BMC Bharti 2023 : मुंबई महानगरपालिका अंतर्गत बीवाईएल नायर हॉस्पिटलद्वारे ‘सहाय्यक प्राध्यापक नेत्रविज्ञान, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, बालरोग सल्लागार (पूर्ण वेळ), वैद्यकीय अधिकारी, पूर्ण वेळ ग्रेड I ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, स्टाफ नर्स, विशेष शिक्षक ग्रेड I, विशेष शिक्षक ग्रेड II, ऑर्थोपेडिक्स सल्लागार (अंशवेळ), दंत तंत्रज्ञ, भूलतज्ज्ञ (अंशवेळ), व्यावसायिक समुपदेशक (अंशवेळ), पूर्णवेळ ग्रेड II ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, शिपाई’ या पदांच्या एकूण १८ रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. मुंबई महापालिका भरती २०२३ साठी उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करता येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर २०२३ आहे. भरती संबंधित सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक नेत्रविज्ञान, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, बालरोग सल्लागार (पूर्ण वेळ), वैद्यकीय अधिकारी, पूर्ण वेळ ग्रेड I ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, स्टाफ नर्स, विशेष शिक्षक ग्रेड I, विशेष शिक्षक ग्रेड II, ऑर्थोपेडिक्स सल्लागार (अंशवेळ), दंत तंत्रज्ञ, भूलतज्ज्ञ (अंशवेळ), व्यावसायिक समुपदेशक (अंशवेळ), पूर्णवेळ ग्रेड II ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, शिपाई.
एकूण पदसंख्या – १८
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयात पदवीधर. (शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून यासाठी मूळ जाहिरात अवश्य पाहा.)
नोकरीचे ठिकाण – मुंबई</strong>
वयोमर्यादा – ३८ वर्षे.
हेही वाचा – ITI आणि इंजिनीअर्सना नोकरीची संधी! RITES अंतर्गत ‘या’ पदांसाठी भरती सुरु, सविस्तर माहिती जाणून घ्या
अर्जाची पद्धत – ऑफलाईन.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – डिस्पॅच विभाग, जी-बिल्डिंग, टी. एन. मेडिकलचा तळमजला कॉलेज आणि नायर हॉस्पिटल, मुंबई ४०००८
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ डिसेंबर २०२३
अधिकृत वेबसाईट –
https://www.mcgm.gov.in/
भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी पुढील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.
https://drive.google.com/file/d/1cfm8LisfFKerdEMJfrT9mhE–YPY8Bn6/view