MPSC Bharti 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे महाराष्ट्र शासनाच्या, महाराष्ट्र शासन उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मराठी भाषा विभाग, महसूल आणि वन विभागामध्ये प्राचार्य/संचालक, अनुवादक मराठी गट-क आणि अनुवादक हिंदी गट-क, सहायक वन सांख्यिकी गट-ब या पदांच्या एकूण ३२ रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसाठी उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२३ साठी वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज फी याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२३ –

पदाचे नाव – प्राचार्य/संचालक, अनुवादक मराठी गट-क, अनुवादक हिंदी गट-क, सहायक वन सांख्यिकी गट-ब.

एकूण पदसंख्या – ३२

शैक्षणिक पात्रता –

  • प्राचार्य/संचालक : Ph.D
  • अनुवादक मराठी गट-क : मराठी भाषेतील पदवी
  • अनुवादक हिंदी गट-क : हिंदी भाषेतील पदवी
  • सहायक वन सांख्यिकी गट-ब : पदव्युत्तर पदवी

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र

हेही वाचा- १० वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची मोठी संधी! माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत ‘या’ पदासाठी भरती सुरु

अर्जाती पद्धत – ऑनलाईन

महत्वाच्या तारखा –

  • अर्ज सुरू होण्याची तारीख – ३० ऑक्टोबर २०२३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० नोव्हेंबर २०२३

अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक – https://mpsconline.gov.in/candidate

भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पदानुसार पुढील जाहिरात अवश्य पाहा.

https://drive.google.com/file/d/16qeOkbZ_SAfTT9YetmHxdmbICSXAHOl3/view

https://drive.google.com/file/d/1ZiVpm7ZG92aPBRyF0LnaspiFaGDWMdZq/view

https://drive.google.com/file/d/1AmK8-xbMgH4mWF5SYRSUL4o8SSmfYnwG/view

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Job opportunities for graduates recruitment for these posts under mpsc know detailed information jap
Show comments