ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेडने (BECIL) “फील्ड असिस्टंट” पदाच्या विविध रिक्त पदांसाठीच्या भरतीची अधिसूचना प्रकाशित केली आहे. या भरतीअंर्गत एकूण २५० जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जुलै २०२३ आहे. तर भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पदाचे नाव – फील्ड असिस्टंट.
एकूण पद संख्या – २५०
शैक्षणिक पात्रता –
उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणं आवश्यक आहे.
नोकरीचे ठिकाण – दिल्ली
वयोमर्यादा – २१ ते ३० वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
महत्वाच्या तारखा –
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० जुलै २०२३
हेही वाचा- महाराष्ट्र नगरपरिषदेत १७८२ जागांसाठी भरती सुरु, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, पात्रता आणि निकष
निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे.
अधिकृत वेबसाईट – http://www.becil.com
पगार –
फील्ड असिस्टंट पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला २२ हजार ७४४ रुपये पगार प्रतिमहिना मिळणार.
अशी असेल निवड प्रक्रिया –
वरील भरतीकरिता उमेदवारांची निवड चाचणी/ लेखी परीक्षा/ मुलाखतद्वारे करण्यात येणार आहे.
चाचणी / लेखी परीक्षा / मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
उमेदवारांना त्यांच्या कौशल्य चाचण्या/मुलाखत/संवादासाठी ईमेल/टेलिफोन/एसएमएसद्वारे कळवले जाईल.
वरील पात्रता निकषांनुसार निवडलेल्या उमेदवारांनाच निवड प्रक्रियेसाठी बोलावले जाईल.
अधिक माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1W9jhta7otIHkfipnUKPx2rHjSjiUJhq1/view) या लिंकवरील PDF जाहिरात अवश्य पाहा.