). या पदांसाठी दिव्यांग कॅटेगरी B/ LV, D/ HH, LD, ASD/ MD चे उमेदवार पात्र आहेत.

वेतन श्रेणी : पे-लेव्हल – ७, अंदाजे वेतन रु. ८६,०००/- दरमहा.

वयोमर्यादा : (दि. २९ नोव्हेंबर २०२४ रोजी) ३० वर्षेपर्यंत (इमाव – ३३ वर्षे, अजा/ अज – ३५ वर्षे, दिव्यांग – ४०/ ४३/ ४५ वर्षे).

पात्रता : (दि. २९ नोव्हेंबर २०२४ रोजी) कॉम्प्युटर अॅप्लिकेशन किंवा कॉम्प्युटर सायन्समधील मास्टर्स डिग्री किंवा बी.ई./ बी.टेक. (कॉम्प्युटर इंजिनीअरिंग/ कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी)

किंवा कॉम्प्युटर अॅप्लिकेशन किंवा कॉम्प्युटर सायन्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग पदवी आणि इलेक्ट्रॉनिक्स डेटा प्रोसेसिंग (प्रत्यक्ष प्रोग्रामिंगसह) कामाचा किमान २ वर्षांचा अनुभव

किंवा DOEACC प्रोग्राम अंतर्गत A लेव्हल डिप्लोमा किंवा युनिव्हर्सिटी प्रोग्राम अंतर्गत कॉम्प्युटर अॅप्लिकेशनमधील पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा आणि इलेक्ट्रॉनिक्स डेटा प्रोसेसिंग (प्रत्यक्ष प्रोग्रामिंगसह) कामाचा किमान ३ वर्षांचा अनुभव.

पात्रता : (Desirable) C, C Plus, Or Visual C Plus, Oracle मधील प्रोग्रामिंगचे ज्ञान तसेच UNIX like Operating Systems, Windows Networking, Windows Environment चे ज्ञान.

पदांची कर्तव्ये : माहिती (Information) चे संकलन (Collection), एकत्रिकरण (Collation) करून प्रक्रिया (Processing) करणे. युझर्स (Users) ना प्रोग्रामिंग, अॅनालिसिस आणि MIS सपोर्ट को-ऑर्डिनेशनमध्ये मदत करणे. कॉम्प्युटराईज्ड एन्व्हायर्मेंट असलेल्या Scene of Crime वरील सायंटिफिक डेटा रिकव्हर करणेचे कामात मदत करणे. CBI ब्रँचच्या एक्झिक्युटिव्ह आणि लॉ स्टाफसाठी (क्राईम मॉड्युल) आणि मिनिस्ट्रियल स्टाफकरिता अॅडमिन मॉड्युलवरील ट्रेनिंग देण्याकरिता रिफ्रेशर कोर्स चालविणे.

अर्जाचे शुल्क : रु. २५/-. (अजा/ अज/ दिव्यांग/ महिला उमेदवारांना फी माफ आहे.)

निवड पद्धती : शॉर्ट लिस्टेड उमेदवारांचा इंटरव्ह्यू घेऊन निवड केली जाईल.

शंकासमाधानासाठी कार्यालयीन वेळेत (१०.०० ते १७.०० वाजे दरम्यान) पुढील फोन नंबरवर संपर्क साधावा ०११-२३३८५२७१/ २३३८११२५/ २३०९८५४३

ऑनलाइन रिक्रूटमेंट अॅप्लिकेशन्स (ORA) https://www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर दि. २८ नोव्हेंबर २०२४ (२३.५९ वाजे) पर्यंत करावेत.

Story img Loader